खरी मजा आली ती तोडल्यावर!

गुंडोपंत's picture
गुंडोपंत in जनातलं, मनातलं
21 Oct 2007 - 7:20 am

उपक्रमावर विकासरावांनी एक चर्चा सुरू केली आहे,
नियमांविषयी!
त्याला मी प्रतिसाद दिला. पण नंतर वाटले की हा तेथे फारसा योग्य नाही. म्हणून काही बदल करून येथे द्यावी असे वाटले.
मिसळ हीच खरी बंड! त्यामुळे इथेच ते योग्य आहे असे!! :)))

आपण ही वेळोवेळी नियम तोडले असतील. काही खरच योग्य नियमही असतील व काही मट्ठ नियम.
कधी राग येवून तोडले असतील तर कधी तरी उगीच!

मी हे अनेकदा उगाचही तोडलेत. क्वचित प्रसंगी त्याचे वाईटही वाटले आहे.

मी वेळो वेळी तोडलेल्या नियमांची नि समाजिक संकेतांची एक छोटीशी यादी दिली आहे खाली.
मी तरूण होतो त्यावेळी मनसोक्त जे तोडलेत, हे त्यातले काही नियम!

१. राँग साईडने(च) कॉलेज पर्यंत गाडी चालवणे. तीन जण बसवून!
२. मित्रांशी पैजा लावून दिवसात किमान २५ सिग्नल तोडणे.
३. ठरवून एका महिन्यात कोणतेही तिकिटच न काढणे. (अगदी थेटरचेही!)
४. मला(व कंपुला) बंक मरायचा असेल तर लेक्चररला रस्त्यातच थांबवून "महत्वाच्या शंका विचारणे" नंतर मित्रांनाही 'शंका विचारायला पाठवणे' व लेक्चर्स ना उशीर घडवणे! वर्गाला कुलुपच लावून ठेवणे. शिवाय कॉलेजच्या आवारात गाडी नेता यावी म्हणून रात्रीच गेटची कुलुपे कापून ठेवणे. (असे सहा-सात वेळा झाल्यवर त्याला वेल्डींगच मारण्यात आले, मग बिजागिर्‍यांच काढायची युक्ते करायला लागलो;) नंतर तर माझा एक मित्र खांबालाच धडकला मग पुढे 'गेटचे कोसळणे' अनिवार्य झाले.)
५. 'त्रास देणार्‍या' शिक्षकांच्या घरांच्या एरियाचे फ्युज 'खांबावरूनच' काढून ठेवणे
६. गांधीजयंतीला हटकून दारू पिणे
७. कचरा टाकला म्हणून कायदा हातात घेवून लोकांना बडवणे.
८. पावभाजीच्या गाडीवर काम करणार्‍या छोट्या मुलांना जास्त पैसे द्यावेत म्हणून मारामार्‍या करणे. गिर्‍हाईकांना जास्तीचे त्या मुलांना पैसे टीप म्हणून द्यायला'च' लावणे.
९. कटकट्या शेजार्‍यांची झोप खराब करणे (रात्री २ ते ३ या पहाटेच्या वेळातच मोठ्या आवाजात त्या शेजार्‍यांना आवडणारेच भजन् लावणे वगैरे पुण्याची कामे!)
१०. गप्पा मारायला म्हणून सिग्नलवरच गाडी लावून तासभर उभे राहणे!
११. पोलिसांशी अति वितंडवाद घालणे (यातून अनेकदा पोलिस मित्रच होवून गेले... मग मात्र नियम तोडणे फार अवघड वाटायचे!:))
१२. नो पार्कींग च्या पाट्यांवर पोस्टर्स चिटकवणे (किंवा चिटकवून घेणे!) (तेंव्हा जाहिरात क्षेत्रात होतो!)
१३. शाळेत पिटिच्या तासाला हटकून 'चमत्कारीक आवाज' काढणे. दुसर्‍या (इंग्रजी माध्यमाच्या) शाळेत जावून मारामार्‍या करणे
१४. शाळेचा गृहपाठ वेळेवर न देणे व नंतर चमत्कृतीपूर्ण सबबींचा फायदा घेणे. (शेजारच्या काकूंना बाळ झाले त्यांना कुणी नव्हते म्हणून आईने चहा व डबा द्यायला पाठवले होते वगैरे डँबीस व धादांत खोटी कारणे देणे!;) )
१५. वर्गात सारखा त्रास देतो, अतिशंका विचारतो, म्हणून बाहेर कढल्यावर थेट मुख्यध्यापंकाकडे तक्रारी करणे व वाद घालण्याचा (नेहमीच अयशस्वी) प्रयत्न करणे.
१६. शिक्षकांनी मारण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा हात धरून ठेवणे. (हे नियम तोडणे नाहीये असे माझे सुप्रसिद्ध मत आहेच;) !) मोट्या वर्गात छड्या घेतांना चटकन हात काढून घेणे, मग एक मास्तर टेबल हात ठेवायला लावायचे, मी तिथुनही काढून घेतल्यावर टेबलावर आपटून त्यांचा रूळच तुटला व उडालेला तुकडा एका मुलाला लागला - रक्त आले, मग पालक आले... मग पुढे मोठेच प्रकरण झाले. पण छड्या बंद झाल्या!
१७. शिक्षा झालीच तर शिक्षकांच्या गाड्यांचे पेट्रोल गायब करणे. सकाळीच त्यांच्या गाडीत हवा नसेल असे पाहणे.
१८. रिक्षावाल्यांना सांगून ठेवून आकडू मुलींना कॉलेजच्या अर्ध्या रस्त्यातच 'रिक्षा बंद पडली' असे म्हणून उतरवून देणे व पाई यायला लावणे. (लगेच त्याच रिक्षात आपण मात्र आरामात बसून येणे!)

वगैरे वगैरे वगैरे छोट्यामोठ्या गोष्टी. फार काही केले नाही हो! :))

शिवाय आपली कामे करून घ्यायला लाच देणे किंवा
कबूल करूनही ऐन वेळेला लाचच न देणे वगैरे गोष्टीही आहेतच. (आता हे नियम तोडणे आहे का हे माहीतनाही बॉ!)
असो, पण आता नाही हा करत असे काही! :)
आता गुंडोपंत मागचे दिवस आठवून नियमाप्रमाणे जाण्याचा प्रयत्न करतात.
जे "मला समजतील ते नियम" पाळण्याचाही प्रयत्न करतो.

मुळात "नियम म्हणजे काय" हा प्रश्न "सत्य म्हणजे काय" या प्रश्नाच्या अतिशय जवळ जाणारा आहे.
नियम हे जोवर सर्व लोकांच्या उपयोगाचे आहेत, तोवर ते पाळायला हवेत असे मी मानतो. (वरच्या उदाहरणात गुंडो अवखळ तरूण होते, आता नाहीत! ;) )

आताशा बहुतेक सर्व नियम पाळतो किंवा प्रामाणिक प्रयत्न तरी करतो. पण ते नियम तोडल्याशिवाय 'का पाळायचे' हे ही कळत नाही ना राव! (सिग्नल वर गाडी लावून गप्पा मारतांना एक मारूती अगदी उडवणारच होती आम्हाला... गाड्या पडल्या, आम्ही वाचलो! नि तो पळाला म्हणून वाचला!)

शिवाय निगोशिएटींग स्कील्स वाढतात! ओळखी होतात.
काय काय 'वाकू शकते' हे कळते 'काय मोडते पण वाकत नाही' हे ही कळते!

आपणही कधीतरी नियम तोडले असतील. काय होतेते नियम कसे तोडलेत आपण?
कोणते नियम योग्य वाटले कोणते मट्ठ?

काही अनुभव?

आपला
गुंडोपंत

(टीपः कदाचित लगेच उत्तरेद्यायला जमणार नाही कारण डोळे दुखतात नि खुप पाणीयेते जास्त वेळ संगणाकाचा वापरकेला तर... बहुतेक डोळ्यांचे सगळे नियम मी तोडलेत! :)) )

संस्कृतीधर्मसमाजजीवनमानराहणीमौजमजाप्रकटनविचारअनुभववाद

प्रतिक्रिया

सहज's picture

21 Oct 2007 - 9:44 am | सहज

सर्वप्रथम गुंडोपंत हे आपले दणक्यात पुनरागमन समजायचे का? डोळ्याच्या दुखण्याचा तुमच्या रोजच्या लेखनावर परिणाम झाला होता व आम्हाला आपली कमी जाणवत होती. असो काळजी घ्या व लवकर ठणठणीत बरे व्हा, हो. :-)

मी तिकडे उपक्रमावर वैयक्तिक वाटू शकेल व नियमात बसणार नाही असा प्रतिसाद देऊ शकलो नाही म्हणून इथे हॉटेलात. :-)

तुमचे वरचे प्रताप वाचून अगगगगगग्!!!!!!! एखाद्या तामिळ पिक्चरचा पुर्वाध वाचतोय असे झाले बघा. :-) फक्त एखादी "सालस्" (तात्यांनी त्या दसर्‍याच्या शुभेच्छापत्रात दाखवली तशी) हिरॉइन येउन हिरोला आमुलाग्र बदलणार तेवढ्यात तुम्ही थांबलात पंत...

नावाला साजेसे तरूणपण होते म्हणायचे... :-) ह. घ्या.

कोलबेर's picture

21 Oct 2007 - 9:54 am | कोलबेर

अगगगगगग्!!!!!!! एखाद्या तामिळ पिक्चरचा पुर्वाध वाचतोय असे झाले बघा. :-) फक्त एखादी "सालस्" (तात्यांनी त्या दसर्‍याच्या शुभेच्छापत्रात दाखवली तशी) हिरॉइन येउन हिरोला आमुलाग्र बदलणार तेवढ्यात तुम्ही थांबलात पंत...

हा हा हा .. जबरा!!

गुंडोंचे प्रताप वाचून अगदी असेच वाटले. ...
गाडीत गर्दी होती कंडक्टर पर्यंत पोहचूच शकलो नाही आणि म्हणून तिकिट काढले नाही वगैरे दुध भातातले नियम भंग वाचल्यावर गुंडोंची झणझणणीत मिसळ जाम आवडली. लगे रहो गुंड्याभाय!

गुंडोपंत's picture

22 Oct 2007 - 2:37 am | गुंडोपंत

गाडीत गर्दी होती कंडक्टर पर्यंत पोहचूच शकलो नाही आणि म्हणून तिकिट काढले नाही
यात नियम भंग कुठे आहे हेच कळले नाही मला?!?

पाळणेच शक्य नाही असे नियम तोडले जात नाहीत, ते तुटतात हो!

आपला
गुंडोपंत

गुंडोपंत's picture

21 Oct 2007 - 2:55 pm | गुंडोपंत

सर्वप्रथम गुंडोपंत हे आपले दणक्यात पुनरागमन समजायचे का?

अहो मी इथेच आहे हो! पुनरागमनासाठी जायला तर हवे ना :)
फक्त खुप त्रासहोतोय पण रहावत नाही नाही

"सहनही होत नाही आणी वाचताही येत नाही"

अशी वेळ आहे हो! ;)))

आम्हाला आपली कमी जाणवत होती.
आम्हालाही आठवण तर येतेच ना! तुमचे असे प्रेम आहे सहजशेठ, म्हणून तर आम्ही आहोत!

असो,
ते सालस वगैरे जाऊ द्या हो... नकोच बोलयला आता त्यावर! ;))) !

आपला
गुंडोपंत

विजुभाऊ's picture

15 Sep 2010 - 5:00 pm | विजुभाऊ

लय भारी

विसोबा खेचर's picture

21 Oct 2007 - 9:57 am | विसोबा खेचर

मिसळ हीच खरी बंड! त्यामुळे इथेच ते योग्य आहे असे!! :)))

उत्तम केलंस रे गुंड्या!:)

अरे बाबा उपक्रम काय किंवा मनोगत काय, ही हुश्शार, सभ्य, सुशिक्षित, सुसंस्कृत असलेल्या मंडळींच्या मालकीची संकेतस्थळं! मिसळपावचं तसं नाही बरं का! त्याचा मालक एक नंबरचा असभ्य आणि असंस्कृत! शिवाय वृत्तीने तमासगीर आणि बंडखोर! तेव्हा इथे तुला काय लिहायचंय ते लिही बिनधास्त! बरंवाईट काय ते पाहून घ्यायला पंचायत समिती आहेच, आपण कशाला काळजी करा! :)

५. 'त्रास देणार्‍या' शिक्षकांच्या घरांच्या एरियाचे फ्युज 'खांबावरूनच' काढून ठेवणे
६. गांधीजयंतीला हटकून दारू पिणे

हा हा हा! हे उपाय अतिशय आवडले..:)

आपला,
(महात्माजींचा फुल्टू (!) भक्त..) तात्या.

गुंडोपंत's picture

22 Oct 2007 - 8:36 am | गुंडोपंत

आपण कशाला काळजी करा!
छे! छे! तात्याबा काळजी करत असतो तर इतके गोंधळ घातले असते का हो!

काळजी वगैरे करायची असते ती 'तिकडे' नियम पाळणारांनी.
ज्यांना नियम तोडायचेच दु:ख नाही ते कसली काळजी करताही?
ते मजेत पुढे जातात सिग्नलवरून आणि मग "राईट टर्न" घेवून बरोब्बर मिसळपावावर येतात! ;)))

तेव्हा इथे तुला काय लिहायचंय ते लिही बिनधास्त!

लिहिणारच!
अगदी नाही म्हणाले तरी लिहिणारच! ;))

आपला
राईट टर्न मारलेला!
गुंडोपंत

गुंडोपंत's picture

22 Oct 2007 - 8:44 am | गुंडोपंत

हे तर काहीच नाही,
मी तर ब्लॅक मध्ये विकली पण आहे दारू त्या दिवशी! पैस हा इश्यु नाही हो! मजा म्हणून!!!
शिवाय सॉलिइड काँटॅक्ट्स बनतात बरं या दिवशी...
एकहा!'नेटवर्कींग डे' असायचा हा!
ड्राय डे ला सॉलीड मजा यायची... लोकं अशी गयवया करतात. अक्षरश: भीक मागतात दारूची!

मग खुप आडून पाडून कशी तरी एक बाटली दिली की अगदी पाय धरतात!नाही...)(हल्ली काही राहिले नाही...)

मी ही आता त्यातून मुक्त आहे बर का!

(नाही तर व्यनि पाठवायचे मला ड्राय डे ला...
सांगता येत नाही... वर वर सभ्य भासणारी डँबीस लोकं आहात तुम्ही!) ;)))

आपला
गुंडोपंत

प्रकाश घाटपांडे's picture

22 Oct 2007 - 6:28 pm | प्रकाश घाटपांडे

ड्राय डे ला सॉलीड मजा यायची... लोकं अशी गयवया करतात. अक्षरश: भीक मागतात दारूची!

मग खुप आडून पाडून कशी तरी एक बाटली दिली की अगदी पाय धरतात!नाही...)(हल्ली काही राहिले नाही...)

ड्राय डे ला रात्री बारा वाजता आम्ही अशी बिअर पुण्यात दीप बंगला चौकातल्या परदेशी वाईन्स कडून हक्काने परंतु चोरमार्गाने प्रसंगी थोडे जास्त पैसे देउन घेत असू. ( पोलिस कन्सेशन नको. तसेही आम्हि बिनविषारी पोलिस हे त्याला माहित होते) अशावेळी ४८ वर ( आमच्या सरकारी क्वार्टर ( हाफ नाही बरका?) नांव) आल्यावर आमची मान १८० अंशात फिरत असे.
( श्रावणीत गोमूत्र पिणारा)
प्रकाश घाटपांडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Oct 2007 - 10:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डोळ्याची काळजी घेऊन वाचकांना लिहायला प्रवृत्त केल्याबद्दल मिसळपाव ग्राहकांच्या वतीने गुंडोपंताचे आभार ! ;)

नियम तोडण्यात आम्हालाही आनंद वाटतो. सिग्नल तोडण्यातला आनंद तर अजूनही कधीतरी घेतोच. विशेषत: एखादा सायंकाळी मित्रांबरोबर बैठक आवरल्यावर ;) मित्राला टू व्हीलरवर सोडतांना, आम्हाला फार जोर येतो. मुद्दामहून पोलिसांसमोरून सिग्नल तोडून जातो. अशावेळी तेही काही करत नाही आणि कधीतरी ५० रुपयावर तडजोड करतांना, तुम्ही प्राध्यापक आहात तुम्हाला शोभत नाही, असा उपदेशही निमूटपणे ऐकला आहे.

अवांतर ;) नियम कुठे कुठे तोडले होते ते आठवले की, इथे लिहीत राहीन ! नियम पाळण्यापेक्षा तोडल्यावर अधिक फायदाच होत असावा असे वाटते ! :)

आपला
नियमाचे कधीतरी काटेकोरपणे अंमलबजावणी करणारा !
प्रा.डॊ................

त्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये जे काही मी केले (किंवा माझ्या कंपूने केलेले पाहिले आणि अपराधी न वाटता हसलो) त्याला नियम मोडणे म्हणावे की नाही कोणास ठाऊक.

विकास's picture

23 Oct 2007 - 7:58 am | विकास

शाळेत डँबीसपणा करणे हा नियम असतो

मस्त!

राजे's picture

22 Oct 2007 - 9:03 am | राजे (not verified)

तरुण वय हे नियम मानतच नाही ... काय करणार पण एक गोष्ट आहे नियम तोडण्यात जो आनंद भेटतो त्या पेक्षा जास्त नियमानूसार चालताना भेटतो कारण एखाद दुसरा तरी तुमचे अनुकरण करुन नियमानूसार चालतोच.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

झकासराव's picture

22 Oct 2007 - 11:26 am | झकासराव

गुंडोपंत मज्जा आली वाचुन.
काही लोक नियमावर "बोट" ठेवुन जगतात तर काही नियमावर् हात, पाय, कुर्‍हाड, गाडी, आगबोट्,विमान सगळच चालवतात. :)
नाव सार्थ आहे तुमच.
नियमांची ऐशी तैशी.
सिग्नल तोडण्यात जबरा आनंद आहे. मी घेतो अध्ये मध्ये.

गुंडोपंत's picture

22 Oct 2007 - 2:52 pm | गुंडोपंत

खरंय हो जरा असे करून पाहण्यातही मजा आहे हो मजा आहे!

मी आपला प्रमाणिकपणे सांगितले होहेसगळे आणि कोंबड्या पकपक करायला लागल्या.

आपला
गुंडोपंत

स्वाती दिनेश's picture

22 Oct 2007 - 11:47 am | स्वाती दिनेश

ही सारी चर्चा वाचून खूबसुरत मधल्या,"सारे नियम तोड दो,नियमपे चलना छोड दो.." गाण्याची आठवण झाली,:) आणि शाळेतल्या नियम तोडलेल्या दिवसांचीही :)
स्वाती

बेसनलाडू's picture

22 Oct 2007 - 11:55 am | बेसनलाडू

इन्कलाब झिन्दाबाद ... बोलो बोलो बोलो...इन्कलाब झिन्दाबाद...
(स्वातंत्र्यसैनिक)बेसनलाडू

कोंबडी's picture

22 Oct 2007 - 1:26 pm | कोंबडी

बिरुटेसर/गुंडोपंत, अजून काय काय वाकवून पाहिलंय तेही सांगा. तो सिग्नल मोडून झाल्यावर दुचाकीवरून जाताना एखाद्या मुलीच्या उरोजाला निसटता स्पर्ष? त्याशिवाय ती मुलगी किती "वाकते" ते कळणार कसं? एखाद्या मॉलमध्ये फिरताना पिशवीत एखादी वस्तू हळूच टाकणं ? त्याशिवाय मॉलची सिकयुरिटी सिस्टीम किती टाइट आहे ते कळणार तरी कसं?

राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य, पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य!

एक घटना आठवली. (अर्थात परदेशात) वेगमर्यादा ओलांडून जाणार्‍या एकाला पोलिसाने पकडल्यावर कारण मिळालं, "आय वॉज जस्ट चेकिंग हाऊ फास्ट माय कार कॅन गो!". पोलिसाने शांतपणे २५० डॉलरचा दंड केला आणि म्हणाला, "सर, युवर कार कॅन गो ऍज फास्ट ऍज २५० डॉलर्स!"

आजानुकर्ण's picture

22 Oct 2007 - 2:32 pm | आजानुकर्ण

राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य, पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य!

खरे आहे. लेख वाचून त्रास झाला!

- (त्रस्त) आजानुकर्ण

गुंडोपंत's picture

22 Oct 2007 - 2:50 pm | गुंडोपंत

कर्णा इतका दु:खी होवू नकोस रे!
मंचर नि चिंचवड ला कधी गेलो नाही मी ;))

आपला
गुंडोपंत

आजानुकर्ण's picture

22 Oct 2007 - 3:46 pm | आजानुकर्ण

पंत,

आपल्यासारख्या 'सुशिक्षित' लोकांनी नियम तोडल्याबद्दल खंत करण्याऐवजी ते नियम मोडण्यात कशी मजा असते हे दाखवून देण्यासाठी लेख लिहिला हे दु:खदायक आहे.

सर्वच प्रसंगी सर्व नियम पाळणे अनेकदा काही कारणास्तव शक्य होत नाही. उदा. गर्दी मध्ये तिकीट काढणे. पण स्वतःचा कंड शमवण्यासाठी किंवा "मी किती भारी" हे दाखवण्यासाठी नियम मोडणे चुकीचे आहे. व त्याचे वर दिल्याप्रमाणे समर्थन करणेही चुकीचे आहे.

नियम मोडायला फार काही लागत नाही. मंचर किंवा चिंचवडला नियम मोडणारे एक शोधा - हजार सापडतील पण नियम पाळणारे खूप कमी.

"मी किती भारी" हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही नियम पाळला असता तर अधिक आनंद वाटला असता. त्यातही थ्रिल असते...

असो.

गुंडोपंत's picture

22 Oct 2007 - 3:51 pm | गुंडोपंत

बरं बाबा!
आता तसा एक लेख लिहु का?
काय मागे लागलात रे बाबांनो माझ्या?

अजून काही वर्षांनी बहुतेक लेख लिहिणार तुम्ही... गुंडोपंताना कसा त्रास दिला यावर ;))
आपला
गुंडोपंत

देवदत्त's picture

22 Oct 2007 - 7:01 pm | देवदत्त

अजून काही वर्षांनी बहुतेक लेख लिहिणार तुम्ही... गुंडोपंताना कसा त्रास दिला यावर ;))

चांगली कल्पना आहे. पण ते "एखाद्या सदस्याला त्रास न देणे हा नियम आहे का?" ह्यावर अवलंबून आहे. ;)

प्रकाश घाटपांडे's picture

23 Oct 2007 - 9:19 am | प्रकाश घाटपांडे

"मी किती भारी" हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही नियम पाळला असता तर अधिक आनंद वाटला असता. त्यातही थ्रिल असते...
खालील मनोगतावरील लिंकवर अजानुकर्णाने हा आनंद व्यक्त केला आहे.
http://www.manogat.com/node/11727

प्रकाश घाटपांडे

गुंडोपंत's picture

22 Oct 2007 - 3:33 pm | गुंडोपंत

तो सिग्नल मोडून झाल्यावर दुचाकीवरून जाताना एखाद्या मुलीच्या उरोजाला निसटता स्पर्ष?
ओहो!
आपल्याला वेगळ्याच नियमांमध्ये 'रस' आहे तर.
गुंडोपंत अशा विभागात कधीच नव्हते. त्यामुळे या गोष्टींच्या भानगडीत पडलो नाही रे बाबा.
असे करत असतो तर गुंडोपंतांना अजूनही मैत्री टिकवून असणार्‍या मैत्रिणी मिळाल्या नसत्या.

तु काही असले केले असेल तर ते तुलाच लखलाभ!
कुणाला अशा रितीने वाकवण्याचे काही गरज पडली नाही मला!

एखाद्या मॉलमध्ये फिरताना पिशवीत एखादी वस्तू हळूच टाकणं ?

हे तुलाच जमत असेल रे बाबा! मी तरी पैसे देवूनच गोष्टी घेणं पसंत करतो. चोर्‍या करण्यात मला रस नव्हता आणि नाही!

थोडीफार तरूणपणातली मस्ती आहे ती. तेही मी प्रामाणिकपणे सांगितले,
तू तर काय केले तेही कधी सांगितले नाहीस?
आधी सांग की तू काय काय केले ते.
तु काय "असाच" होतास तरूणपणात?

जगात असा कुणीच नाही की, ज्याने नियम तोडला नाही.

मीपण त्याचे काही फार समर्थन करतो आहे असे नाही. नियमांचे महत्व समजले हे तर मी शेवटी मारूती गाडीने आम्हाला उडवले त्या प्रकरणात संगितलेच आहे.

उगाच फार बाऊ करू नकोस... मी काही खुन केले नाहीत की दरोडे घातले नाहीयेत.
तुला यातले काही करायला झेपले नसेल, तर उगाच जळू नकोस माझ्यावर!

आपला
गुंडोपंत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Oct 2007 - 6:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोंबडीसेठ,पंतानी खूलासा केलाच आहे, पण चो-या, स्पर्श, या गोष्टीशी आमचा काही  संबंध नाही, तसा विचारही आमच्या मनाला  शिवत नाही. पण सिग्नल तोडल्यावर आम्ही काय काय करु शकतो,  त्याबद्दलच्या  आपल्या प्रतिभेने मात्र आम्ही चकीत झालो ! राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य, धन्यवाद,  बरं वाटलं ! :)
पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य!सहमत !
अवांतर ; ) नियम पाळणा-यांनी नियम पाळावे, नियम तोड-यांनी अंदाज पाहून नियम तोडावेत, असे आपण म्हणनार नाही बॉ ! : )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोंबडी's picture

22 Oct 2007 - 10:21 pm | कोंबडी

गुंडोपंत, एकदम एकेरीवर आलात, म्हणजे रागावलात. तरी राग नसावा.

मी टोकाची उदाहरणे दिली त्याला कारण म्हणजे मला हे सांगायचं होतं, की त्या उदाहरणांतल्या गोष्टी ज्याप्रमाणे तुम्हाला करणे "शक्य" आहेत, पण कराव्याश्या वाटणार नाहीत, त्याच प्रमाणे तुमच्या यादीतल्या बहुतांशी गोष्टी मला करणे "शक्य" आहेत, परंतु कराव्याश्या वाटणार नाहीत (पूर्वीही वाटल्या नाहीत). यात तुम्हाला बगळेपणाचा संशय येत असेल तर येवो.

बिरुटेसाहेब, तुमच्या खालील वाक्याने मात्र कमालच केली:
नियम तोडण्यात आम्हालाही आनंद वाटतो. सिग्नल तोडण्यातला आनंद तर अजूनही कधीतरी घेतोच. विशेषत: एखादा सायंकाळी मित्रांबरोबर बैठक आवरल्यावर ;) मित्राला टू व्हीलरवर सोडतांना, आम्हाला फार जोर येतो. मुद्दामहून पोलिसांसमोरून सिग्नल तोडून जातो. अशावेळी तेही काही करत नाही आणि कधीतरी ५० रुपयावर तडजोड करतांना, तुम्ही प्राध्यापक आहात तुम्हाला शोभत नाही, असा उपदेशही निमूटपणे ऐकला आहे.

यावरून दोन उदाहरणं आठवली (एक जरा टँजंट)

१. मुंबई विमानतळ. माझा मित्र छोटीशी परदेश वारी करून उतरला. कस्टमवाला - "भोसले" नाव असलेला - पाठी लागला. मित्र म्हणाला माझ्याकडे काहीही नाही. खरंच काहीही नव्हतं. मित्राच्या खिशातलं चांगलंसं पेन पाहून तो म्हणाला, मग पेन तरी द्या! मित्र म्हणाला, भोसले, अहो शिवाजीचे वंशज तुम्ही, तुम्हाला पेन मागणं शोभत नाही. तेव्हा मात्र गडी वरमला.

२. ही सुद्धा खात्रीलायक सत्य घटना: फर्ग्युसन रस्ता. एकाने चारचाकी पार्क केली. ते नो पार्किंग निघालं. पोलिसाने पकडलं. हा म्हणाला बरं, गुन्हा मान्य, भरतो दंड. पण मग पोलिसाचं बिनसलं. पोलिस म्हणाला चौकीत चल. हा म्हणाला चला. पोलीस दार उघडून याच्या बाजूच्या सीटवर बसला. हा म्हणाला, खाली उतरा. ही गाडी माझी आहे. मी माझ्या गाडीतनं येतो चौकीवर, तुम्ही तुमच्या गाडीतनं या. पोलीस लालेलाल. चौकीत सायबाला सांगितलं. साहेब ह्याला म्हणाला, का रे माजला का? हा म्हणाला, माजलो मी नाही, माजले तुम्ही. लक्षात ठेवा, तुमच्या पगाराचा एक लक्षांश का होईना, एक हिस्सा माझ्या करातून जातोय. शेवटी साहेबाचा साहेब आला, आणि याला दंड घेऊन बाइज्जत बरी केलं.

मला असं मनापासून वाटतं, की ज्या पुण्यात किमान दोन टक्के रहदारी उलट्याच दिशेने सुरू असते, जेथे मोठाल्या बसेस हायवेवरही डाव्याच लेन मध्ये यू टर्न घेऊन उलट्या फिरतात, जिथे सिग्नलला दोनतीनशे वाहनं थांबली असली तरी देखरेखीकरता एखादाच पोलिस असतो, जिथे पकडलं गेलं की पावतीशिवाय व्यवहार हाच रिवाज आहे, अशा ठिकाणी नियम मोडण्यात कसली आलीय मर्दुमकी? उदाहरण दोन मधल्या व्यक्तीसारखं काही केलंत तर मिशीला तूप लावून फिरा (आपल्याला नाही बुवा ते जमणार अजून. कबूल!)

- कोंबडी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Oct 2007 - 10:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

<<बिरुटेसाहेब, तुमच्या खालील वाक्याने मात्र कमालच केली:

नियम तोडण्यात आम्हालाही आनंद वाटतो. सिग्नल तोडण्यातला आनंद तर अजूनही कधीतरी घेतोच. विशेषत: एखादा सायंकाळी मित्रांबरोबर बैठक आवरल्यावर ;) मित्राला टू व्हीलरवर सोडतांना, आम्हाला फार जोर येतो. मुद्दामहून पोलिसांसमोरून सिग्नल तोडून जातो. अशावेळी तेही काही करत नाही आणि कधीतरी ५० रुपयावर तडजोड करतांना, तुम्ही प्राध्यापक आहात तुम्हाला शोभत नाही, असा उपदेशही निमूटपणे ऐकला आहे.

आम्हाला सिग्नल तोडणे शोभत नाही असे म्हणायचे आहे का ?
नियमित सिग्नल तोडले असते तर आपण काय काय लिहिले असत हो !
घेतो कधी कधी मजा क्षणभर, त्यात इतके गंभीर होण्यासारखे काय आहे ? आणि जे गंभीर घ्यायला पाहिजे, तिथे जाऊ द्या ! आपल्याच्यानं काही होणार आहे का ? असं म्हणायचं ! अर्थात अशा सोयीच्या विचारसरणीच्या मित्रांचे आम्हाला मोठे कौतुक वाटते !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुंडोपंत's picture

23 Oct 2007 - 2:56 am | गुंडोपंत

ज्या पुण्यात किमान
हे पहा तुमच्या पुण्याशिवायही महाराष्ट्र आहे!!!
मी हे नियम तुमच्या पुण्यात मोडलेले नाहीत.

पुण्यातले अगदी सदाशीव पेठेत राहणारे, सर्रास नियम मोडणारेही मी ओळखतो.
हेच लोक वर गळे काढायला तयार असतात हे ही तितकेच खरे.

याशिवाय तुम्ही दिलेल्याउदाहरणात "तुम्ही" नाही! इतर आहेत. वर चर्चा निट वाचल्यास तुम्ही काय केले असे आवाहन आहे.
म्हणजे परत धूर्तपणे तुम्ही मुळ मुद्द्याला बगलच दिली आहे.

असो, बिरुटे साहेबांचे नियम मोडणे:
ते ही पुण्यात नाहीत!!!
ते रोज काही जावून नियम मोडत नाहीत.
कधीतरी मोडतात. त्यावर ते दंड ही भरतात तशी तयारी ठेवतात.
पळून जात नाहीत हे महत्वाचे. म्हणजे त्याची जबाबदारी घेतात.

कधीतरी हे वागणे "अनवाईंडीग" ही असू शकते ना!

सांगण्याचा उद्देश हा की इतरांवर आरोप करण्याआधी विचार करा, आपण कधी मोडलेत नियम.
कितीवेळा पळून गेलाय?
तुम्ही आधी स्वतःचे काही सांगा.

काहीवेळा लोकं कसं करतात हे या म्हणीतून स्प्ष्ट कळते:
"आपलं ठेवायचं झाकून नि दुसर्‍याचं पहायचं वाकून"

आपला
गुंडोपंत

प्रकाश घाटपांडे's picture

22 Oct 2007 - 7:01 pm | प्रकाश घाटपांडे

राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य, पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य!

खर आहे! काही गोष्ट 'योग्य 'नसतात पण 'क्षम्य' नक्कि असतात. पण हे ठरवणार कोण? आपणच. सदसदविवेकबुद्धी म्हणतात ती हीच. तीच ठरवते.

प्रकाश घाटपांडे

जुना अभिजित's picture

22 Oct 2007 - 3:36 pm | जुना अभिजित

नियम हे सर्वांचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून बनवलेले असतात. जेव्हा नियमांचा अतिरेक होतो तेव्हा त्या विरोधात आंदोलन वगैरे जसे मेहंदी प्रकरण(दलेर नव्हे हे http://mr.upakram.org/node/785 प्रकरण) ठीक आहे. सिग्नल तोडणे, रांगेत उभे न राहणे म्हणजे मी ह्या समाजाचा घटक नाहीये असे दर्शवणे. विद्रोह कुठे करावा आणि किती करावा यावर त्याला क्रांती म्हणायचं की विकृती हे ठरतं. लहानपणी समज कमी असते तोपर्यंत चालून जातं पण जाणतेपणी केवळ मर्दुमकी दाखवायला किंवा आपल्याला खाज म्हणून सिग्नल तोडणे किंवा तत्सम इतर नियम तोडणे म्हणजे इतर लोकांना मूर्खात काढण्यासारखे आहे. परवा पुण्यात नळ स्टॉप वर एका आजोबांना काठी घेऊन वाहतूक नियंत्रण करताना पाहीले त्यांनाही बहुतेक म्हातारचळ लागले असावे.

सिग्नलतोड-समर्थक लोकांना नम्र विनंती आहे की जाणून बुजून नियम तोडू नका. बसमध्ये प्रचंड गर्दी असेल तेव्हा क्वचित तिकीट न काढणे ठीक आहे. पण कंडक्टरचा डोळा चुकवून आज मी कसा विनातिकीट आलो हे सांगण्यासाठी तिकीट बुडवू नये.

वर उल्लेख केलेला पोलीसाचा प्रसंग मार्गदर्शक आहेच.

वाहतूकीचे नियम तोडणार्‍या उन्मत्त नागरिकांना पोलिसांनी पावती फाडायला सांगितली की खुश होणारा अभिजित

गुंडोपंत's picture

22 Oct 2007 - 3:42 pm | गुंडोपंत

"नियम हे सर्वांचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून बनवलेले असतात.""
हे दरच वेळी नसते पण कदी कधी असते आणि ते मान्य आहे मला.

अरे अभिजित,
कॉलेजात असतांना कडकीच्या दिवसात केलेले उद्योग आहेत ते.
आता तिकिट काढतो रे बा!

असो,
मी असे प्रामाणिक पणे लिहुन चूकच केली की काय? ???

इथे तर सगळेच एक पांढरा शर्ट घातलेले बगळे दिसतायेत... :(

आपला
गुंडोपंत

जुना अभिजित's picture

22 Oct 2007 - 3:55 pm | जुना अभिजित

मी असे प्रामाणिक पणे लिहुन चूकच केली की काय? ???

आजीबात नाही. आम्हीही कालेजात असताना काही कमी नव्हतो त्या मुळे शिक्षकांच्या सायकलींची हवा काढण्याबद्दल कुठे काय बोललोय. आणि तुम्हाला वैयक्तिक तर काहीच बोललो नाही. परदेशी राहणार्‍यांना स्वच्छतेबद्दल सांगायची काय गरज? तिकडे तर आरशासारखे रस्ते वगैरे वगैरे..

चर्चेला आलेल्या प्रतिसादांत मात्र वरील नियम तोडण्याच्या कल्पनेचा उदोउदो होताना दिसला म्हणून बोललो. काल एस्टीतून येताना एका कुटुंबाने खिडकीतून कचरा बाहेर फेकला(या लोकांचा आवडता कचरा म्हणजे लेज्/कुरकुरेची पाकिटे). त्यांच्या कडेवर ३ एक वर्षाचं मूल होतं. आता तुम्ही सांगा त्या मुलासमोर त्याच्या आवशीने काय आदर्श घालून दिला?

आजोबा समर्थक अभिजित

गुंडोपंत's picture

23 Oct 2007 - 3:01 am | गुंडोपंत

आता तुम्ही सांगा त्या मुलासमोर त्याच्या आवशीने काय आदर्श घालून दिला?

अतिशय चुकीचा! शंकाच नाही.

अरे मी स्वतः अनेकदा बस स्टेशन वर असा कचरा गोळा करूवरत्या लोकांना परत दिला आहे.
यातनं मोठी भांडणे केली आहेत. अगदी मारामार्‍याही!

त्यामुळे हे वर्तन चुकीचेच आहे रे बाबा.

तूही तेंव्हाच त्यांना टोकायला हवे होते ना पण? का नाही घडत तसे?

तुझा
गुंडोपंत

देवदत्त's picture

22 Oct 2007 - 5:13 pm | देवदत्त

तुम्ही लोक फार फास्ट लिहिता बॉ. काही ठि़काणी आरामात प्रतिसाद येत असताना ह्यात एकदम भराभर प्रतिसाद आले.

तुम्ही तोडलेले बहुतेक नियम हे कॉलेज जीवनातील आहेत. (म्हणजे त्यावेळीच घडू शकतात) बाकी रस्त्यावरील किंवा नेहमीचे नियम त्या वयात तोडले तर तेव्हा (आणि काही वेळा आजही) काही वाटत नाही. एक गंमत वाटते.

परंतु नंतरही भरपूर वेळा फक्त मी नियम तोडू शकतो हे दाखविण्यासाठी, किंवा (काही लोकांना) नियम तोडल्याबद्दल एक वेगळाच (असूरी ?) आनंद मिळतो त्याचे वाईट वाटते.

माझे काही अनुभव...
१. आमच्या वसतीगृहात रात्री १० नंतर प्रवेशाला बंदी होती. तरीही काही मुले रात्री चित्रपट बघून भिंतीवरून उड्या मारून परत येत.

२. प्रथम वर्षात होळी ला सुट्टी दिली नाही तर (तरीही?)एकही मुलगा कॉलेजला गेला नाही.

३. हॉस्टेलचे रेक्टर फार नियम पाळायला लावायचे तर एक दिवस रात्री त्यांच्या खोलीला (ते आत झोपले असताना)२-२ कुलुपे लावून ठेवली. आणि त्यात भर म्हणजे त्या सकाळी एक ही मुलगा हॉस्टेलला थांबला नाही. (नाही तर कॉलेज बंक करणारे भरपूर.)
आणखी ही आठवून लिहीन...

गुंडोपंत's picture

22 Oct 2007 - 5:59 pm | गुंडोपंत

देवदत्ता प्रतिसाद पाहून बरे वाटले!
ते आत झोपले असताना)२-२ कुलुपे लावून ठेवली.

भले शाब्बास!
आम्ही कुलुपे कापयचो तुम्ही लावायचे! ;)))

तुम्ही तोडलेले बहुतेक नियम हे कॉलेज जीवनातील आहेत. (म्हणजे त्यावेळीच घडू शकतात)
हेच तर म्हणतोय मी कधीचा... तर हे मला एकदम व्हिलन ठरवताहेत :(

परंतु नंतरही भरपूर वेळा फक्त मी नियम तोडू शकतो हे दाखविण्यासाठी, किंवा (काही लोकांना) नियम तोडल्याबद्दल एक वेगळाच (असूरी ?) आनंद मिळतो त्याचे वाईट वाटते.

मलाही वाईट वाटते.

आपला
गुंडोपंत

जुना अभिजित's picture

22 Oct 2007 - 6:33 pm | जुना अभिजित

गुंडोपंतांचा भार थोडा हलका करतो..

दांडीया बघायला आम्हाला केवळ १० वाजेपर्यंत मुदत दिली होती. होस्टेलच्या वॉचमनने पुढच्या दाराला कुलुप लावले होते. मग आम्ही ७-८ जण बाथरूमच्या खिडक्यांचे गज वाकवून बाहेर गेलो होतो.

एकदा खूप उशीर झाला म्हणून वॉचमनने दार उघडले नाही. मग जवळच बास्केटबॉलचे कोर्ट होते तीथेच उघड्या आकाशाकडे बघत गप्पा मारत झोपलो. (तेव्हा परत बाथरूममधून आत आलो नाही.)

इंटरकॉलेज स्पोर्टसला खोखोच्या मॅच वरून भर मैदानात प्रचंड धुमाकूळ घातला होता. अर्थात पाईप, बाटल्या, काठ्या आधीच बाजूला लपवून ठेवल्या होत्या.

सर्व वर्गमित्र दापोलीहून मुरुडला चालत गेलो होतो भर पावसात. तेव्हा रस्त्यातल्या प्रत्येक फलकावर चिखल उडवला होता. आणि प्रत्येक गाडीवाल्याला वेडावून दाखवत होतो.

रंगपंचमीला रंगलेल्या बनियन फाटक्या अवतारात कॉलेजमध्ये घुसत होतो. पण सरांनी दम दिला म्हणून माघारी फिरलो. :-(

फ्रेंडशिप डेला एका मुलीला १५ जणांनी एकाचवेळी ईक्लेअर्स दिले होते. काय लकी आहे ती. अजूनही मैत्री टिकून आहे बरंका.

बर्‍याच क्षुल्लक कारणावरून केलेले उपद्व्याप आता आठवत देखिल नाहीत.. प्रत्येक चौकशी समितीमध्ये आमची चौकशी व्हायचीच. डिबार होण्यापर्यंत मजल गेली होती.

उपद्व्यापी अभिजित आणि त्याची टोपणनावे अभ्या/एपी/चड्डी/भेंडी/ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस/टीचर(एका मुलीला काही टीप देताना आमच्या वात्रट मित्रांनी पाहीले आणि त्या क्लासला अभिजित सर की क्लास असे नाव पाडले)

प्रकाश घाटपांडे's picture

22 Oct 2007 - 6:51 pm | प्रकाश घाटपांडे

प्रत्येकाने आयुष्यात रुखरुख लागेल अशा गोष्टी कळत नकळत केलेल्याच असतात. फक्त सांगायचे धैर्य लागते ते प्रत्येकाकडे असेलच असे नाही. म्हणून चर्च मधील 'कनफेशन' आवडते. आपल्याकडे गंगास्नान करुन ते धुउन काढायची सोय आहे. मनात साचत राहिल्या तर कुजत जातात आणि त्याचा खूप त्रास होतो. स्वतःला आणि इतरांनाही. त्यापेक्शा "मोकळे" व्हा. बालगंधर्व पूलाजवळ प्र के अत्र्यांच्या पुतळयावर चे वाक्य कुणाला आठवते का?
मला आठवत नाहि पण आशय आठवतो. स्वतःशी प्रामाणिक असणं. त्यांच्या आणि वनमाला बद्द्ल बर्‍याच वावड्या होत्या. खरं काय खोट काय देव जाणे.
अष्टादश पुराणेषु।
व्यासस्य वचनद्वयम॥
परोपकाराय पुण्याय
पापाय परपीडनम॥

यामुळे तरी तात्या व्यासांना माफ करतील.

प्रकाश घाटपांडे

राजे's picture

23 Oct 2007 - 9:21 am | राजे (not verified)

"प्रत्येकाने आयुष्यात रुखरुख लागेल अशा गोष्टी कळत नकळत केलेल्याच असतात. फक्त सांगायचे धैर्य लागते ते प्रत्येकाकडे असेलच असे नाही. म्हणून चर्च मधील 'कनफेशन' आवडते "

सहमत.

विषय एकदम मस्त होता पण नियमावर बोट ठेवणा-यानी वाट लावली, अहो जरा हसत-खेळत घेतले तर काय बिघडले ? सामान्य जिवनामध्ये तुम्ही कसे आहात हे कोणी थोडेच पहावयास येत आहे तुमच्या कडे ?
आनंद घेण्यासाठी वाचा व आवडले तर प्रतिसाद द्या... बस .. सगळेच नियम पाळतात कधी कधी चुकून अथवा मजा म्हणून नियम तुटला तर हरकत काय ? येथे आमच्या कडे एक ही नियम चुकला / तोडला तर लगेच दंड आहे [पावती मिळेल ह्याची काही खात्री देत नाही] दिल्ली मध्ये टप्प्या-टप्प्यावर बगळे उभे असतात त्यामुळे चुकून ही नियम मोडला तर दंड आहेच नक्की.

पुणे काय बोलावे , जेथे शिरस्त्राण विरोधी मोर्चा निघाला होता तेथे काय नियमांची अपेक्षा करावी ;}
जेव्हा ही पुण्यात गेलो आहे तेथे असे वाटते वाहतूकीचे नियम हे नाहीच आहेत त्या पेक्षा आमचे कोल्हापूर बरे.. विमानतळापासून थेट स्वारगेट पर्यंत वाहतूक देवाच्या कृपेने चालत असावी असे वाटावे अशी दशा.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

आजानुकर्ण's picture

23 Oct 2007 - 9:46 am | आजानुकर्ण

कन्फेशन मध्ये केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप झालेला असतो. सदर लेखात पश्चात्तापाची छटा दिसते का?
प्रामाणिकपणा म्हणाल तर मटक्याच्या धंद्याइतका प्रामाणिकपणा व दुसर्‍यावर असलेला विश्वास दुसर्‍या कोणत्या व्यवसायात असेल असे वाटत नाही.
पण त्यामुळे तो धंदा श्रेष्ठ ठरत नाही.

घाटपांडे काका, तुम्ही हा प्रतिसाद कृपया वैयक्तिक घेऊ नये .

सहज's picture

22 Oct 2007 - 7:10 pm | सहज

अत्यंत प्रामाणीक मत हवे आहे.

कालच्या / आजच्या दिवसाच्या (किंवा आठवड्याच्या) तुमच्या भविष्यात - मनःस्ताप होईल, जपून बोलावे, आपल्यांकडुनच/हितशत्रुंकडून त्रास, शत्रुपीडा संभवते, विचारांती निर्णय घ्या (अशी पोस्ट टाकायची का नाही), पश्चाताप होईल, सतर्क रहा आपल्या मागे शुक्लकाष्ठ लावून घेऊ नका, बेसावध राहू नका, ग्रहस्थीती अनूकूल नाही, धाडस नको, इ. इ. काही होते का हो?

आता तुम्हाला ह्यातले काहीच झाले नाही असे म्हणालात तर ..... :-) निदान तब्येत (डोळे) सुधारेल पण काळजी घ्या, ताण नको इतके तरी असावे असे वाटते :-)

आता तुम्ही ह्यातले काहीच नाही असे म्हणालात तर मग बहूतेक ही पोस्ट वाचणार्‍यांचा भविष्यावरचा विश्वास उडायची संभावना, हे आमचे भाकीत ;-)

गुंडोपंत's picture

23 Oct 2007 - 9:27 am | गुंडोपंत

"सहज ज्योतिष वर्ग"
:)))

वा अगई पेशल ज्योतिषाच्या भाषेत लिहिलेत... तुम्ही खरच लिहिता की काय?
मजा आला!
मी एका छोट्याश्या वर्तमानपत्रासाठी काम करायचो तेंव्हा 'अश्याप्रकारचे' लिखाण केले आहे.

"कोंबड्यांनो,
आता अजून घेवू नका मला पेपर मध्येही खोटे लिहिले म्हणून!" ;))))

आपला
गुंडोपंत

प्रकाश घाटपांडे's picture

23 Oct 2007 - 10:27 am | प्रकाश घाटपांडे

मी एका छोट्याश्या वर्तमानपत्रासाठी काम करायचो तेंव्हा 'अश्याप्रकारचे' लिखाण केले आहे.

माधव गडकरींनी देखील अशा प्रकारचे लेखन केले आहे. ज्योतिषी रजेवर वा उपल्ब्ध नसेल त्यावेळी>
प्रकाश घाटपांडे

गुंडोपंत's picture

23 Oct 2007 - 10:32 am | गुंडोपंत

घाटपांडे साहेब,
इतक्या थोर माणसाशी तुलना करण्या इतकी लायकी नाहीये हो या गुंड्याची.

मी एक सामान्य वकुबाचा नि सुमार बुद्धीचा माणूस आहे.
वेळ आली म्हणून घेतला पेन नि लावला कागदाला इतकेच!

आपला
बुद्धुपंत

सहज's picture

23 Oct 2007 - 10:40 am | सहज

लिहलय तुम्ही बरेचदा वाचले. "मी एक सामान्य वकुबाचा नि सुमार बुद्धीचा माणूस आहे"

"न्यूनगंड वाटेल, आत्मविश्वासाचा अभाव" हे वार्षीक भविष्य म्हणायचे का? :-)

गुंडोजी नियमभंगाची गोळी घ्या पाहू , लगेच एक!! अशी तरतरी येईल बघा!!

गुंडोपंत's picture

23 Oct 2007 - 10:50 am | गुंडोपंत

पेटंट वाक्य आहे ते माझे! :)))

अहो आहेच मी तसा...
जरा मट्ठसा, रस्त्यावरचा मवाली वाटेल असा.

उगाच 'मी लै भारी' हे तसे नसतांना म्हणण्यात काय अर्थय हो?

आणि असे 'दाखवणारे' पडले आहेत ना पैशाला पासरी इथे त्यात आपण कुठे जाता अजून... नाही का?
त्यापेक्षा आपण आपले अंथरूण ओळखून रहावे असे!

आपला
गुंडोपंत

प्रकाश घाटपांडे's picture

23 Oct 2007 - 10:58 am | प्रकाश घाटपांडे

गुंडोजी नियमभंगाची गोळी घ्या पाहू , लगेच एक!! अशी तरतरी येईल बघा!!

धन्वंतरी सहजाचार्यांशी सहमत. त्याला आम्ही सविनय कायदेभंग म्हणू . म्हणजे गांधीजींचे अधिष्ठान येईल. पुढे त्याचे प्रतिष्ठान देखील करता येइल. अनुष्ठानाची सुरुवात आतापासूनच करा. मिसळ पावावर तर्री चापा.

प्रकाश घाटपांडे

प्रकाश घाटपांडे's picture

23 Oct 2007 - 10:43 am | प्रकाश घाटपांडे

ज्योतिषाचा कॉलम लिहिणारी व्यक्ती उपलब्ध नसताना संपादकांना ते ज्योतिषातल्या तांत्रिक चुका न करता लिहिणे हे सर्व संपादकांना जमते असे नाही.
प्रकाश घाटपांडे

देवदत्त's picture

23 Oct 2007 - 10:59 am | देवदत्त

ह्यावरून ऐश तू कर हे देवांग पटेल चे गाणे आठवले.

ऐश तू कर यारा ऐश तू कर... दुनिया जाए तेल लेने ऐश तू कर :)

असेच एकदा लाईट गेल्यावर आम्ही जोरजोरात गाणे म्हणत (की ओरडत? ) होतो.. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब. तेवढ्यात लाईट आली आणि रेक्टर ने आम्हाला सर्वांना पाहिले. मग काय... स्वत:च्या खोलीमध्ये बोलवून जाब विचारला. मी आपले साधे सरळ (आणि खरे) उत्तर दिले. इतर मुले गात होती मग मी ही सामिल झालो.

आता बंगळूर ला होतो तेव्हा गेस्ट हाऊस च्या मालकाने नियम लिहिला होता... स्वत:ची विजेची उपकरणे वापरल्यास परवानगी घ्यावी. आता नाहक १०० रू जादा कोण भरणार? (वाटल्यास मी ते भरण्यास तयार होतो. कारण त्यात इतर उपकरणेही आली वापरता असती.)
मग एका इस्त्रीचा आम्ही ३/४ मुले लपून छपून वापर करत होतो.

तेच आधी जेवण बनविण्यास ही बंदी होती. मग हळू हळू सगळया खोल्यांत तेही सुरू झाले.
पण एक नक्की.... हे सर्व नियम तोडण्यास मजा येते म्हणून नाही केले.