भारतिय? जनता पार्टि आणी तिची तथाकथीत संस्कृती
अंक पहिला >>
निमीत्त होते मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या फेरीवाल्यांची सभा
या सभेत बी.जे.पी चे शहरअध्यक्ष पदावर असलेले "के राज पुरोहित" मुंबई इलाख्या मधुन जमलेल्या तमाम फेरीवाल्यांना (प्रामुख्याने भय्ये) यांना आपण किती हुशार/ शुर/ आणी अकलेचे कांदे आहोत हे आवेषात दाखवत होते...
(त्यानी त्यांची हुशारी आणी शुरपणा एक विद्यार्थी असलेल्या मुलीवर दाखवला)
मै राज पुरोहित, मै भारतीय जनता पार्टिका अध्यक्ष (छाती ठोकुन) मुंबे का प्रदेश अध्यक्ष यहा ये ऐलान करता हु की..जो कुछ उस सीडी मै दिखाया गया है वो सब झुट है !
ये गरीब हौकर्स के खिलाफ षडयंत्र है वो सीडी नकली है.
हे महाभाग महाराष्ट्रामध्ये राहून, महाराष्ट्रीयन लोकांची धिंड काढतायत,
त्या ठाण्यातील पाणीपुरीवाल्याच्या घटनेचा संदर्भ देताना ते म्हणाले, की एक गरीब बिचारा ७०/८० वर्षाचा म्हातारा मेहनत मजदुरी करीत आहे त्याला यात नाहक गोवल गेलं आहे "एखादी चांगली मुलगी एवढ्या मोठ्या माणसाला लघुशंका करताना पाहिल का ? अगदी रेड लाइट एरियातील बाईही एवढ्या मोठ्या माणसाला लघवी करताना बघणार नाही...इथे धडधडीत शिवी दिलीय( तेरि मा की ***) आणि ही पोरगी फोटो काढते... तिला काही लाज-शरम आहे की नाही ? असे शब्द पुरोहित यांनी वापरले आहेत या मुलीने नुसते पाहिले नाही, तर त्याचे शुटिंगही केले. हे करताना तिला शरम नाही का वाटली? यावरूनच तिच्या चारित्र्याची कल्पना येते. हे शुटिंग म्हणजे मुंबईत मेहनत करणा-यांविरुद्धचा डाव आहे.
हुशारी संपली आता अंक दुसरा>>
वरील प्रकारे आपली अक्कल पाजळवल्या नंतर साहजीकच कु.अंकिता राणे आणी तिचे कुटुंबिय यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात पुरोहित यांच्याविरूद्ध लेखी तक्रार दाखल केलि यात मनसे ने सुद्धा सपोर्ट केला आहे.
म न से ने पुरोहित यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत अशी बेताल वक्तव्य करणा-या राज पुरोहित यांना अटक करावी, अशी मागणी लावून धरली आहे,
पोलीस ठाण्यात पुरोहित यांच्याविरूद्ध लेखी तक्रार केल्यानंतर राज पुरोहिताना उपरती झाली.
( उपरती कसली घाबरला)
संध्याकाळी वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्यांनी सपशेल लोटांगण घालत माफीनाम्या ची भाषा केली. अंकिता राणे हिच्याबद्दल आपण जे काही बोललो ते भावनेच्या भरात बोललो, हे गैरसमजुतीतून घडले बऱ्याच दिवसा पासुन कुणीतरी माझे विरुद षडयंत्र करत आहे (हा घाणेरड्या राजकारण्याचा कळसच).
त्या भय्याला मी ओळखत सुद्धा नाही ना मी कधी अंकीता राणेला भेटलोय.
( मग कसली शहानिशा न करता ही अशी मुक्ताफळे का बरं उधळली??) (खोटरडे साले)
माझ्या मुले अंकिता बेनच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी बिनशर्त माफी मागतो, असे पुरोहित ने स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर शक्य झाल्यास अंकिताची भेट घेऊन लेखी माफी मागण्याची आपली तयारी आहे,असेही सांगीतलेय.
मध्यंतरी काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी राजकारण करत पाणीपुरीवाल्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती.(शेवटि एक भय्याच भय्याच्या मदतीला) त्यांनी असे केल्यानंतर भाजपने पण स्वत:ची वोट बँक वाचवण्यासाठी पाऊल उचलले आणि त्यांच्या पेक्षा काहीतरी वेगळं केलं हे दाखवण्यासाठि थेट अंकिता राणेच्या हिच्या चारित्र्यावरच हल्ला केला. भर सभेत राज पुरोहित यांनी वाजवलेल्या ढोल मुळे पाणीपुरीवाल्यांच्या भरपुर टाळ्या पडल्या असल्या तरी सदर प्रकरण त्याना चांगलच महाग पडणार आहे असं दिसतयं,
बाकी पुरोहित हे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गटातील आहेत, अजुन यावर भाजपच्या जेष्ठ नेत्यानी
(गडकरी/ मुंडे/ अडवाणी) तोंड खोललेलं नाही.
व्हिडीयो इथे पहायला मिळेल.
(http://starmajha.starnews.in/videos/mumbai/5006-2011-05-05-12-38-51)
नेहमी स्वतःच भारतीय संस्कृती चे ढोल वाजवणाऱ्या भारतियजनतापार्टि च्या सु-संस्कृत पणाची ही
पहीलीच वेळ नाही, या अगोदर सुद्धा या पार्टी चे राष्ट्रीय प्रदेश अध्यक्ष मुक्तार अब्बास नक्वी यांनी २६/११ च्या हल्ल्यात मृतांना श्रध्दांजली देण्यासाठी आलेल्या स्त्रीयांना
"लिपस्टिक ओर पावडर लगानेवाली ओरतें मोमबत्ती लेके रस्ते पे उतरी है" असं वक्तव्य केलं होतं..
स्त्रीयांची विटंबना करणं हे कधी थांबवनार???
श्रध्दांजली वाहण्याचे तारतम्य तरी त्या स्त्रीयांनी दाखवले,पण भाजपच्या हाती सत्ता असताना त्यांनी शहीदांसाठी मेणबत्त्या तर लावल्या नाहीच पण दहशतवाद रोखण्यासाठी काय दिवे लावले ते साऱ्या देशाला माहित आहे शहिदांच्या शवपेट्यांच्या खरेदित भ्रष्टाचार करुन शहिदांच्या टाळु वरील लोणी खाण्याचा घ्रुणास्पद प्रकार यांनी केला आहे
बाकी सत्तेची नशाच न्यारी पक्षात टिकुन राहण्यासाठी आणी आपली खुर्ची वाचवण्यासाठी जनतापार्टी च्या पदाधिकाऱ्याना फारच कसरत करावी लागलीए...फक्त पक्ष श्रेष्ठींची आपल्यावर मर्जी रहावी म्हणुन एका स्त्री ची झालेली विटंबना याबद्दल त्यांना एक स्त्री असुन सुध्दा काहीच वाटत न्हवते..
पहा बिजेपीच्या महिला आघाडिच्या अध्यक्षा मिनाताई (आडनाव कळु शकले नाही) म्हणतायत आता हा विषय किती वाढवायचा? त्यांनी माफी मागीतली आहे..राजीनामा कशाला मला या वादात पडायच नाही..
भाजप प्रवक्त्या शायना एन सी : पुरोहितच मत हे त्याच वैयक्तीक मत आहे त्याचा पक्षा शी काही संबंध नाही..आणी मि त्या पक्षात असल्यामुळे त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार मला नाही तो निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील यावर आपलं वैयक्तीक मत काय आपण जर सदर पक्षात नसता तर राजीनामा मागितला असता का? यावर ही त्यांनी भाष्य करायच टाळलं.
शिवसेनेच्या नेत्या निलम गो-हे यांनी तर कहरच केला त्यांच (पुरोहित) स्लिप ओफ टंग झालं आहे.
तसेच राजीनामा घ्यायचा का नाही हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, आम्ही काय बोलनार??
यावर आपलं वैयक्तीक मत काय असेल आपण जर मित्र पक्षात नसता तर राजीनामा मागितला असता का? यावर त्यांनीही भाष्य करायच टाळलं.
आणी शेवटि राजीनाम्याची मागणी कुणीच केली नाही..
सत्ताधाऱ्या कडुन नेहमी उठसुठ राजीनाम्याची मागणी करणाऱ्या निलम गो-हे आज अशा एका एकीका बदलल्या?आपण ही एक स्त्री आहोत हे ही त्या विसरल्या?
बाकी हेच जर यांच्या विरोधकां पैकि कुणी केलं असतं तर यांनी रान उठवलं असतं .
एका स्त्री ची विटंबना करून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून फक्त माफी मागायची म्हणजे सगळं संपल असं म्हणायच का?
( उद्या कुणी बलात्कार करुन माफीही मागेल sorry बोलेल त्याने प्रश्न मिटेल का?)
अवांतर : महालक्ष्मी मंदीर गाभ्याऱ्यात स्त्रीयांना प्रवेश नाकारावा यासाठी काही सनातनी स्त्रीयांही होत्या/ आणी सध्या उपोषण करत आहेत त्यांच्यात आणी वरील स्त्रीयांच्या वृत्तीत फारसा फरक नसावा
अतीअवांतर : महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्रीयन लोकांची त्यांच्या आई/ बहिनींची विटंबना हे उघडपणे करतातच कसे ????
पुरोहितच मत हे त्याच वैयक्तीक मत आहे त्याचा पक्षा शी काही संबंध नाही..असं बोलायची तर आता फैशनच झाली आहे,पुरोहिताने वक्तव्य करताना आपण कोण? कुठे काय बोलत आहोत याचे सुध्दा भान ठेवले नाही निर्लज्ज पणाचा अगदी कळसच गाठला बेशरम पणा कसा असु नये याचा हे उत्तम उदा. आहे..
नेहमी छत्रपतीं चे स्त्री दाक्षीण्याचे दाखले देणाऱ्या आणी राजकारण करणाऱ्या मित्र पक्षाची ही यावर काय भुमीका आहे ते अजुन समजलेले नाही
जाताजाता: सत्तेच हाडूक मिळविण्यासाठी सगळेच लाचार असतात याची पुन्हा एकदा जाणीव झाली.:)
याद्या
4783
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
मला वाटत राज पुरोहित अस बोलले
खर तर कोण राज पुरोहित हीच
In reply to मला वाटत राज पुरोहित अस बोलले by माझीही शॅम्पेन
श्री.राज पुरोहित यांचा जाहीर सत्कार
In reply to मला वाटत राज पुरोहित अस बोलले by माझीही शॅम्पेन
चर्चा वैयक्तिक पातळीवर घसरत
In reply to श्री.राज पुरोहित यांचा जाहीर सत्कार by अजातशत्रु
उलट्या बोंबा..
In reply to चर्चा वैयक्तिक पातळीवर घसरत by माझीही शॅम्पेन
आणि निलम गोर्हे सारखी नाटकी
हरामखोर...
तर्क!!
In reply to हरामखोर... by चिगो
कृपया जरा मराठीतून लिहा हो!
In reply to तर्क!! by प्रदीप
धन्यवाद
In reply to कृपया जरा मराठीतून लिहा हो! by चिगो
स्टार माझाच्या न्यूजवर पाहिलं
मिसळपाव वर वावरणार्या एका
"तांब्यातले अमृत"
पाणीपुरी
त्या भैया ची..
मला वाटत राज पुरोहित अस बोलले
विजुभाउंना
In reply to मला वाटत राज पुरोहित अस बोलले by विजुभाऊ
जाताजाता: सत्तेच हाडूक
इमानी आणी लाचार आठवले..
In reply to जाताजाता: सत्तेच हाडूक by मृगनयनी