अर्धसत्य..
मूळ कविता - दिलिप चित्रे
अनुवाद - तात्या अभ्यंकर.
अर्ध सत्य..
चक्रव्युहात घुसण्यापूर्वी
कोण होतो मी, कसा़ होतो
हे मला माहीत नसेल..
चक्रव्युहात घुसल्यानंतर
माझ्या आणि चक्रव्युहादरम्यान
फक्त एक जवळीक होती जीवघेणी -
हे मला कळणारच नाही
चक्रव्युहातून बाहेर पडल्यावर
भले ही मी मुक्त होईन..
तरीही चक्रव्युहाच्या रचनेत
काहीच फरक पडणार नाही..
मरू की मारू? मारला जाईन की जीव घेईन?
याचा कधी निर्णयच होणार नाही..
झोपलेला मनुष्य जेव्हा झोपेतून उठून
चालायला लागतो,
तेव्हा त्याला स्वप्नांचा संसार
दुसर्यांदा कधीच दिसणार नाही..
निर्णयाच्या त्या प्रकाशात
सर्व काही सारखं असेल का?
एका पारड्यात नपुंसकता
आणि एका पारड्यात पौरुष
आणि तराजुच्या काट्यावर मधोमध,
अर्धसत्य..!
मरू की मारू? मारला जाईन की जीव घेईन?
याचा कधी निर्णयच होणार नाही..
झोपलेला मनुष्य जेव्हा झोपेतून उठून
चालायला लागतो,
तेव्हा त्याला स्वप्नांचा संसार
दुसर्यांदा कधीच दिसणार नाही..
निर्णयाच्या त्या प्रकाशात
सर्व काही सारखं असेल का?
एका पारड्यात नपुंसकता
आणि एका पारड्यात पौरुष
आणि तराजुच्या काट्यावर मधोमध,
अर्धसत्य..!
वाचने
5055
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
मूळ कवितेचे कवि म्हणून
In reply to मूळ कवितेचे कवि म्हणून by llपुण्याचे पेशवेll
आणि इथे चित्रपटातील मुळ दृष्य
वॉव....!!!
In reply to वॉव....!!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत आहे
In reply to वॉव....!!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+२
सर्वांचे आभार.. (किंचित कवी)
(किंचित कवी) तात्या,
तात्यांच्या