मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अर्धवट राहीलेले प्रेम

वेदान्त रोहिदास सालियान · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
प्रेम सर्वच करतात पण जो व्यक्ति दुसरया व्यक्ति च्या भावना समजून घेतो तेच खर प्रेम. प्रेम म्हणजे दुसरयासाठी आपल्या भावना बंदिस्त करून ठेवणे. प्रेम करन सोपं असत पण तिच्यासाठी/ त्याच्यासाठी त्याग करन अवघड असत. तीच नाव विदया. आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकायला तासात सुध्दा एकत्रच होतो. तेव्हा कधी तिच्या कड़े पाहिल्यावर वाटल नाही की कधी मी तिच्यावर प्रेम करेन पण म्हणतात ना की प्रेम आंधळं असत. दिसायला तशी ती attractive रंग सावला. उंचीने लहान पण खरच तिच्या सारखी कोणीच नाही. बरेच मुले तिच्या आणि तिच्या बहिणीच्या मागे लागले होते काही मुल त्यांना नेहमी चिडवित असत. मी सुध्दा बरयाच वेळा तिला चिडवल पण ती मला किंवा कोणत्याही मुलाला काहीच म्हणत नसे. इतर अनेक गोष्टीमुळे मी तिच्यावर प्रेम करू लागलो.सकाळी क्लास सुटल्यावर मी तिला प्रपोज केला तसा थोडा घाबरत होतो पण माझे काही जिवलग मित्रांचा सपोर्ट होता मला त्यांनी आणि तिच्या बहिणी ने मला थोड़ी मदत केली. माझ्या कोणत्याच मित्राला अपेक्षा नव्हती की मी तिला प्रपोज करेल म्हणून. सकाळी ८.०० वाजता क्लास सुटल्यावर मी तिच्या मागे मागे गेलो तिला थांब म्हणालो तशी ती थांबली पण थोड़ी घाबरत घाबरत. शेवटी तिला मी प्रपोज केला तीच उत्तर ऐकण्यासाठी कॉलेज मध्ये लायब्ररी जवळ उभा राहिलो कोणत्याच गोष्टींचा विचार न करता सरळ जाउन उत्तर विचारल पण ती नाही म्हणाली. मला म्हणाली मी फ्रेंडशिप करेन पण मी तुला "हा" नाही म्हणु शकत "sorry". एवढ म्हणून ती निघून गेली. त्या नंतर १२ वीच्या वर्षभर मी पुन्हा कधी तिच्या शी बोलण्याचा प्रयत्न सुध्दा केला नाही. पण १२ वीच्या शेवटच्या दिवशी पुन्हा तिच्याशी बोलण्यासाठी गेलो या वेळी त्यावेळची भीती तिच्या चेहऱ्यावर नव्हती. पुन्हा प्रपोज केला, पण या वेळी तीच उत्तर वेगळ होत, ती म्हणाली मला तू आवडतोस पण माझ्या घरी कळालं तर मला खुप मारतील आणि माझ कॉलेज सुध्दा बंद होइल. आता तूच सांग मी काय करु? तिच्या या प्रश्नाला मी काहीच उत्तर देऊ शकलो नाही. तीला उत्तर न देउन माझी काही चुक झाली का? तिच्या भावना समजुन घेन्यात मी चुकलो का? याच उत्तर तुम्हीच द्या..........

वाचन 6985 प्रतिक्रिया 0