चीन मधील "हरवलेल्या" मुली
१९८९ मध्ये चीनी लेखिका झिन रान ही शान्डोंग भागातील एका गावाच्या मुख्याच्या घरी रात्रीचे भोजन घेत होती.
त्याची सूनबाई शेजारच्याच खोलीत वेणा देत होती एका नव्या जीवाला जगात आणण्या साठी. तितक्यात त्या शेजारच्या खोलीत रडारड झाली.
थोड्यावेळाने सुईण बाई कामाचे पैसे घेण्यासाठी बाहेर आल्या असता त्यांच्या जवळच्या टोपली मध्ये अचानक एक हालचाल दिसली. नीट पाहिले असता त्यातून एक इवलासा पाय डोकावत होता.
त्या खोलीत ती एकटीच होती जिचा थरकाप झाला होता. मुख्याच्या पत्नीने सहजपणे सांगितले की " ते मूल नाहीये. जर असते तर आम्ही त्याला आत्ता सांभाळताना दिसलो असतो. पण ती एक मुलगी आहे आणि आम्ही तिला ठेवू शकत नाही. "
झिन रान सांगते , " चीनी प्रथेनुसार तुम्हाला मुलगा नसेल तर तुम्हाला माणूस म्हणून गणले जात नाही.(प्रतिष्ठा मिळत नाही.) ".
"सांस्कृतिक क्रांती " यशस्वी केल्यानंतर कम्युनिस्ट सरकारने वाढत्या लोकसंख्येला आळा बसावा म्हणून १९७९ पासून ' एक कुटुंब एक मूल ' योजना सक्तीने राबावावायास सुरुवात केली. त्यामुळे एका पेक्षा जास्त असणारी बालके बेकायदेशीर ठरत असल्यामुळे लोकांनी मुलगा होइपर्यन्तच्या सर्व बालिकांना टाकून देणेच पसंत केले.
असेच एकदा रेल्वे प्रवासात तिच्या सोबत एक नवरा बायको आणि त्यांची छोटुकली होती. आई-बापाला घेऊन गाडी सुटली पण ती छोटुकली मुलगी मात्र स्टेशनच्या प्लाटफॉर्मवरच बसलेली होती. त्या बिचार्या मुलीला आधी ३ बहिणी होत्या.
पुन्हाच्या खेपेला मुलगाच होईल या आशेने त्या आई-बापानी ही चौथी मुलगी टाकून दिली होती. अश्या कुटुंबांना " जास्तीच्या(नको असलेल्या) जीवां विरुद्ध लढणारे " असेच चीनी लोक म्हणतात. हे योद्धे अश्या भागान मध्ये आसरा घेतात जिथे त्यांच्या कुटुंबाचा पटकन मागोवा घेता येत नाही की मागच्या पोराबाळाचा थांग लागत नाही.
चीनी बाळतिनीच्या खोलीत सुईण एक गरमा पाण्याने भरलेला टब घेऊन जात असते. जर मुलगा झाला तर त्याला आंघोळ घालण्यासाठी आणि मुलगी झाली तर तिला त्याच पाण्यात जलसमाधी देण्यासाठी.
झिन रानने बरीच अनाथालये पालथी घातली तेंव्हा त्यात जवळपास मुलीच आढळल्या, काही काही मातांनी त्याना सोडताना काही खुणा सोडल्या होत्या ज्यायोगे मोठेपणी त्या आई बापांचा मागोवा घेऊ शकतील. पण अनाथालये अश्या खुणा फेकून देते.
झिन रान च्या पुस्तकामुळे चीन मधील अश्या अनेक दुर्दैवी कन्या आणि माता आणि कुटुंबांची व्यथा जगासमोर येऊ शकली.
भारतातील मुलींच्या जन्माच्या आणि जन्मदराच्या पार्श्वभूमीवर "सांस्कृतिक क्रांती " झालेल्या चीन मध्येही अश्या प्रथा जिवंत असतील याचा धक्का बसल्यावाचून राहात नाही.
(इंडियन एक्स्प्रेस मधील एका लेखावर आधारित )
याद्या
10515
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
भयंकर रानटी प्रकार. मग ते
चीन कशाला, भारतातदेखील या
बरोबर आहे.
In reply to चीन कशाला, भारतातदेखील या by असुर
भारतातील जवळचेच उदाहरण देतो.
In reply to चीन कशाला, भारतातदेखील या by असुर
जगात कुठेही असाल तर हा प्रकार
पुढारलेल्या देशांतही अशीच मानसिकता आहे.
चुकीचे वाटते
In reply to पुढारलेल्या देशांतही अशीच मानसिकता आहे. by नेत्रेश
अमेरिकेत मुलांचे प्रमान मुलिंपेक्षा कमी आहे
In reply to चुकीचे वाटते by किशोरअहिरे
अमेरिकेत मुलांचे प्रमान मुलिंपेक्षा कमी आहे
In reply to अमेरिकेत मुलांचे प्रमान मुलिंपेक्षा कमी आहे by नेत्रेश
अमेरिकेत मुलांचे प्रमान
In reply to चुकीचे वाटते by किशोरअहिरे
सुधारणा
In reply to अमेरिकेत मुलांचे प्रमान by परिकथेतील राजकुमार
वंशाचा दिवा...म्हातारपणाला आधार
In reply to पुढारलेल्या देशांतही अशीच मानसिकता आहे. by नेत्रेश
नोव्हें. २०१० च्या रिडर्स
माझ्या ओळखीतल्या काही
खरे आहे. १२-१३ वर्षे
In reply to माझ्या ओळखीतल्या काही by मृत्युन्जय
पुरावा काय?
In reply to माझ्या ओळखीतल्या काही by मृत्युन्जय
हे मानायला मी तरी तयार
In reply to पुरावा काय? by पंगा
नवजात मुलींची हत्या ही
चक्रच आहे ते
In reply to नवजात मुलींची हत्या ही by नगरीनिरंजन
.........
अरे बापरे!!! भारतात फॉस्टर
In reply to ......... by पिलीयन रायडर
..
चीन मधील मुले : मुली यांचे
या घटना कोणत्या समाजांत घडतात तेही महत्त्वाचे आहे...
जातीच्या नावाने मिशांना पीळ
In reply to या घटना कोणत्या समाजांत घडतात तेही महत्त्वाचे आहे... by योगप्रभू
त्यातही गोम आहे
In reply to जातीच्या नावाने मिशांना पीळ by रेवती
मुली काही दिवस घरात राहून
In reply to त्यातही गोम आहे by स्मिता.
आपल्याला सगळ्यांना हे कळते पण
In reply to त्यातही गोम आहे by स्मिता.
हम्म!
In reply to आपल्याला सगळ्यांना हे कळते पण by चिंतामणी
हंममममममममम
In reply to हम्म! by स्मिता.
लाभल्रे भाग्य आम्हासी
कलंत्रीसाहेब विधानाने वाईट वाटले....
In reply to लाभल्रे भाग्य आम्हासी by कलंत्री
जे खरे आहे ते सांगितले.
In reply to कलंत्रीसाहेब विधानाने वाईट वाटले.... by योगप्रभू
असे
In reply to जे खरे आहे ते सांगितले. by कलंत्री
भारतीतील आकडेवारी.