वय धावते आहे तरी,
कधी वेळ थांबतेच
मग कितीही ठरविले लिहायचे नाही,
तरी पेन उचलले जाते
धडपडच सुरु होते माझ्या मनी मग
असंख्य लाटांची
आणि उतरते मग त्यातून
सावरत..
नाजुक कविता माझी ..
सुंदर मउ पायांनी ..
अलगद पाउले टाकत
उघडून दार मनाचे
बाहेर डोकावत
थांबते, थोडी लाजते
मग पुन्हा नजर उचलून बघते
माझ्या डोळ्यात
स्पर्शते मन माझे..अन
ऐकते स्पंदन हृदयातले
डोळे माझे निजतात
शब्द माझे पोहोचतात
भावनांच्या खोल समुद्रात
माझेच मला कळत नाही मग
भान वेळे चे उरत नाही मग
अन उतरते ती
हळुवार विश्वात माझ्या ....
कविता माझी !
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1669
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
लग्ना अगोदर असे झाले होते वय
ह्हा हहा लै भारी परतिसाद
निनाव -उत्तमच कविता. सुंदर !!
आभार प्रकाश दा. :)
शब्द्च नाहित म झ जवळ डोळे
सुंदर...
अप्रतिम रचना निनाद ... खुप्प