बरसणार्या मेघधारांना वार्यावर पेटतांना
पहायचेय तिला एकदा या पावसात भिजतांना
सरीवर सर कोसळून हे कृष्ण मेघ गडगडतांना
पहायचेय तप्त धरेसह माझ्या मनास निवतांना
रुसलेल्या गुलाबाच्या कळीला हलकेच उमलतांना
पहायचेय क्षितिजावरील इंद्रधनुष्यातील सप्तरंगांना
ग्रीष्माचा दिवस सारून श्रावणसांज अवतरतांना
पहायचेय जाईवेलास फिरुनी तरुण होतांना
ओलेत्याने तिला माझी कविता गुणगुणतांना
पहायचेय मोहरून तो कोकीळकंठ पालवतांना
पहायचेय तिला एकदा या पावसात भिजतांना
पहायचेय तिने मला एकदा, मी तिला चिंबून पाहतांना
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२०/०४/२०११)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2695
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे
कशा खाली चिंबून ??
In reply to अरे by निनाद
रीतसर प्रतिसाद खाली दिलेला
In reply to कशा खाली चिंबून ?? by मिसळलेला काव्यप्रेमी
मी तीला ओलीचिंब पहाताना कसे
In reply to रीतसर प्रतिसाद खाली दिलेला by गणेशा
मस्तच....
फिरुनी तरुण होतांना
हं!
In reply to फिरुनी तरुण होतांना by रामदास
अवघड आहे!!
In reply to हं! by निनाद
काय
In reply to फिरुनी तरुण होतांना by रामदास
हे
असेच म्हणतो सरीवर सर कोसळून
In reply to हे by निनाद
वा.. एप्रिलमधेच उकाडा मे
मिका: खल्लास केले तुम्ही.
वा वा वा !