चिकन भुजिंग

गणपा's picture
गणपा in पाककृती
2 Apr 2011 - 4:52 pm

नमस्कार मंडळी थोड्याश्या विश्रांती नंतर पुन्हा तुमच्या सेवेसी हजर आहे. आज मी आपल्यासाठी खास वसई-विरार आणि आमच्या गावाकडला पेश्शल पदार्थ घेउन आलोय. भुजिंग. वसई ते डहाणु पट्ट्यातला भुजिंग न चाखलेला खवय्या विरळाच असावा.

निखार्‍यावर पदार्थ भाजण्याच्या प्रक्रियेला आमच्या वाढवळ भाषेत भुजणे म्हणतात. आणि या भुजण्याला इंग्रजीची (.....ing) जोड देउन जी क्रिया होते ते हे भुजिंग. थोडक्यात मराठीतच सांगायच झाल तर बार्बेक्यु. माझ्या गावा जवळच मुंबई अहमदाबाद महामार्गावर (चारोटी नाक्याच्या थोडस पुढे) आई महालक्ष्मीच मोठ्ठ आणि प्रसिद्ध मंदिर आहे. दर वर्षी हनुमान जयंतीला इथे १५ दिवस आईची यात्रा भरते. लहान असताना नेहमी जाणं व्हायच. तेव्हाच एकदा या यात्रेत पहिल्यांदा हा प्रकार खाल्ला होता. निखार्‍यावर खरपुस भाजलेल कोंबडी वा बोकडाच मांस, धुराचा दर्प आणि वरुन फक्त लिंबु आणि मीठ. बास बाकी दुसर काही नाही. नुसत्या आठवणीनेच तोंडात त्सुनामी उठली आहे.
या भुजलेल्या कोंबडी मटणावर थोडेसे अजुन आगाशीतले संस्कार केले की जे होते ते हे भुजिंग. असो नमनालाच घडाभर तेल घातल्यावर, आता तुमचा अमुल्य वेळ अधिक वाया न घालवता लगेच मुख्य कार्यक्रमाला सुरवात करतो.

साहित्य / कच्चा माल :
१ किलो चिकन.
१ बाउल जाड पोहे.
३-४ मध्यम ते लहान बटाटे.
३ मध्यम कांदे (बारीक चौकोनी कापुन.)
१ चमचा लाल तिखट.
१ चमचा हळद.
खडा मसाला किंचितसा कोरडा (तेल न टाकता) भाजुन आणि थंड झाल्यावर वाटुन घ्यावा.
(खडा मसाल्यात १ लहान चमचा जीरं, धणे, काळीमीरी, १/२" दालचीनी, ३-४ लवंगा घ्याव्या.)
१ मोठा चमचा आलं, लसुण, मिरची पेस्ट.
४-५ पाकळ्या लसुण ठेचलेला.
२-३ हिरव्या मिरच्या भरड ठेचुन. (आपापल्या ऐपती नुसार)
१ वाटी सुकं खोबरं.
३-४ कडिपत्त्याची पानं.
लिंबु.
स्वादानुसार मीठ.
तेल.

कृती:

चिकन स्वच्छ धुवुन मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्या. त्याला मीठ, हळद, लाल तिखट, आल+लसुण+मिरचीचं वाटण आणि २ चमचे तेल लावुन १५-२० मिनिटं मुरत ठेवा.

बटटाट्याचे अंदाजे १ सें.मी जाड काप करुन घ्या. किंचीत मीठ भुरभुरा.

लोखंडाची शीग घेउन त्यात चिकन आणी बटाट्याचे काप ओवुन घ्यावे.

शेगडीत कोळसे पेटवुन घ्या. इथे थोडे पेशंस लागतात. कोळसे चांगले असतील तर वेळ लागत नाही. मला ते सुपरमार्केट मध्ये मिळणारे गोल गोल कोळसे मुळीच आवडत नाहीत, धग लागे पर्यंत अर्धा उत्साह मरुन जातो. मागे एकदा केरोसीनची आख्खी बाटली पिउनही हे बेटे काळे कुळकुळीतच राहीले होते. यावेळी आपल्या भारतात मिळतात तसले साधे कोळसे मिळाले. एकदा का थोडीशी धग पकडली की हात पंख्याने / पुठ्ठ्याने वारा घालत रहाव लागतं.

निखारे फुलले की, वर तयार केलेल्या शीगा ठेवुन एका हाताने शेगडीला वारा घालत बसावं. पुरुष मंडळींनी आपापल्या आवडी नुसार दुसर्‍या हातात मद्याचा पेला/ चिल्ड बियरचा कॅन / चैतन्यकांडी घ्यावी. सरळ मार्गी असाल तर बायकोचा/प्रेयसीचा हात घ्या. ;)
१०-१५ मिनिटांनी एकदा शीगा फिरवुन घ्या. (वेळेच प्रमाण निखार्‍यांत किती धग आहे त्यावर अवलंबुन आहे. मटण असल्यास ५-१० मिनिटं जास्त लागतील.)


शिजलय की नाही म्हणुन बघताना, चाखता चाखता १-२ शीगा अश्याच संपुन जातात. तेव्हा त्या हिशोबानेच चिकनच प्रमाण ठरवा. ;)

चिकन भुजुन झाले की. दुसर्‍या टप्प्यातल्या तयारी कडे वळावे.

मोठ्या कढाईत थोड्या तेलावर कढिपत्त्याची फोडणी करावी.
कढिपत्त्याचा सुगंध सगळ्या घरात दरवळल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकुन तो गुलाबी होईस्तव परतुन घ्यावा.

आवडीनुसार भरड वाटलेल्या मिरच्या, ठेचलेला लसुण, वर वाटलेला गरम मसाला, हळद, लाल तिखट टाकुन परतुन घ्यावं.

सुक खोबरं भुरभुरुन २-४ मिनिटं परतावं.

मग त्यात भुजलेल चिकन आणि बटाटे टाकुन एकत्र कराव. ५ मिनिटं परतत रहावं.

पोहे चाळणीत घेउन त्यावर पाण्याचे ४-५ हबके मारावे. (पुर्ण भिजवुन घेउ नका.) कोरडेच घेतेले तरी चालतील. हे पोहे चिकन मध्ये टाकुन सगळ नीट एकत्र करुन घ्यावं. वरुन लिंबु पीळावं. आणि चांगलं ढवळुन घ्यावं.

गरमागरम भुजिंग वाट पहातय.

माझ्याकडे बार्बेक्युची शेगडी नव्हती. एक भली मोठ्ठी कुंडी रिकामीच पडुन होती. तिचा वापर करायचं ठरवल. तेवढच टाकावु पासुन टिकावु. :) (कोण रे कोण तो कंजुस म्हणाला?) ऐन वेळी दुसरी सोय करण्यात धावपळ नको म्हणुन कालच एक ट्रायल घेतली.
बकर्‍याची भुजलेली कलेजी इथे पहाता येईल.

कोळश्याची शेगडी नसल्यास ओव्हन मध्ये भाजुन घेतलं तरी चालेल. आणि ओव्हनही नसेल तर फ्राइंगपॅन मध्ये थोड्या तेलावर शिजवुन घ्यावं. पण कोळश्याचा धुरावर आणि निखार्‍यावर भाजलेल्या चिकनची चव त्याला नाही. ठाण्या/मुंबईत असाल तर एखाद्या विकांताला संध्याकाळी आगाशीला चक्कर टाका. मस्त अरबी समुद्राच्या किनार्‍यावर वाळुत अनवाणी फेरी मारा. जवळच कुठेतरी मस्त भाजलेल्या चिकन्/मटणाचा सुटलेला सुगंध अपोआप तुम्हाला एखाद्या भुजिंग सेंटर जवळ आणुन सोडेल. तिथे आपल्या जीभेचे चोचले पुर्ण करा.
नाही तर असं करा ना सरळ या की माझ्याकडे. घर आपलंच तर आहे. :)

विसु : माझ्या शाकाहारी स्नेह्यांनो एक डाव माफी द्या. या रेशिपीत चिकन/मटणाला पर्याय नाही. (निदान मी तरी व्हेज व्हर्शन चाखलेलं नाही. कुण्या निधड्या छातीच्या व्यक्तीने हे आव्हान यशस्वी पेललच तर मला जरुर कळवा. :) )

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Apr 2011 - 5:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंपा, आपलं कौतुक करुन थकलो आहोत.
म्हणून ही केवळ पोच. :)

-दिलीप बिरुटे

विंजिनेर's picture

2 Apr 2011 - 8:32 pm | विंजिनेर

असेच म्हणतो.

विसोबा खेचर's picture

4 Apr 2011 - 9:41 pm | विसोबा खेचर

सहमत..!

सिद्धार्थ ४'s picture

2 Apr 2011 - 5:18 pm | सिद्धार्थ ४

You are great..hats of to you...

गोगोल's picture

2 Apr 2011 - 5:22 pm | गोगोल

चिकन आणि पोहे?
गणपा कशात काय टाकून चविष्ट पदार्थ बन्वेल काही सांगता येत नाही.
खतर्नाक दिसतय.

शोनू's picture

2 Apr 2011 - 5:54 pm | शोनू

मागे मायबोलीवर पण कृती वाचलेली, पण त्यात फोटो नव्हते . इथले हवामान बार्बेक्यू योग्य झाले की नक्की करून पहाणार.

इथले अस्सल ग्रिल मास्टर कोळश्यावर रॉकेल वा तत्सम कोल फ्लुइड न घालता वाटीभर तेल घालतात.

इथे आहे ते प्रकरण वापरून पण कोळसे लवकर तयार होतात - म्हणे .

http://www.amazon.com/Weber-7416-Rapidfire-Chimney-Starter/dp/B000WEOQV8...

चावटमेला's picture

2 Apr 2011 - 6:53 pm | चावटमेला

आहाहा... लाळ सुटली :)

टारझन's picture

2 Apr 2011 - 6:59 pm | टारझन

ओलावले !

दीविरा's picture

2 Apr 2011 - 7:21 pm | दीविरा

मला नविनच प्रकार आहे.

करुन पाहीन.

बाकी तुमचे सगळे प्रकार छानच असतात :)

ग्रेट आहात :)

शाकाहारी असल्याने भुजिंगची चव चाखता येणार नाही. पण ह्या भुजींगने माझ्या ग्रुपमधल्या एका भटाला मात्र पक्का मांसाहारी बनवल्याची आठवण आहे... :)

- पिंगू

दिपाली पाटिल's picture

2 Apr 2011 - 9:30 pm | दिपाली पाटिल

मस्त... ती कुंडीची आयडीया एकदम भारी!!!

मि येउ का भुजिग खायाला ?
मि प्रथम ही रेसिपी आम्ही सारे खव्वये मधे पाहीली होती

मराठमोळा's picture

3 Apr 2011 - 12:03 am | मराठमोळा

गणपा पाकृ विभागाचा सचिन तेंडुलकर आहे. :)
बास शब्द संपले... :)

शाकाहारी असलो तरी कधीतरी असलं चाखायला बंदी नाही. एकदा आगाशी पहायला हवे. वेज वर्जन करायला फ्लॉवरचे मोठे तुकडे वापरले तर..?

मी लवकरच मत्स्याहारी तरी होइन कि काय अशी भिती वाटते आहे, नंतर हळूहळू मांसाहाराकडे सरकायला बरे!;)
गणपाने छान फोटू दिले आहेत.
भुजणे हा शब्द भाजणे या शब्दाच्या जवळचा वाटतो.

हो बरोबर खरा शब्द भाजणेच आहे. पण वाढवळ बोली भाषेत त्याचा थोडासा अपभ्रौंष झालय.

सानिकास्वप्निल's picture

3 Apr 2011 - 4:52 am | सानिकास्वप्निल

+१ :)

मी भुजणे ह पदार्थ खाल्ला आहे आणी त्याची चव तर अप्रतिमच...माझ्या आजोळी (घोलवड -बोर्डी ) एक वाढवळ कुटुंब राहत होते राऊत म्हणून, त्यांची आई म्हण्जे नानी हे बनवायची, त्याची आठवण करून दिली म्हणून धन्यवाद.

दीपा माने's picture

3 Apr 2011 - 8:14 am | दीपा माने

गणपा, तुमच्या पाकक्रुती आपल्या जुन्या खाद्यपदार्थांना नेहेमीच प्राधान्य देत आल्यात ह्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
आपल्या पारंपारिक मांसाहारी/शाकाहारी पाकक्रुतींना अश्याच माध्यमांतून परत आणले पाहीजे. मिपा हे त्याचे मुख्य माध्यम आहे ह्याची परत एकदा खात्री पटली.
आपले आणि मिपाचे अभिनंदन.

५० फक्त's picture

3 Apr 2011 - 9:23 am | ५० फक्त

गुरुराज धन्य आहात, या महिन्यात पुण्यात सरुटॉबाने नावाचा खादाडीचा कार्यक्रम करायचा विचार आहे, तिथे हे ट्राय करता येते काय ते पाहतो. तसेच याचा शाकाहारी प्रयोग पण करुन पाह्तो.

jaypal's picture

3 Apr 2011 - 10:58 am | jaypal

gana

गण्याभाई वापस आयेला हय तवा आपापली पोर जाकुन ठेवा हो

g

गणा या भुजींगने पोपटीची आठवण झाली.
सब कुछ लै भारी है

प्रशु's picture

3 Apr 2011 - 1:04 pm | प्रशु

हा आमच्या आगाशीचा प्रसिद्ध पदार्थ...

गणपाशेठ तुम्ही आगाशीचे काय???

विनायक बेलापुरे's picture

3 Apr 2011 - 1:08 pm | विनायक बेलापुरे

भुजणे .... लाजवाब ....

खाणं सोडलयं त्यामुळे बरेच जीव वाचले सध्या ......

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Apr 2011 - 2:01 pm | निनाद मुक्काम प...

''तोंडातून लाळ टपकत आहे राव''
वाममार्गी
नि मु पो ज

इरसाल's picture

3 Apr 2011 - 2:15 pm | इरसाल

जिव घ्याल काय ?

खादाड's picture

3 Apr 2011 - 2:17 pm | खादाड

मस्तच !!!

प्राजु's picture

3 Apr 2011 - 8:17 pm | प्राजु

भ............................................................................................................
...................................
........................
..........
संपल्या शिव्या! ;)

बास!!

पिवळा डांबिस's picture

3 Apr 2011 - 8:31 pm | पिवळा डांबिस

गंपा डॅशिंग!
मुर्गी भुजिंग!!
मस्त जमिंग!!!!
:)
फार पूर्वी माझा एक मामा विरारला रहात होता, तेंव्हा त्याच्या एका फुलबागवाल्या माळी मित्राकडे खाल्ली होती!!!
अफलातून चव होती!!!

नाही तर असं करा ना सरळ या की माझ्याकडे. घर आपलंच तर आहे.
आमंत्रण शिरियसली घेतले जाईल याची नोंद घेतल्या जावी!!!!!
:)

पिंडा काका एनी टाईम...... हे केवळ तोंड देखले पुणेरी आमंत्रण नाही. :)

पिंड, काक.. काय रे काय चाललंय हे गणपा? तुझ्या रेशिप्या बघून "खपलो, वारलो, गतप्राण झालो" इ. प्रतिक्रिया उमटत असतातच म्हणा! ;)

यागाग्गो!!! गणपा मेल्या, आवर स्वत:ला!!!!!
हा गणपा म्हणजे "असून अडचण, नसून खोळंबा" आहे. इतके दिवस पाकृ देत नव्हता म्हणून शिव्या घातल्या त्याला, आणि आता इतक्या जबराट पाकृ टाकल्याबद्दल शिव्या देईन म्हणतो!!!

वरील प्रतिसादात पुणेरी आमंत्रणाला शिव्या दिल्याबद्दल गणपा यांस खरडवहीत घुसून शेप्रेट शिव्या दिल्या जातील. सदर सत्काराची संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी! ;-)

--असुर

मेघवेडा's picture

4 Apr 2011 - 3:01 am | मेघवेडा

माझा एक मित्र आगाशीत राहतो. अगदी पठण केलेला नसला तरी निदान नावाला ब्राह्मण आहे. घरी अगदी सात्त्विक वातावरण असतं.. तसा तो काही अभक्ष्यभक्षण-अपेयपान करत नाही. पण "आगाशीत राहून भुजिंग नाही खाल्लं तर फाऊलच" असं सांगत घरच्यांपासून लपून मोठ्या चवीनं भुजिंग हादडतो. इतर वेळेला खंप्लीट वेजिटेरियन! यावरूनच मला या प्रकाराची महती कळली होती. मी शाकाहारी असल्याबद्दल मला चिडवण्याच्या, शिव्या घालण्याच्या भानगडीत शक्यतो माझे मित्र पडले नाहीत कधी.. अपवाद त्यांनी भुजिंग खाल्लं त्यावेळेचा! :)

आणि गणपा तू हे घरी करतोस? आवरा तेज्यायला.. वटवाघळाचीही कुठली ती रेसिपी येऊ दे आता.. नाव आठवत नाही पण तुमच्या विरार-डहाणू पट्ट्यात फेमस आहे म्हणे! :D

साफ म्हणजे अगदीच खपलेलो आहे..
तोंडातून लाळ गळून डीहाय्द्रेषण का काय ते झालंय असा वाटतंय

संदीप चित्रे's picture

4 Apr 2011 - 6:52 pm | संदीप चित्रे

पुढच्या भारतभेटीत पुण्याहून पालघरला जाईन म्हणतोय.
वाटेत तुझ्या घरी थांबणार !

विशाखा राऊत's picture

4 Apr 2011 - 7:44 pm | विशाखा राऊत

खुप एकले आहे.. माझा नवरा बाकि मांसाहार नाहि पण हे खाणारच..

उद्या धागा उघडेन म्हणते! जे काय असेल ते उद्या पाहीन म्हणतेय! आज पोळ्या संपु देत पहिला! नाही का?

नाटक्या's picture

4 Apr 2011 - 10:52 pm | नाटक्या

बर्‍याच वर्षापुर्वी चारोटी नाक्यावर गेलो होतो तेव्हा खाल्ले होते तेव्हा ह्याचे नाव ठाउक नव्हते. आता करूनच बघायला हवा हा पदार्थ. धन्यवाद गणपा शेट!!!

- नाटक्या

चिगो's picture

4 Apr 2011 - 11:40 pm | चिगो

कसला भारी प्रकार टाकलायंस भाऊ !? स्पा सारखाच डिहायड्रणार आता... कधीच न ऐकलेला नी चाखलेला पदार्थ आहे हा, पण नक्की खाणार आता.
धन्यु..

प्रभाकर पेठकर's picture

7 Apr 2011 - 3:57 pm | प्रभाकर पेठकर

मस्त प्रकार दिसतो आहे. नक्कीच करून पाहीन आता.

स्मिता.'s picture

7 Apr 2011 - 6:59 pm | स्मिता.

गणपाभाऊ, काय पाकृ टाकलीये!! फोटु पाहून तर तोंडाला पाणी सुटलंच पण एक-एक स्टेप वाचून तर लाळ आवरेना.
या वीकांताचा मेनु ठरलाच. नवरा पण खुश होईल.

धागा वर आलाच आहे तर पटकन सगळ्यांना ठ्यँक्यु म्हणुन घेतो. :)
सर्व वाचकांचे/प्रतिसादकांचे, मंडळ आभारी आहे. :)

वेताळ's picture

7 Apr 2011 - 7:18 pm | वेताळ

........................
.....................