कॉफी विथ करन ...भारताचे भूषण ए. आर. रेहमान
कॉफी विथ करन ...भारताचे भूषण ए. आर. रेहमान
अशीच एक मुंबईतील सकाळची घाईगर्दीची वेळ. यशराज स्टुडियोच्या गेटजवळ कचकचकच् आवाज करत आलिशान गाड्या एकामागोमाग थांबतात. येणारे पाहुणे उतरतात. आपल्या आवडत्या कलाकाराला बघण्यासाठी सेक्युरिटी गेटवर एकच तोबागर्दी केलेल्या फॅन्समधून वाट काढत, काळ्या कोटातील सूटबुटातील एक व्यक्ती झरझर चालत सेक्युरिटीकडे बघुन हात उंचावत इमारतीमधे लिफ्टकडे वळते. लिफ्टच्या आगमनाच्या प्रतीक्षेत सुरवंटासारखी रांग तिथे वाट पाहते आहे, त्या रांगेत ही व्यक्ती उभी राहते. लिफ्टचा दरवाजा वर जायला उघडतो. क्यूमधे थांबून राहिलेल्या लोकांची पर्वा न करता अचानक एकजण लिफ्टमधे घुसू बघतो.
"येक्स्क्यूज मी मिस्टर, पीप्पळ् आर वेईटिंग इन् क्यू. कॅन् यू प्लीस् बी इन दि क्यू?" शांत पण निश्चयाचा आवाज आला. मधे जाऊ पाहणारी व्यक्ती गडबडून जाऊन मागे वळून पहात म्हणते, "सॉरी, बट होप यू नो मी. आय हॅव टू गो अर्जंटली. माझे शूटींग सुरू होणार आहे." आपल्या मोबाईल फोनवरून नजर न हटवता काळ्या कोटातल्या व्यक्तीच्या नम्र आवाजाला धार येते. "आयेम् सॉऽरी... यू हॅव टू ऑऽनर दि क्यू सिस्टीम..."
... प्रसंग ओळखून शूटींगवाल्याने धीर धरला, तो गुमान रांगेत जाऊन उभा राहिला. नंतर काही वेळाने लिफ्टमधे शूटींगवाल्याने काळ्या कोटवाल्याला हस्तांदोलन करण्यास हात पुढे करून स्वत:ची ओळख करून दिली... "माय नेम इज् करन जोहर..." "ओह्, यू आर करन जोहर, नैस्स् टू मिट्ट् यू..." स्मितहास्यांची देवाणघेवाण झाली...
....आणि मधे सेटवर त्यादिवशीच्या मुलाखतीच्या शूटींगची तयारी सुरु झाली. आज इथे काही विशष कार्यक्रम दिसतोय. नुकतेच 'जय हो' गीतासाठी अकॅडेमी अवॉर्ड मिळवलेले भारताचे भूषण ए. आर. रेहमान साहेब हे आजचे पाहूणे आहेत असे इतरांच्या बोलण्यातून कळतेय. मगाशी लिफ्टमधे घुसू पाहणारे करन जोहर त्यांची प्रकट मुलाखत घेणार असतात. लाईट?... साऊंड?...रेडी?.. व्हायच्या आत साहेब येतात, कोचवर विसावतात आणि मुलाखतीला सुरुवातही होते...
१० मिनिटांच्या शूटींगनंतर करन जोहरच्या मेकपसाठी विराम घेतला जातो. फावल्या वेळात कोचावर बसलेले साहेब प्रेक्षकांकडे बघतात. पहिल्या ओळीत विराजमान काळ्या कोटधारी व्यक्तीला खूण करून बोलावुन घेतात व त्यांच्या कानगोष्टी चालू होतात. नंतर प्रत्येक ब्रेकमधे असे घडते. साहेब आणि काळा कोटधारी तमिळ मधून बोलत असतात. दोघेही काहीतरी महत्त्वाचे बोलताहेत असे वाटते.
शूटींग संपते. साहेबांशी हस्तांदोलन करून शूटींग समाधानकारक झाल्याचे करन जोहर आनंदाने सांगितात व मगाशी फावल्या वेळात साहेबांशेजारी बसलेल्या, तमिळ मधून संभाषण करत असलेल्या त्या काळ्या कोटधारी व्यक्तीशी आपणहून हस्तांदोलनासाठी हात पुढे करून हसत हसत म्हणतात, "व्हेन् रेहमान इज देर, नोबडी ईव्हन लूक्स ऍट मी. सर, यू डिड्’ण्ट टेल् मी युवर् गुडनेम येट्?"
रेहमान साहेबांच्या चेहर्यावर नेहमीचे सुपरिचित स्मितहास्य दिसत होते... "हायकोर्ट मधे प्रॅक्टीस करणारे एक बहुभाषी, कॉपीराईट क्षेत्रातील तज्ञ ऍडव्होकेट...." असा काळ्या कोटधारी व्यक्तीचा परिचय दिला गेला. करन जोहर ह्यांनी स्वत:हून त्यांच्याशी बिझनेस कार्डस् ची देवाणघेवाण केली... मगाशीच लिफ्टजवळ घडलेला प्रसंग आठवून दोघांनी एकमेकांजवळ दिलगिरी व्यक्त केली...
...ती काळाकोटधारी व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून नाडीग्रंथातील भाषा-लिपींच्यावर अभ्यासकार्य करणारे.... हैयो हैयैयो होत....
प्रतिक्रिया
लेख ल्ह्यायची स्टाईल आवडली...
हाण तिचायला
हैयो हैयैयो ....
हेच म्हणतो...
करण जोहरचा चेहरा कसा झाला असेल त्या वेळेला , लै भारी!
लेखन वेगळे आणि छान! हैय्यो
(No subject)
सॉलीड
कोण हैयो हैयैयो ?
कोण हे हैयो हैयैयो ?
तुमचे नाडीव्यतिरीक्त जे लिखाण
हवाईदलातील किस्से-अनुभव लिहिले गेले आहेत
ओळख आवडली
हा हा
+१
असेच
माफ करा साहेब , पण हा तद्दन
डायरी डायरी प्लीज, पराभाउ काय
शशी, छान लिहिलं आहेस रे..!
+१
धन्यवाद,
पुण्याचा डॉ सलील कुलकर्णीही 'सामान्य' कॅटॅगरीतच
पुण्याचा डॉ सलील
( हा प्रसंग ओकसाहेबाना कसा
हॅट साला!
धन्यवाद,
लेख वाचताना सुरुवातीला थोडा
विश्वनाथाशी सहमत आहे. लेख
सहमत
सहमती ....
असहमत.
सहमत
हैयोहैयैयो कोण