Skip to main content

आला पहा कवी तो -

लेखक विदेश यांनी शनिवार, 30/04/2011 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
आला पहा कवी तो - आला पहा कवी तो - उलट्या दिशेस पळतो पाहून त्यास जो तो ! इकडून सिंह आला ; तिकडून बघ कवी तो सिंहासमोर जो तो जबड्यात शिरु पहातो ! का वाटते कवीचे भय फार सज्जनाला वाळीत का कवीला तो टाकण्यास बघतो ! जखमी कधी कुणाला ना वार करि कुणावर अध्यात ना कुणाच्या मध्यात तोच नसतो ! आली जरी त्सुनामी ; लाटांवरी तियेच्या हळुवार तो मनाने कविता करीत असतो ! ती एक ठेच साधी जखमी तुम्हांस करते डोळ्यात अश्रु कविच्या - कवितेतुनी टपकतो !!
काव्यरस

वाचने 1658
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

गमतीदार. का वाटते कवीचे भय फार सज्जनाला वाळीत का कवीला तो टाकण्यास बघतो ! कवीविषयी सहानुभूती चांगली मांडली आहे. कवी लोक तसे बऱ्यापैकी निरुपद्रवी असतात...

एके दिवशी काय जाहाले ... एके दिवशी काय जाहाले ... विदेश म्हणतो देशी ला .. विदेश म्हणतो देशीला .. अग किती चढशील ? देशी म्हणे विदेश ला .. करशील का आता कविता करशील ?