मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिठीतली रात्र

निनाव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आले आहे पुन्हा सख्या रे मिठीत तुझ्या आज पाहा रे आवरे मोह मज न अधिक आता पडदा तारकांचा पडू दे ना रे... निजले जग, निजले तारे अंतर असे हे मिटले सारे माझ्या कुशीत तु उजळला अधिकच तुझ्या आलिंगनात मज लाज ना रे विझले कधी मी मलाच कळेना तुझ्या कुशीतुन पदर सुटेना उलगडली वेणी, उलगडले अशी मी तुझ्या डोळ्यांत मज बघवेना रे आले विरह ते किरणांचे मज कलह मनाचा काही शमेना दरवळते अजुनी तुझ्या श्वासांचे गंध, पडेल तारकांचा पुन्हा पडदा ना रे? आले आहे पुन्हा सख्या रे मिठीत तुझ्या आज पाहा रे न आवरे मोह मज अधिक आता पडू दे तारकांचा पडदा ना रे...

वाचने 2192 वाचनखूण प्रतिक्रिया 9

सन्जोप राव 15/04/2011 - 06:23
मिठितुन मुठित असा संसाराचा प्रवास असतो असं? माझ्या मते बर्‍याच जणांचा मुठीकडून मिठीकडे असा असतो! असो, कविता आवडली.

In reply to by सन्जोप राव

टारझन 15/04/2011 - 10:25
हेच म्हणनार होतो .. पण नंतर लक्षात आलं .. अरे हो .. अविणाश कुलकर्ण्यांचं तर उत्तर रामायण सुरु झालंय ना ? :) असो .. कविता एकदम निर्लज्ज आणि षृंगारीक आहे हो ;) शरदिनी काकुंनी एकदा अशीस " अर्ध्यावर डाव मोडला .. " वगैरे आशयाची डिसअपाँइंटिंग कविता केली होती .. नंतर ती त्यांनी उडवली .. त्याची आठवण झाली :)

मिसळलेला काव्यप्रेमी 15/04/2011 - 11:10
विझले कधी मी मलाच कळेना तुझ्या कुशीतुन पदर सुटेना उलगडली वेणी, उलगडले अशी मी तुझ्या डोळ्यांत मज बघवेना रे
मस्तच.....

गणेशा 15/04/2011 - 13:54
सर्वच कडवी मस्त .. एकदम छान आले विरह ते किरणांचे मज कलह मनाचा काही शमेना दरवळते अजुनी तुझ्या श्वासांचे गंध, पडेल तारकांचा पुन्हा पडदा ना रे? यातुन जाणवणारी ओढ जबरदस्त ... खरेच खुप सुंदर झाली आह कविता .. मनापासुन आवडली .. अप्रतिम
आले विरह ते किरणांचे मज कलह मनाचा काही शमेना
उलगडले अशी मी तुझ्या डोळ्यांत मज बघवेना रे
पडेल तारकांचा पुन्हा पडदा ना रे?
निनावराव, प्रियकर पुनवेचा चंद्र आणि प्रेयसी रातराणी असे रुपक मला भावले. रातराणी सांगतेय, 'उलगडून मी तुला पहाताना माझे मला पहायला शक्य नाही'. 'तुझ्या श्वासाच्या गंधाने मी अजूनही दरवळले आहे. त्या धुंदीत मला राहु दे.' कारण तारकांच्या मखमली झालरीचा पडदा पुन्हा पडेल व आणखी एका पुनवेची वाट पहात मला राहावे लागेल.'