मलबारी एग रोस्ट.
दुबईला लग्ना आधी आम्ही ऑफिस मधले ४ बॅचलर मित्र, पेइंगेस्ट म्हणुन एकत्र रहायचो. ४ खोल्यां पैकी २ खोल्या घरमालकाने भाड्याने दिल्या होत्या. त्या आम्ही चार मित्रांनी पटकावल्या होत्या. किचन वापरायची मुभा होती. पण शक्यतो ते जुम्मे के जुम्मेच वापरल जायचं. (नाही म्हणायला घर मालक जेव्हा सुट्टीत महिनाभर गोव्याला जायचा तेव्हा आमची चंगळ असायची.) त्यामुळे रोजच्या जेवणासाठी आम्ही मलबारी, पंजाबी, नेपाळी,पाकिस्तानी,मद्राशी अश्या वेग वेगळ्या होटेल्समध्ये वार लावले होते. (गोवन हॉटेल फक्त विकांतासाठी फिक्स असायच. ;))
दुबईत मलबार्यांची टपरीवजा हॉटेल पावसाळ्यात कोपर्या कोर्यात उगवणार्या कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी पसरलेली आहेत. आमच्या पैकी कुणी बाजीरावाची औलाद नसल्याने रोज चांगल्या हॉतेलात जाउन दुप्पट दाम मोजणे शक्य नव्हतं. त्यामुळेच कोपर्यावरचा स्वस्तातला 'तारुफ' मलबारी आम्हा गरीबांचा अन्नदाता होता. सकाळी २.५ दिर्हम मध्ये आमचा चहा नाश्ता आटोपायचा. ५० पैशांचा (फिल्स्) चहा, लच्छा पराठा सोबत चणा/मुगाची भाजी/खिमा/ऑमलेट/हाफ फ्राय/एग रोस्ट या पैकी काही तरी एक. किंवा मग कुठल्याही दक्षिण भारतीय हॉटेलात मिळणारे डोसा/इडली/वडा सांबर, अप्पम आदी पदार्थ. दुपारी जेवणात ४-५ दिर्हम मध्ये अनलिमिटेड (४ ला मोटा राईस आणि ५ ला बारीक राईस) थाळी मिळायची. तारुफ मलबार्याकडची बिर्याणी मस्त असायची. मी नेहमी तीच हाणायचो.
तर ह्या जुन्या आठवणी काढायच कारण असं की काल घरातला बहुतेक सगळा भाजीपाला खल्लास झाला होता. अगदी अडी नडीला साथ देण्यार्या बटाट्यांनी ही पाठ फिरवली होती. मोजुन ३ कांदे आणि २ टमाटि तेवढी बाकी होती. डिफ्रिजर उघडला तर तो पण 'आ'वासुन माझ्याकडेच पहायला लागला. दरवाज्यात ३ अंडी उरली होती. काल परवाच भुर्जी करुन झाली होती म्हणुन तो ऑप्शन पण बाद. आणि अचानक मलबार्याचा एग रोस्ट आठवला. नेहमीच्या बैदाकरी आणि अंडा भुर्जी खाउन कंटाळलेल्या माझ्या अंडेखाऊ बॅचलर मित्रांसाठी हा झटपट तयार होणारा मलबारी एग रोस्ट.
साहित्यः
२-३ उकडलेली अंडी.
४-५ पाकळ्या लसुण बारीक चिरलेला.
१/२ इंच आलं बारीक चिरलेल.
१ लहान चमचा जिरेपुड.
१ लहान चमचा धणेपुड.
१ लहान चमचा गरम मसाला.
१ लहान चमचा लाल तिखट.
१ लहान चमचा काळीमीरीपुड.
१/२ लहान चमचा हळद.
१ लहान चमचा मोहरी.
३ मध्यम कांदे उभे चिरलेले.
२ टॉमेटो एकदम बारीक चिरलेले.
कढीपत्ता.
३-४ मिरच्या (ऐपती नुसार.)
कृती:
थोड्या तेलावर मोहरी, आलं, लसुण, मिरची, कढी पत्त्याची फोडणी करावी.
कांद्यासोबत मीठ टाकुन चांगला परतुन घ्यावं.
कांदा गुलाबी झाला की मग त्यात टॉमेटो टाकुन तो पार गळे पर्यंत शिजवुन घ्यावं.
नंतर त्यात वरील सर्व मासाले टाकुन चांगल परतुन घ्याव. मसाला खाली लागत असल्यास किंचीत पाणी टाकावं.
बाजुने तेल सुटायला लागल की उकडलेली अंडी अर्धी कापुन त्यात टाकावी.
चपात्या/पराठ्यांच्या सोबतीसाठी गरमागरम एगरोस्ट तयार आहे.
वाचने
17163
वाचनखूण
प्रतिक्रिया
48
चविष्ट दिसतंय. तुम्ही भलतेच
In reply to चविष्ट दिसतंय. तुम्ही भलतेच by शिल्पा ब
गप्प रहायचे ठरवले आहे . तरी ,
In reply to गप्प रहायचे ठरवले आहे . तरी , by टारझन
ज्याला जे हवं ते खावं असा
In reply to ज्याला जे हवं ते खावं असा by शिल्पा ब
असेच म्हणतो ..
फायनल डिश पेक्शा तयारीची डिशच
काय कांदा कापलाय, तिच्यायला
In reply to काय कांदा कापलाय, तिच्यायला by ५० फक्त
सगळ्या पाककृती करतान एक
उकडलेली अंडी मला आवडत नाहीत..
पाकृचे असे फोटो मला काढता
In reply to पाकृचे असे फोटो मला काढता by सूड
फोटो प्रमाणे अशी पाकृ मला
एक नंबर..
हे हे गनपा मि हि असच करते
अरे काय त्याच त्याच
मस्त , ते दिलाच्या शेपच अंड
In reply to मस्त , ते दिलाच्या शेपच अंड by आनंद
ते दिलाच्या शेपच अंड कुठ
In reply to ते दिलाच्या शेपच अंड कुठ by गणपा
उकडलेल्या अंड्याला काही
In reply to उकडलेल्या अंड्याला काही by आनंद
उकडून झालेले गरम अंडे टरफल
मस्त मस्त म्हणून थकलोय पण
गणपा अरे बाबा कुठे सुट्टीवर
गप्प रहायचे ठरवले आहे
In reply to गप्प रहायचे ठरवले आहे by असुर
ऑ?
In reply to ऑ? by सहज
त्यामुळे आजतरी तुमच्या मॅगीला
In reply to त्यामुळे आजतरी तुमच्या मॅगीला by टारझन
सध्यातरी मी माझ्या मॅगीमुळेच
सकाळचं जेवण सगळं
कांदा!
In reply to कांदा! by साती
एकंदर तुमच्या बाकीच्या पा.कृं
In reply to एकंदर तुमच्या बाकीच्या पा.कृं by गणपा
फॅन!
In reply to कांदा! by साती
कांदा फारच झाला आहे
In reply to कांदा फारच झाला आहे by अलख निरंजन
वरच्या कोपर्यात एक बोट चाटून
In reply to वरच्या कोपर्यात एक बोट चाटून by गणपा
उजव्या नाहि हो डाव्या
In reply to उजव्या नाहि हो डाव्या by अलख निरंजन
बॉर्र बॉ जशी तुमची मर्जी.
In reply to बॉर्र बॉ जशी तुमची मर्जी. by गणपा
माझी मर्जी नाही हो, मला दिसल
In reply to कांदा! by साती
?
बघणीय पाकक्रुती :)
उद्याच. आपल्याला
कल करे सो आज, आज करे सो अब
In reply to कल करे सो आज, आज करे सो अब by सानिकास्वप्निल
म्हण्टल्याप्रमाणे लगेच
In reply to म्हण्टल्याप्रमाणे लगेच by सानिकास्वप्निल
वा
कांदा चिरण्याची
In reply to कांदा चिरण्याची by गवि
कांदा चिरण्याची सफाई अफलातून
पाकृ झकास दिसते आहे. तयारीही
गंपाशेट, तुम्ही कुकिंगक्लासेस
कांदा
लई भारी!!!!!!
मस्त
मस्त..
जबरा फोटो , लवकर मिपा पाहिला
मला ह्या एग रोस्ट बरोबर केरला परोटा पाहिजे!