Skip to main content

(का केली दाढी ही अशी...?)

लेखक पक्का इडियट यांनी सोमवार, 11/04/2011 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - http://misalpav.com/node/17606 खरं सांगायचं तर..... आज-काल दाढी करयची देखील खुप भीती वाटते । कारण.... कुठलीशी गालावरली बट, नकळतच राहूनच जाते । दाढीचे केस मग, सहजा-सहजी तुटत नाहीत । भावनांचे पीळ त्या केसांतले, काहीकेल्या सुटत नाहीत । सुटले पीळ तुटले केस तरी, ते जखमा देउन जातात । जखमा त्या डोळ्यांत अपुल्या, ओलावा ठेउन जातात । ओलावा त्या डोल्यांतला, लपवू पाहता लपत नाही । डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब खाली पडल्या वाचून राहत नाही । आणि मग...! का केली दाढी ही अशी...? हा प्रश्‍न मला सतावत राहतो । पण मी मात्र सदैव असाच, दाढी दरदिवशी करत राहतो ।
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2256
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

हीहीही! {नृत्य वाचून आणखीच मजा आली}

In reply to by प्राजु

ब्रेकिंग न्यूज... ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव निखंज हे मिसळ्पाव वर असून प्राजु हा त्यांचा आय डी असल्याचे आमचा वार्ताहार दिपक भोज्पुरिया कळवतो.

भावनांचे पीळ त्या केसांतले, काहीकेल्या सुटत नाहीत । सुटले पीळ तुटले केस तरी, ते जखमा देउन जातात । >> हेहेहे कुठले कुठे !!