भरलं वांगं (बेक्ड)

गणपा's picture
गणपा in पाककृती
26 Dec 2010 - 3:10 am

वांग्याच नाव काढल्यावर बरेच जण तोंड वाकड करतात. माझ तस एक शेपूची भाजी सोडली तर बाकी कुणाशी वाकड नाहीये. त्यामुळे जे काही ताटात येत त्याला उदार मनाने उदरात जगा देतो.
सध्या मस्त वांग्याचा सिझन आहे. तशी इकडे जवळ जवळ वर्षभर वांगी मिळतात. पण ही असली मोठ्ठी वांगी इथे ठरावीक सिझन मध्येच येतात. नेहमी सारख वांग्याच भरत किंवा काप करुन तळण्या पेक्षा या वेळी काही तरी नवा प्रयोग करावासा वाटला. सद्ध्या बेकिंगच खुळ डोक्यात बसलय. आजची पाककृती ही त्याचीच परिणीती आहे. :)

तर मग आपला बहुमुल्य वेळ न दवडता लगेच पाककृती कडे वळतो.

साहित्यः

केक सारख याच काही ठरावीक पदार्थ आणि माप नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला आवडतील /उपलब्ध असतीतल त्या भाज्या घ्या. पण वांग मात्र हवच हव. ;)

१-२ मोठ्ठी वांगी. (किती माणस आहेत त्या प्रमाणात.)
१ वाटी मटार दाणे.
२ मध्यम आकाराचे बटाटे.
५-६ मश्रुम.
१ वाटी फ्लॉवर. (जीतका बारीक चिरता येईल तितका बारीक चिरुन.)
३-४ टॉमेटो.
३ लसणाच्या पाकळ्या.
१/२ इंच आलं.
१ भोपळी (सिमला) मिरची.
ब्रेडचा चुरा.
चीज.
तेल.
मीठ चवी नुसार.
१/२ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, १ चमचा मसाला, १ चमचा जिरे पुड.

कांदा सध्या ईकडे पण दुप्पट महाग झालाय. मी गडबडीत घ्यायलाच विसरलो. जर तुमची ऐपत असेल तर घ्या एखादा वासा पुरता. ;)

५-६ मोठ्या कोलंब्या (ऑपशनल) (नुसत व्हेज गळ्या खाली उतरेल कस माझ्या ;) )
(कोलंब्यांना हिरव वाटण, मीठ, मसाला, हळद, आणि लिंबाचा रस लावुन २०-२५ मिनीटं मुरत ठेवाव. )

कृती:


मी एक वांग उभ चिरुन दोन भाग करुन घेतले . तर दुसर्‍याला वर चित्रात दाखवल्या प्रमाणे आडवे चरे दिले आणि ते मिठाच्या पाण्यात बुडवुन ठेवलं.
फ्लॉवर, टॉमेटो, आल, लसुण, मिरची बारीक चिरुन घेतल. बटाटा कचाच खिसुन घेतला. मश्रुमचे उभे काप करुन घेतले.

ओव्हन २०० °C वर १० मिनिटं तापत ठेवला.
अर्ध्या कापलेल्या वांग्याला तेलाच बोट लावुन ते ओव्हन २५ ते ३० मिनिटं भाजुन घेतल.

थोडं थंड झाल्यावर चमच्याने आतला गर काढुन घेतला. आणि उरलेल वांग बाजुला ठेवुन दिल.

एका कढईत, २ चमचे तेलावर लसुण, आल परतुन घेतल आणि मग त्यात सगळ्या भाज्या (टॉमेटो सोडुन) टाकुन परतुन घेतल्या.

मग त्यात मीठ, मसाले टाकुन चांगल ढवळुन घेतल. वर एक झाकण ठेवुन दणदणीत वाफ काढली.

मग त्यात टॉमेटो टाकुन परतुन घेतल.

१-२ मिनिटांनी त्यात मगाशी वांग्यातुन काढुन ठेवलेला गर टाकुन परत एकदा मोठ्या आचेवर चांगल परतुन घेतल.

नंतर त्या अर्ध्या केलेल्या वांग्यात (खोबणीत) वरच सारण भरल. वरुन थोडा ब्रेडचा चुरा भुरभुरला. आणि मग त्यावर चीज खिसुन टाकल.

आणि हे वांग ओव्हन मध्ये अजुन २०-२५ मिनिट बेक करायला ठेवल.

हे करत असतानाच कोलंब्या तव्यावर अगदी १-२ मिनिटं मोठ्या आचे वर परतुन घेतल्या.

नंतर ते मिठाच्या पाण्यात ठेवलल वांग घेउन त्याच्या चिरांमध्ये सारण भरल. एक खाचे आड एक कोलंबी आणि टॉमेटोच्या चकत्या ठेवल्या.

नंतर हे वांग ओव्हन मध्ये ४० ते ४५ मिनिटे २००-२५० °C वर बेक करत ठेवल.

हे ते पहिलं उभ चिरलेल वांग बेक केल्या नंतर.

आणि हे मेरा वाला नॉव्हेज वर्जन थोड्याश्या सजावटी सोबत. ;)
शेवटी पदार्थ आधी बघुनच मनात भरला पाहीजे. मग तो नावडत्या कच्या माला पासुन जरी बनला असेल तरी न खाणार्‍याची, खाण्याची इच्छा झाली पाहिजे. काय म्हणता?

समस्त आंतरजालिय स्नेहांकितांना माझ्याकडुन नाताळाच्या आणि येणार्‍या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
:)

प्रतिक्रिया

गोगोल's picture

26 Dec 2010 - 3:20 am | गोगोल

ठार झालो..

आयशप्पथ!!

__/\__

बल्लवाचार्य गणपा यांना खाद्यपदार्थातलं ऑस्कर जाहीर करा रे!!!

नुसते फटू पाहूनच धन्य जाहलो!!

--असुर

कच्ची कैरी's picture

26 Dec 2010 - 3:36 pm | कच्ची कैरी

मी पण असुरशी सहमत आहे आणी सफरचंदाची जी अप्रतीम सजावट केली आहे काय सांगु ? शब्दच अपुरे पडतायेत.
एकदम दिलखुश रेसेपी.व्वा!!!!!

प्राजु's picture

26 Dec 2010 - 3:36 am | प्राजु

बाऽऽऽऽऽऽपरे!!!!
गणपा.................! धाऽऽऽव!!!!

अरे काय आहेस काय तू!! हे कसली रे भन्नाट रेसिपी!!
असुर शी अगदी सहमत आहे.. तुला ऑस्कर च काय पण जगात जे काही पुरस्कार असतील ते सगळे द्यायला हवेत..

भेटशील तेव्हा दंडवत घालेन.. (आठवण करून दे मी विसरले तर!) :)

मस्त रेसीपी!
अगदी इनोव्हेटीव म्हणायला हवी.
फोटू झकास आलेत.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Dec 2010 - 4:24 am | बिपिन कार्यकर्ते

काय साली कटकट आहे!!!

तुम्हाला साष्टांग नमन बल्लवाचार्य!!!

विंजिनेर's picture

26 Dec 2010 - 4:35 am | विंजिनेर

+१
निवांत जगू काही देत नाही ही माणसं रविवारचं :)

वांगं आपल्याला फक्त भरीतातच आवडतं, पण साला (पार्सिंग कंप्लिट), गणपाच्या कल्पकतेला सलाम आहे राव. लै भारी.

सुनील's picture

26 Dec 2010 - 4:35 am | सुनील

अफलातून!

मीली's picture

26 Dec 2010 - 4:38 am | मीली

फोटो पाहून खल्लास झाले बाबा ! सही आहे ...!
सजावट पण भारी आहे..! सौ. ची मजा आहे तुमच्या!

मस्तानी's picture

26 Dec 2010 - 6:23 am | मस्तानी

गणपा ... खर तर काय बोलायचं हे ठरवणं कठीण आहे कारण तुमच्या कौतुकास्पद सर्वच चांगले शब्द वापरून झालेत आधीच सर्वांचे ... एकच सांगते ... यापुढे एखाद्या मैत्रिणीला कौतुकाचा शब्द म्हणून सुगरण ऐवजी गणपा हा शब्द वापरेन मी बहुतेक !

अवांतर : मुख्य पदार्थाबरोबर अप्रतिम साईड डिश (एपलचा हंस आणि टोमेटोचे फुल ) याची पण step by step माहिती द्या ... तेवढं जमल तरी मी स्वतःलाच बक्षीस देईन :)

नगरीनिरंजन's picture

26 Dec 2010 - 6:48 am | नगरीनिरंजन

मस्त रे!!
>>शेवटी पदार्थ आधी बघुनच मनात भरला पाहीजे. मग तो नावडत्या कच्या माला पासुन जरी बनला असेल तरी न खाणार्‍याची, खाण्याची इच्छा झाली पाहिजे. काय म्हणता?
अत्यंत सहमत! याहून जास्त सहमत होऊ शकत नाही.

मुलूखावेगळी's picture

26 Dec 2010 - 11:18 am | मुलूखावेगळी

गणपा,

मी फक्त वान्ग्याचे भरीत खाते

पण ही रेसिपी फारच भन्नाट आहे नक्किच ट्राय करेल.

आणि डेकोरशन तर १ नम्बर आहे.

तिच्यायची कटकट... बरं होतं हा लिहित नव्हता ते.. !! आता नुसता त्रास आहे...

:)

छोटा डॉन's picture

26 Dec 2010 - 11:36 am | छोटा डॉन

अरे लेका, असली पापं कुठे फेडशील ?
अत्याचार आहे नुस्ता...

अत्यंत जीवघेणी सजावट बॉस, मान गये !!!

- छोटा डॉन

विलासराव's picture

26 Dec 2010 - 11:39 am | विलासराव

बिपिन कार्यकर्ते, अवलिया यांच्याशी बिनशर्त सहमत.

>>शेवटी पदार्थ आधी बघुनच मनात भरला पाहीजे. मग तो नावडत्या कच्या माला पासुन जरी बनला असेल तरी न खाणार्‍याची, खाण्याची इच्छा झाली पाहिजे. काय म्हणता?

खरोखर तोंडाला पाणी सुटलं आता आणखी काय म्हणायला पाहि़जे.

स्वगतः साधी पोळी भाजी जमत नाय अजुन निट आन काय तर म्हणे भरलं वांग ते पण (बेक्ड).

वेताळ's picture

26 Dec 2010 - 11:42 am | वेताळ

काय तरी चिकटवतो अन म्हणे बेक्ड वांगे......

ते सगळे जावु दे एकदा हे वांगे खायला बोलव बाबा

रमताराम's picture

26 Dec 2010 - 12:00 pm | रमताराम

मज्जानुं लाईफ रे गणपा. या वांग्यावर आमचा फार जीव. भरले वांगे नि भरीत यावर बरेच प्रयोग केले आहेत आता नवीन काय म्हणत होतो तर तू बेक्ड वांग्याची आय्डिया दिली. आणि वांगी नि कोळंबीची युती करण्याची अय्डियाही भन्नाट रे.

(शेपूशत्रू नसलेला) रमताराम

भन्नाट कल्पना आणि जीवघेणी सजावट !! मस्तच !!!

स्वानन्द's picture

26 Dec 2010 - 12:37 pm | स्वानन्द

गणपा भाऊ! दंडवत तुम्हाला.

बाकी ती सफरचंदाची सजावट तर जगात भारी!

पियुशा's picture

26 Dec 2010 - 12:50 pm | पियुशा

भन्नाट्!
सहि सहि सहि .................

पर्नल नेने मराठे's picture

26 Dec 2010 - 1:31 pm | पर्नल नेने मराठे

बाइला लाजवेल अशी सुरेख पाक्रु ;)

हाय मेलो रे... जाहीर करतो की २०१० सालचा मिपाचा प्रतिष्ठेचा ग्लोबल बल्लवाचार्य माननीय गणपा गुर्जींना मिळत आहे...

- पिंगू

स्मिता.'s picture

26 Dec 2010 - 1:52 pm | स्मिता.

काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नाहीये. फोटो पाहूनच तों. पा. सु.
मस्त पाकृ!

नावातकायआहे's picture

26 Dec 2010 - 1:59 pm | नावातकायआहे

__/\__

केवळ अप्रतिम....

आशिष सुर्वे's picture

26 Dec 2010 - 2:33 pm | आशिष सुर्वे

गणपा ओगा, झक्कास.. वांग्यासारख्या नावाप्रमाणेच उदास असणार्‍या भाजीला अश्या नजाकतीने पेश करणारे तुझ्यासारखे निवडंकच!!

ते बदक ही आवडले रे बाबा..
'रोस्ट डक' ची पाककृती लवकरंच येणार असे दिसतंय!! :)

अवांतर:
तुझ्या 'मेड' ला आरामच असेल ना!!
बाकी कांदा किती नायरा आहे रे आता? मी होतो तेव्हा ३०० नायरा च्या आसपास होता..

वांगं अज्जिबात आवडत नसल्याने "वा लै भारी , विकांताचा मेनु पक्का झाला "अशी प्रतिक्रीया देणार नाही.
पण सजावट आणि कौशल्याबाबद बोलायची आपली लायकी नाही. गणप्या , जियो :)

मस्त कलंदर's picture

26 Dec 2010 - 3:11 pm | मस्त कलंदर

खल्लास!!!!

स्वैर परी's picture

26 Dec 2010 - 3:58 pm | स्वैर परी

गणपा भाउ! भारी पाकृ!
मिपा च्या सर्व सभासदांना जेवाय्ला आमंत्रण कधी धाडताय? :)

अविनाशकुलकर्णी's picture

26 Dec 2010 - 4:55 pm | अविनाशकुलकर्णी

बोलति बंद

श्रावण मोडक's picture

26 Dec 2010 - 6:25 pm | श्रावण मोडक

वा. तोड नाहीच. तोंड आहे.
बादवे, रम, व्हिस्की, जीन, व्होड्का यापैकी कशाची खुमारी या वांग्यासोबत वाढेल रे? बिअर असं उत्तर देऊ नको म्हणजे मिळवली... :०

स्वाती२'s picture

26 Dec 2010 - 6:55 pm | स्वाती२

आई शप्पत! कसली भारी पाकृ. सजावट पाहून बोलती बंद!

आजानुकर्ण's picture

26 Dec 2010 - 8:31 pm | आजानुकर्ण

पाककृती नेहमीप्रमाणेच जबरदस्त.

मात्र 'भरलेले वांग' असे वाचल्याने पाककृती उघडण्यास बराच वेळ धजावलो नाही. काही दिवसांपूर्वी लहान मुलांना कापून शिजवले वगैरे एका कथेत वाचल्याचे आठवते. त्यावरून हा (होपफुली) मनुष्येतर प्राण्यांच्या चेहऱ्यावरील mole किंवा तत्सम वांगाचा प्रकार शिजवण्याचा प्रकार असावा असे वाटले होते. मात्र हा वांगाचा प्रकार नसून वांग्याचा प्रकार आहे हे वाचून हायसे वाटले. वांगं आणि वांग या शब्दांच्या अर्थच्छटांमध्ये फरक असल्याने हा प्रमाद घडला.

प्रभो's picture

26 Dec 2010 - 11:27 pm | प्रभो

भारी रे!!!

गणपा तुम्ही बनविलेल्या सर्व पाकक्रुती भन्नाट असतात....

मराठे's picture

27 Dec 2010 - 12:03 am | मराठे

सुपर्ब!

डावखुरा's picture

27 Dec 2010 - 12:27 am | डावखुरा

बोला पाककलासंपन्न, मिपाबल्लवाचार्य, गणपां की जय... क
की जय...
की जय....

(ज्यांच्या केवळ स्पर्षाने रॉ मटेरियल्ने स्वतःहुन डिश्मधे भन्नाट पाककृती होउन बसावे...)

सजावट एकच नंबर....
पुपाशु

वा.
आपल्या पाककलेचे वर्णन करायला शब्दच नाहियेत.
__ /\__

ते सफरचंदाचे बदक कसे केले ते सांगाल का जरा?

बदक कसलं?? राजहंस च वाटतो आहे तो.. इतका सुंदर झालाय! :)

मस्तानी's picture

27 Dec 2010 - 7:38 am | मस्तानी

... राजहंसच ! गणपा, आता public demand साठी तरी सांगाच !

टारझन's picture

27 Dec 2010 - 10:12 am | टारझन

गणप्याने केळी , सफरचंदे , पपाया ,आंबे , द्राक्षे अशा विविध पदार्थांपासुन कशा कलाकृती तयार करता येतील त्यावर एक अभ्यासपुर्ण लेख लिहावा. मला छंद आहे त्याचा. अफ्रिकेत फायु स्टारात ( जो इथे आम्ही शायणींग हाणतो म्हणेल त्याने स्वत:ला शिंगल आउट करुन घ्यावे) र्‍हात असताना फळांची सुंदर कलाकृतिक सजावट केलेली असे.

- (सजावट प्रेमी) टारपा

(गणपाशेटची पाकृ वाचून घरोघरी होणारा संवाद)

अगः "आहो! ऐकलं का ?"
अहो: "काय म्हणालीस का ?"
अगः "ही गणपाची नविन पाकृ बघितली का ?"
अहो: "हो! मस्त आहे. बघितली सकाळी."
अगः "तो बघा ! नाहीतर तुम्ही. मेला एक चहापण धड करता येत नाही."
अहो: (मनातल्या मनात) "गणप्याच्या बैलाला @^#@&" (बाकीचं पूर्ण होत नाही)
अगः "आहो! काय म्हणते मी? आज तरी जरा मदत करा स्वैपाकघरात !"
अहो: (मोठ्याने) "हं ! आलो. त्या पाकृला प्रतिसाद देउन येतो."
अहोंचा प्रतिसादः " गणप्या लेका !कुठं फेडशील ही पापं !"
:)

काय मराठे, स्वानुभवावरून असं अवांतर राहिलं वाटत तुमचं ?

प्राजक्ता पवार's picture

27 Dec 2010 - 10:04 am | प्राजक्ता पवार

नविनच पाकृ शिकायला मिळाली.
फोटो व सजावट केवळ अप्रतिम :)

दिपक's picture

27 Dec 2010 - 10:16 am | दिपक

_____/\_____

गणपा भाऊ पाय कुठे आहेत तुमचे ? फोटो टाका. गुरु मानुन तुम्हाला वंदन करते. अप्रतिम रेसिपी आणि अ‍ॅप्पल ची सजावट
तो अ‍ॅप्पलचा पक्षी कसा केलात तेही टाका. आमची अ‍ॅप्पल न खाणारी मुल आवडीने खातील अ‍ॅप्पल.

sneharani's picture

27 Dec 2010 - 11:00 am | sneharani

मस्त पाकृ.
सजावट देखील खूपच मस्त!!

विजुभाऊ's picture

27 Dec 2010 - 11:10 am | विजुभाऊ

गण्पा शेठ लै भारी रे.
ते सेलेड डेकोरेसन ( हो गुजरातीत असेच म्हणतात) लै भारी

राघव's picture

27 Dec 2010 - 11:41 am | राघव

मनापासून एखाद्या गोष्टीची आवड असली की काय होतं त्याचं हे मूर्तीमंत उदाहरण आहे. हॆट्स ऒफ!!
बादवे, ही लिंक फेमस झाली पाहिजे!

(ठार) राघव

परिकथेतील राजकुमार's picture

27 Dec 2010 - 11:44 am | परिकथेतील राजकुमार

कोणितरी ह्या गणपाच्या इंटरनेट कनेक्शन प्रोव्हायडरला फोन करा रे !!

आजारी आहेसन बाबा ? गप विश्रांती घे की. आम्हाला का त्रास देतोयस ?

सगळ्या रसिकांचे मनःपुर्वक आभार.
बरेच जणांनी तो सफर्चंदाचा हंस कसा बनवायचा याची विचारणा केली आहे.
खर तर ते करायला जितक सोप्प आहे तितकच शब्दात मांडण कठीण.
खालची चित्रफीत पाहुनच मी हे बनवलय. तुम्हालाही त्याचा उपयोग होईल अशी आशा करतो.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

How to Turn an Apple into a Swan

भाऊ पाटील's picture

27 Dec 2010 - 8:07 pm | भाऊ पाटील

दोन्ही हात आणी पाय जोडलेत बघा.
खत्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्रनाक रेसिपी आणी फोटो! नमन! सफरचंदाचा हंस तर लै भारी!

(खत्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्रनाक: लै लै लै लै लै लै भारी)

आई गं.....खरंच जीवघेणी रेसिपी आहे !!
गणपा........तुस्सी ग्रेट !!

सखी's picture

27 Dec 2010 - 7:46 pm | सखी

खरचं दोन्हीही ग्रेटच! तुम्ही आणि ती रेसिपी + मांडणी सगळेच. नक्कीच करुन बघेन.

वेळ मिळाला तर तुमच्या या आवडीबद्दल, स्वयंपाकघरातल्या प्रगती, हातखंड्याबद्दल वाचायला आवडेल.

धमाल मुलगा's picture

27 Dec 2010 - 8:43 pm | धमाल मुलगा

मी हा धागा उघडलाच नाही.
मी फोटो पाहिलेच नाहीत.
मी पाकृ पाहिलीच नाही.
मला त्रास झालाच नाही.

:D
सुगरण बाईला देवस्थानी कल्पून अन्नपुर्णा म्हणतात. ह्या गणप्याला काय म्हणावं बरं?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Dec 2010 - 5:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुगरण बाईला देवस्थानी कल्पून अन्नपुर्णा म्हणतात. ह्या गणप्याला काय म्हणावं बरं?

आपला गणपा हा 'द गणपा' आहे ... पुढच्या प्रत्येक बल्लवाला गणपा म्हणणार.

अनामिक's picture

27 Dec 2010 - 9:07 pm | अनामिक

जबरदस्त पाकृ!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Dec 2010 - 5:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

गणपा, पाय कुठे आहेत रे तुझे?

मदनबाण's picture

28 Dec 2010 - 7:26 am | मदनबाण

लोटांगण घातलेले आहे...:)

लतिका धुमाळे's picture

29 Dec 2010 - 1:32 pm | लतिका धुमाळे

गणपा,
कालच बेक्ड वांगे केले. फारच छान झाले होते. मुख्य म्हणजे माझ्या वांगे न आवडणार्या नवर्याला पण आवडले.
छान पाक्रु बद्दल धन्यवाद.
लतिका धुमाळे