खरच...?मी आहे स्वतंत्र?...
की,मी मालक आहे,एका बंद खोलीचा?॥
आपल्याच भींती,आपल्याच खिडक्या...
आपलीच दारे,आणी कुलुपही आपलेच...
प्रश्न आहे,हे सर्व उघडण्यासाठी लागणाय्रा चावीचा।
आत राहायचे,निवारा हवा म्हणुन...
आणी प्रेमाची माणसे असावी म्हणुनही...
पण माणसं असुनही प्रेम नसेल,तर कुठुन कौल घ्यावा विवेकाचा?।
कंटाळुन,वैतागुन मी बाहेर जातो,माळरानावर हुं-दडण्यासाठी...
पण पुन्हा परतण्याची ओढ का लागते?...
काळ येउन ठेपलाय,हे सगळं एकदा तपशिलवार शोधण्याचा।
आजकाल मी समजतो,ही खोली आपलं पर्सनल अकाउंट आहे...
आणी आपला हिच्याशी...मरेपर्यंत एक बाँड आहे...
खरा मार्ग आहे,तो अकाउंट एक्टिवेट ठेवण्याचा।
पराग दिवेकर...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2080
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
वेगळेपण
In reply to छान by मिसळलेला काव्यप्रेमी
खोलीचे पर्सनल अकांउंट असणं
येस सर
In reply to खोलीचे पर्सनल अकांउंट असणं by पाषाणभेद
अर्थात किती ब्रांचेस असाव्यात
In reply to येस सर by अत्रुप्त आत्मा
ब्रांच एकच
In reply to अर्थात किती ब्रांचेस असाव्यात by पाषाणभेद