आले आहे पुन्हा सख्या रे
मिठीत तुझ्या आज पाहा रे
आवरे मोह मज न अधिक आता
पडदा तारकांचा पडू दे ना रे...
निजले जग, निजले तारे
अंतर असे हे मिटले सारे
माझ्या कुशीत तु उजळला अधिकच
तुझ्या आलिंगनात मज लाज ना रे
विझले कधी मी मलाच कळेना
तुझ्या कुशीतुन पदर सुटेना
उलगडली वेणी, उलगडले अशी मी
तुझ्या डोळ्यांत मज बघवेना रे
आले विरह ते किरणांचे मज
कलह मनाचा काही शमेना
दरवळते अजुनी तुझ्या श्वासांचे गंध,
पडेल तारकांचा पुन्हा पडदा ना रे?
आले आहे पुन्हा सख्या रे
मिठीत तुझ्या आज पाहा रे
न आवरे मोह मज अधिक आता
पडू दे तारकांचा पडदा ना रे...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2195
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिठितुन मुठित असा संसाराचा
उलटे
हेच म्हणनार होतो .. पण नंतर
In reply to उलटे by सन्जोप राव
भन्नाट ...!!
मस्त रे!!
सर्वच कडवी मस्त .. एकदम छान
व्वा, क्या बात है !
मित्रांनु, सर्वांचे आभार.
प्रियकर पुनवेचा चंद्र आणि प्रेयसी रातराणी