Skip to main content

कविता माझी

लेखक निनाव यांनी रविवार, 17/04/2011 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
वय धावते आहे तरी, कधी वेळ थांबतेच मग कितीही ठरविले लिहायचे नाही, तरी पेन उचलले जाते धडपडच सुरु होते माझ्या मनी मग असंख्य लाटांची आणि उतरते मग त्यातून सावरत.. नाजुक कविता माझी .. सुंदर मउ पायांनी .. अलगद पाउले टाकत उघडून दार मनाचे बाहेर डोकावत थांबते, थोडी लाजते मग पुन्हा नजर उचलून बघते माझ्या डोळ्यात स्पर्शते मन माझे..अन ऐकते स्पंदन हृदयातले डोळे माझे निजतात शब्द माझे पोहोचतात भावनांच्या खोल समुद्रात माझेच मला कळत नाही मग भान वेळे चे उरत नाही मग अन उतरते ती हळुवार विश्वात माझ्या .... कविता माझी !
लेखनविषय:

वाचने 1669
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

लग्ना अगोदर असे झाले होते
वय धावते आहे तरी, कधी वेळ थांबतेच मग कितीही ठरविले लिहायचे नाही, तरी पेन उचलले जाते धडपडच सुरु होते माझ्या मनी मग असंख्य लाटांची आणि उतरते मग त्यातून सावरत.. नाजुक कविता माझी ..
. . लग्ना ठरल्यावर असेच होत होते
सुंदर मउ पायांनी .. अलगद पाउले टाकत उघडून दार मनाचे बाहेर डोकावत थांबते, थोडी लाजते मग पुन्हा नजर उचलून बघते माझ्या डोळ्यात स्पर्शते मन माझे..अन ऐकते स्पंदन हृदयातले
. . . . लग्न होन्याच्या क्षणी असे वाटुन गेले.
डोळे माझे निजतात शब्द माझे पोहोचतात भावनांच्या खोल समुद्रात माझेच मला कळत नाही मग भान वेळे चे उरत नाही मग अन उतरते ती हळुवार विश्वात माझ्या ....
..............
अन उतरते ती हळुवार विश्वात माझ्या ....
ही ओळ खुप आवडली, कसा विसरेन तो क्षण !

फार सुंदर रचना निनाव!! खुप खुप आवडली.... असच छान छान लिहीत रहा..... :)

अप्रतिम रचना निनाद ... खुप्प आवडली कविता .. खुप तरल भाव .. वाचतच रहावेत असे शब्द मनापासुन आवडली कविता.. वाचणखुण म्हणुन साठवलेली आहे कविता ... अप्रतिम असेच लिहित रहा... वाचत आहे ...