मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अर्धसत्य..

विसोबा खेचर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मूळ कविता - दिलिप चित्रे अनुवाद - तात्या अभ्यंकर. अर्ध सत्य.. चक्रव्युहात घुसण्यापूर्वी कोण होतो मी, कसा़ होतो हे मला माहीत नसेल.. चक्रव्युहात घुसल्यानंतर माझ्या आणि चक्रव्युहादरम्यान फक्त एक जवळीक होती जीवघेणी - हे मला कळणारच नाही चक्रव्युहातून बाहेर पडल्यावर भले ही मी मुक्त होईन.. तरीही चक्रव्युहाच्या रचनेत काहीच फरक पडणार नाही.. मरू की मारू? मारला जाईन की जीव घेईन? याचा कधी निर्णयच होणार नाही.. झोपलेला मनुष्य जेव्हा झोपेतून उठून चालायला लागतो, तेव्हा त्याला स्वप्नांचा संसार दुसर्‍यांदा कधीच दिसणार नाही.. निर्णयाच्या त्या प्रकाशात सर्व काही सारखं असेल का? एका पारड्यात नपुंसकता आणि एका पारड्यात पौरुष आणि तराजुच्या काट्यावर मधोमध, अर्धसत्य..!

वाचने 5055 वाचनखूण प्रतिक्रिया 8

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/26/2011 - 17:43
मूळ कवितेचे कवि म्हणून चित्रेंचे नाव दिसते आहे. मूळ कविता कोणत्या भाषेत आहे? कारण ज्याअर्थी अनुवादकाचे नाव आहे त्या अर्थी मूळ कविता मराठीत नाही. असो. छान कविता आहे. समोर आणल्याबद्दल तात्याचे आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/26/2011 - 17:53
तात्या, अनुवादित कविता आवडली अजून येऊ दे........! (मूळ कविता दिली असती तर जाणकारांनी काही भर घातली असती किंवा काही उणिवा सांगितल्या असत्या असे वाटले) -दिलीप बिरुटे (तात्याच्या लेखनाचा फ्यान)