कधीकधी साधासुधासा विचार करणं आणि तसं वागणं आपल्या हातात नसतं. म्हणतात नं "कॉमनसेंस इज अ सेंस विच इज नॉट सो कॉमन!". मुळातच लग्न झाल्यावर आणि पोरं बाळं आल्यावर कॉमनसेंस वापरणे दुर्मिळ होत जाते हे आपण सर्वच खाजगीत मानतो. अर्थातच मुलांचा अभ्यास घेताना एखाद दुसऱ्यावेळेस हा सेंस कामी येत असेलही, पण त्याबाबतीत पालकांपेक्षा मुलंच जास्त सरस ठरत असतात हेही तितकेच खरे.
त्यात पुन्हा स्त्री किंवा मुलगी असल्याचा एक आभिशाप... एमसीपी म्हणजे मेल च्शॉविनिस्ट पिग्स, अर्थात मराठीत, पुरूषत्व हेच प्रगतीचं अन बुद्धिमत्तेचं प्रमाण मानून चालाणारे पुरूष भोवताली असले की अधिकच... "तुम्हा बायकांना काही कळतच नाही" असं टाकून बोलणं ज्यांच्या "वाय" क्रोमोसोम्ससोबत आलंय असे आपले पुरूष आप्तप्रिय .. मग त्यात नवऱ्यापासून मुलांपर्यंत सगळेच आले. मग अशावेळेस त्यांच्या विरोधात बंड करण्यापेक्षा ‘त्यांना त्यांच्याच भ्रमात राहू दे’ असं समजून आपलं स्त्रीमन ‘महागणारं सोनं’, ‘वागळेंच्या मोठीने केलेलं लव्ह मॅरीज’ किंवा ‘सानेबाईसोबत पाणीपुरी खाताना दिसलेला पुष्पाचा नवरा’ अशा सामाजिक गोष्टींत गुंतवलेलं परवडतं.
पण मग कधी कधी अशा गोष्टी होतात जिथे नियती आपण स्त्रीलिंगी असल्याचं आपल्याला पटवते... आणि ते सुद्धा त्या 'एमसीपी' बुद्धिमत्तेस कोड्यात टाकून..,.
तर झालं असं की घरात पाली पसरल्या. पेस्ट कंट्रोल करावं तर छोट्या कार्तिकला वास येतो. "अगं हर्बल पेस्ट कण्ट्रोल करूया", मिष्टर बोलले... "नको महाग पडेल", सासऱ्यांचं मत, "त्यापेक्षा अर्धवट फोडलेली अंडी ठेवू."
"श्शी! नको घाण दिसेल, त्यापेक्षा पालींचं नसबंदी करणारं औषध पालींच्या खाण्यात दिलं तर?", मोठ्या सौम्याने पर्याय ठेवला, "त्यांना ठार मारण्यापेक्षा हे जास्त ह्युमेन आहे".
परवाच पाली "रेप्टाईल" वर्गात मोडतात हे कार्तिकला शिकवताना पटवून दिल्यावर आज त्यांच्याशी "ह्युमेन" का वागावं हा प्रश्न मात्र कुणी सौम्याला विचारला नाही... त्यात पालींना औषध घालून द्यायला लागणारं खाणं कोणतं, ते कुठून आणावं आणि ते फुकट देणं किती आपल्याला परवडेल ह्याचं गणित आम्ही मांडू लागलो.तेवढ्यात कार्तिकने दोन तीन माशा आणि एक झुरळ पकडून आणलंच... "उईईई!", सौम्या किंचाळली आणि तिनं कार्तिकला धपाटे घातले (तसं अठरा वर्षांची झाल्यापासून माझं हे काम ती अत्यंत स्वखुशीने करते).
"पण मी तर पालींचं डीनर आणलं होतं...", कर्तिकने त्याची बाजू मांडायचा फुटकळ प्रयत्न केला जो कोणी कानांवरही घेतला नव्हता... पाठ चोळत तो आणि चर्चेत नववाद निर्माण करूण सौम्या आपापल्या खोलीत परतले.
आम्ही इथे स्वस्तातलं पेस्ट कण्ट्रोल करायचं ठरवलं त्यासाठी कार्तिकला दोन रात्र त्याच्या सुमीमावशीकडे ठेवायचंही सोबत ठरवून टाकलं. तिचा चार वर्षांनी मोठा आशिष कार्तिकचा "आयडॉल" आहे म्हणून कार्तिक दोन रात्र मजेत तिथे काढेल आणि आशिषला फुशारक्या मारायला तेवढंच अवसान मिळेल हे आमचं प्लानिंग व्यवस्थित ठरलं होतं.
"उईईईईई!", सौम्याची किंचाळी पुन्हा घुमली आणि मिस्टरांनी कार्तिकला हाक घातली...
"कार्तिऽऽऽक! ताईला सतवू नकोस!"
"पण पप्पा मी तर माझ्या खोलीत आहे!" इति कार्तिक.
"मम्मी पप्पा पाऽऽऽऽआल!!!", सौम्याचा आवाज पुन्हा घुमला.
आम्ही तिच्या खोलीत धावलो. कार्तिकही तिथून आला... हातात बॅडमिंटनचं रॅकेट घेऊन.
"कुठेय पाल?", मिस्टर ओरडले.
"ती बघा तिथे माझ्या बेडवर. शी इज ह्युज .. लाईक अ डायनो!", सौम्या खोलीबाहेर पळाली. समोरच बेडवर एक मोठी पाल पडलेली होती. बऱ्यापैकी मोठी होती पण सौम्याने उगीच तिला डायनोसॉरची उपमा दिली असावी.
"मी मारतो. मी मारतो!", कार्तिक बॅडमिंटनचं रॅकेट घेऊन आमच्या पुढ्यात घुसला.
"अरे बेडशीट खराब होईल., कार्तिक. मागे ये!" मी ओरडले. उगीच पालीच्या कलेवराचे डाग घेऊन मला ती बेडशीट उद्या धुवायची नव्हती.
"तरी पण .. मी हलकंच मारीन", कार्तिकने आश्वासन दिलं आणि तो त्याच आवेशात बेडपर्यंत पोहोचलाही पण तिथंच थबकला.
मी आणि ह्यांनी कार्तिकच्या डॊक्यावरून पाहिलं तर बेडवर पाल दिसली... उताणी पडलेली.
"आधीच मेलेली दिसतेय!", मी.
"हो!", सासरेबुवा.
"नाही पण पोट वर खाली होतंय. ती श्वास घेतेय. मी चिरडतो!", कार्तिक.
"नको! तू आधी पाठी हो बघू!", मी कार्तिकला मागे ढकललं, "मला कळत नाही तुम्हा मुलांना गोष्टी चिरडायला का आवडतात."
"या! सो वॉयलण्ट किड्स आर दीज डेज.", सौम्याने टिप्पणी केली, "बाय द वे काढा नं तिला?", सौम्या मागून येत म्हणाली.
"नाही आधीच मेलेली दिसतेय", हे.
मग दोन मिनिट खोली गप्पच होती.
"अहो! फरट्याने काढा हो तिला.", मी म्हणाले
"पण टुणकन उडाली तर?", सौम्या.
"म्हणून मी सांगतोय ना... मला मारू द्या प्लीज!", कार्तिक पुन्हा मागूनच ओरडला.
"कार्तिक मला ते रॅकेट दे", हे म्हणाले
"नको बाबा!", कार्तिक आणि सौम्या दोघे ओरडले.
ते दोघे ओरडले तसे आम्ही थांबलो.
"तिला मारू नका." ... "पण मला मारायचं होतं’... "बिचारी आधीच अर्धमेली झालीय"... दोघे एकत्रच बोलते झाले तसं आम्हीही बुचकळ्यात पडलो.
कुणाचं ऎकावं?
"मी मारत नाहीय फक्त तिला उचलून घराबाहेर टाकतोय.", हे म्हणाले, "कुणाकडे काही आणखी आयडीया असेल तर सांगा."
खोली गप्प झाली.
दोन्ही मुलांना नाराज न करता त्यातला सुवर्णमध्य साधलेला पाहून मला ह्यांच्या एमसीपी बुद्धिमत्तेचं थोडंसं कौतुक करावसं वाटलंच.
मागून काहीच प्रतिक्रिया आली नाही तसं त्याला "ओके!" समजून ह्यांनी रॅकेटने त्या पालीला उचललंच.
"एक मिनिट बाबा!", सौम्याला काहीतरी जाणवलं. ती म्हणाली तसं आम्ही तिथे थबकलो.. "नीट बघा त्या पालीला."
"का?", आम्ही सगळेच ओरडलो.
"तिच्या पोटातून काहीतरी बाहेर येतंय.", सौम्या म्हणाली तसं कातिकने पालीचं नितंब डोळ्यांनी ढुंडाळलं.
"कुठे? शी करतेय का ती?"
"तिथे नाही डंबो!", सौम्याने कार्तिकच्या बुद्धीची कीव त्याला टपली मारून केली.
"तिथे पोटाकडे"
सगळे पोटाकडे पाहू लागले. सासरेबुवांनीही चश्मा चढवला.
आणि खरोखरंच त्या पालीच्या पोटातून काहीतरी बाहेर येत होतं. ओटीपोटाकडच्या भोकातून एका छोटसं गुलाबी लांबट असं काहीतरी होतं. पाल जोरात श्वासोछ्वास करत होती. आम्ही आश्चर्यचकित झालो. ह्यांनी त्या गोष्टीला हात लावला तसा तो भाग पुन्हा आत घुसला अन एक मिनिटात पुन्हा बाहेर आला. जरा जास्तच बाहेर आला होता.
"ओह माय गॉड!" कार्तिक ओरडला, "हिला तर पिल्लू होतंय!"
"अरे देवा ... म्हणुनच पाली पसरल्या घरात... अशा रेटने पिल्लं होऊ लागली तर एक दिवशी आपल्याला घराबाहेर पडावं लागेल.", सासरेबुवा म्हणाले.
"खरंय ते", आम्ही मान्य केलं आणि हे नव्या जोमाने त्या पिलाच्या बाहेर पडणाऱ्या हाताला पकडण्याचा प्रयत्न करू लागले.
पण पुन्हा तेच झालं.
"वाटतंय की तिला पिल्लू बाहेर येताना खूप त्रास होतोय", मी तर्क बांधला.
"ओके. मग काय करू आता मी?", ह्यांनी थोडसं रागातच विचारलं, "टाकू हिला बाहेर?"
"नको!", सौम्या एकदम म्हणाली, "आपण सहाव्या फ्लोर वर राहतो बाबा. हिला बाहेर टाकलं तर लेबरमध्ये असलेल्या एका मुक्या आईला आणि त्याला न जन्मलेल्या पिल्लाला मारायचं पातक आपला माथी लागेल."
सौम्याचे हे शब्द तिच्या दहावीच्या मराठीतल्या निबंधातले होते हे मला ठाऊक असल्याने तिच्या ह्या डायलॉगवर मी सोडून सगळेच भावूक झालेले दिसले.
बिचारी पाल अजूनही उताणी पडलेली प्रसूतीच्या कळा सोसत होती.
पण तिला बाहेर टाकायचे धारिष्ट्य कुणालाही होत नव्हते. मिस्टर मात्र अजूनही तिच्या बाहेर पडणाऱ्या पिलाला खेचून काढायचा वायफळ प्रयत्न करत होते.
"जाऊद्या बाबा! हिला बाहेर व्हरांड्यात सोडा... तिथे पायऱ्यांवर", सौम्याचा सल्ला मानायचा आम्ही नाईलाजाने ठरवलाच. ह्या प्रकारातून लवकरात लवकर सुटका करवून घ्यायचा तोच एक मार्ग दिसत होता.
पालीला शेवटी बाहेर सोडलं आणि सुटकेचा निश्वास सोडला. सौम्याच्या हातात असतं तर तिनं "गेट वेल सून!" चं ग्रिटीन्ग त्या पालीला तिथंच प्रेजेन्ट केलं असतं.
"हुश्श!", पालप्रकरण संपलं बाबा एकदाचं.", सासरेबुवा म्हणाले आणि सौम्या आणि कार्तिक आत आपापल्या खोल्यात गुल्ल झाले.
नंतर पालीचं काय झालं ते कळ्ळं नाही अन दुसर्या दिवशी ती किंवा तिचं पिल्लू काही तिथं दिसलं नाही. अनेक दिवस गेले आणि पेस्ट कंट्रोल ही झालं. आम्ही पालमुक्त झालो.
अशाच एका दिवशी मी, सासरेबुवा आणि हे हॉलमध्ये बसलो होतो टिव्ही पाहात. ह्यांनी रिमोटचा ताबा घेतला होता आणि ते इथं तिथं सर्फ करत होते. सर्फ करता करता नॅशनल जियोग्राफिक लावलं आणि समोरचं चित्र पाहून तिथंच गोठलो.
एक सरड्याएवढी मोठी पाल आपल्या पाठीवर उताणी पडलेली होती आणि तिच्या पोटातून तिचं पिल्लू बाहेर येत होतं. अगदी त्या दिवशी घडलेलं तसंच. मी आवाज वाढवला...
"... रेप्टाईल्स जातीच्या प्राण्यांचं हे रूप आपल्याला विचित्र वाटत असेल पण हे त्यांच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं कार्य आहे. अशाप्रकारे उताणे पडून सरडे आपल्या प्रेयसींची कामक्रियेसाठी आराधना करतात. आपलं लिंग शरीराच्या आतबाहेर करून ते फेरॉमॉन्स सोडतात ज्याने माद्या नरांकडे आकर्षित होऊन काम क्रियेसाठी उत्सुक होतात..."
मी निर्विकार चेहेऱ्याने सासरेबुवांकडे पाहिलं. तेही थंडपणे माझ्याकडे बघत होते. आम्ही दोघांनी मध्ये बसलेल्या ह्यांना हेरलं...
ह्यांनी बुजऱ्या चेहेऱ्याने रीमोटचं बटन दाबलं आणि चॅनल चेंज केला...
समोर मास्टरकार्ड ची जाहिरात लागली होती....
पालीला मारताना तुटू शकणारं बॅटमिण्टन रॅकेट - ५० रूपये
पालींमुळे खराब झालेल्य बेडशीटचं ड्रायक्लिन - १०० रूपये
पालींचा पेस्ट कण्ट्रोल करण्याचा खर्च - ५०० रूपये....
...पण कामक्रियेत मग्न असलेल्या सरड्याचं लिंग पकडायचा प्रयत्न करणाऱ्या नवऱ्याच्या चेहेऱ्यावरचा भाव ----- प्राईझ्लेस्स!!!!
... आणि खरंच प्राईझ्लेस्स होतं त्यानंतरचं खळखळलेलं आम्हा सर्वांचं हास्य....
.... अरे हो पण तुम्ही विचाराल ह्यात कॉमन्सेंस असल्याचा काय संबंध?
अहो असणारच.... त्यानंतर दोन दिवसांनी जीवशास्त्र शिकवताना एक महत्त्वाची बाब आपल्या बुद्धीतून सटकल्याची जाणवली....
तेव्हा वाटलं आपल्या विद्यार्थीदशेत जीवशास्त्राच्या वर्गात चोरून चिंचा खाण्याऎवजी लक्ष दिलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं...
काय? तुम्हाला अजूनही कळलं नाही?
... अहो कॉमन्सेंस.....
... पाली अंडी घालतात हो.
--- (एक जुना आयरीश जोक)
--- विनीत संखे
वाचने
10055
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहाहा. आयला बेक्कार हसलो.
सेम टु सेम असेच मत माझे ही
In reply to हाहाहाहा. आयला बेक्कार हसलो. by मृत्युन्जय
इथून पुढे जेव्हा कधी पाल
http://mnpls.com/animated-pictures-47831.html" title="Animated Pictures Myspace Comments"
शेवटी हसुन हसुन मेलो . ...
मजा आली....
आयला काय भन्नाट आहे. . . मी
एक सरड्याएवढी मोठी पाल आपल्या
संख्ये साहेब बेसीकमध्ये
In reply to एक सरड्याएवढी मोठी पाल आपल्या by विजुभाऊ
आहो भाऊ!
In reply to एक सरड्याएवढी मोठी पाल आपल्या by विजुभाऊ
नेहमीप्रमाणे अर्धवट वाचून
In reply to एक सरड्याएवढी मोठी पाल आपल्या by विजुभाऊ
गप रे
In reply to नेहमीप्रमाणे अर्धवट वाचून by Nile
हाहाहा =)) =)) पार फुटलो
खूप हसलो!!
=)) =))
लेख आवडला
तळटीपः दाक्षिणात्य नावांच्या
In reply to लेख आवडला by Nile
वा वा.. विजुभौंचा अजून एक
In reply to तळटीपः दाक्षिणात्य नावांच्या by विजुभाऊ
विजुभाई, सत्कार सत्कार ( हळू आवाज)
In reply to तळटीपः दाक्षिणात्य नावांच्या by विजुभाऊ
अग्गागागागागागा....... खपलेलो
खल्लास ...
हा हा हा.. खपलो. हसून हसून
आरारा!
मस्त. खुप दिवसांनी मनसोक्त
:)
हसून हसून पुरेवाट.
ऑबॉबॉबॉबॉबॉबॉ...........
मस्त
इंग्रजी जोक इथे सापडला...
In reply to मस्त by चेतन
जाम आवडलं, लई भारी विनित येउ
हा हा हा
=)) =)) =)) =))
अनुवाद वाटत नाहीये. छान !
खि खि खि !
सॉल्लिड!! =))
हा हा हा
अरे हो की...
In reply to हा हा हा by लंबूटांग
शोल्लेट!
पाल अंडी घालते हे न
संख्येआजोबा आजकाल लैच
आहो
In reply to संख्येआजोबा आजकाल लैच by शिल्पा ब
होय अजून यौवनात मी.
In reply to आहो by क्राईममास्तर गोगो
कोणाच्या?
In reply to होय अजून यौवनात मी. by विनीत संखे
लोकांना पर्सनल प्रश्न विचारणे
In reply to कोणाच्या? by शिल्पा ब
काही लोक जसं खाउन पिउन उपास
In reply to लोकांना पर्सनल प्रश्न विचारणे by टारझन
काही लोक जसं खाउन पिउन उपास
In reply to काही लोक जसं खाउन पिउन उपास by शिल्पा ब
पण
In reply to आहो by क्राईममास्तर गोगो
छान
-
सिंपली
लै भारी !!!!!
अरे व्वा!
In reply to लै भारी !!!!! by बबलु
हॅ हॅ हॅ
;-)
In reply to हॅ हॅ हॅ by रमताराम