नाटकाचा, कथेचा, कलाकारांचा, कार्यक्रमाचा थोडक्यात वृत्तांत आवडला. पुढील कार्यक्रमांना शुभेच्छा आणि सर्व बालकलाकार आणि संबंधितांचे अभिनंदन!
बालनाट्याचे चलच्चित्रण जालावर उपलब्ध झाले की त्याचा दुवाही द्यावा.
विसुनाना
प्रयोग यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन!
सचित्र वृत्तांत खूपच सुरेख.
कथा, नेपथ्य आणि वेशभूषा आवडल्या.
रंगधारा , द थिएटर स्ट्रीम, हैदराबाद ला अनेक शुभेच्छा.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
बालनाट्य प्रशिक्षणाच्या निमित्ताने आयोजित बालनाट्याचा सचित्र वृत्तांत आवडला !!!
सर्व बालकरांचे तसेच लेखक,दिग्दर्शक,समन्वयक,ज्यांची संकल्पना आहे ते,नेपथ्य आणि वेशभूषाकार,प्रकाशयोजनाकार, संगीतकार, सर्वांचेच अभिनंदन करतो.
विसुनाना, दिगदर्शकाची भेट झाली तर आमचा नमस्कार जरुर सांगा. मोठ्या मुलांकडून अभिनय करुन घेणे एकवेळ सोपे आहे. पण लहान मुलांकडून अभिनय करुन घेतांना फार लहान व्हावे लागते. ती जवाबदारी पेलणा-यांचे विशेष कौतुक वाटते !!!
चलचित्राचीही वाट पाहत आहोत.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विसुनाना, नाटकाची संकल्पना तर छान आहेच, पण फोटो आणि कॉमेंट्स वापरून तुम्ही ते चटकन आमच्यापर्यंत पोचवलंत. धन्यवाद. जालावर चलच्चित्रण यायची वाट बघतोय...
हेच म्हणते...
प्रयोग यशस्वी करण्याचं सारं श्रेय बालकलाकारांचं आहे.
आपण केलेल्या अभिनंदनाबद्दल आभार.
ते त्यांच्यापर्यंत पोचवीनच.
भडकमकर मास्तर, तुमच्यासारख्या नाटकातल्या जाणकार माणसाने केलेल्या कौतुकाने आनंद वाटला.
बिरुटे सर, दिग्दर्शक कधीकधी भेटतात. त्यांच्या कानावर तुमचे मत घालतो. परंतु तेही या प्रयोगाचं श्रेय मुलांनाच देतील याची खात्री आहे. ;)
धनंजय, तुमची सूचना विचारार्ह आहे.
नानासाहेब,
वृत्तांत अन् प्रकाशचित्रे, दोन्ही अतिशय सुरेख...!
सर्व कलाकारांचे अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीकरता सुयश चिंतितो...
आपला,
(नाट्यप्रेमी) तात्या.
मुलांनी नाटक छानच केलंय तर. वेशभूषा आणि मेकप सुरेख जमलेत, मेहेनत जाणवते आहे. मुलांचं म्हणजे कसेही केले तरी चालेल असं कुठेही वाटत नाहीये हेच सर्व कलाकारांचे, दिग्दर्शकाचे आणि कलाकारांच्या पालकांचे यश!
('प्रॉम्टर' चा समानार्थी 'कुजबुज्या' आवडला :) )
चतुरंग
प्रतिक्रिया
पुढच्या प्रयोगांना शुभेच्छा...
अभिनंदन!
मस्त!
बालकलाकार
सुरेख गोषवारा
अभिनंदन!
अभिनंदन !!!
मस्त
छान
अभिनंदन!
आभारी आहे...
अतिशय सुरेख..
अरे वा, विसूनाना मस्त सचित्र वृत्तांत!