✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शीर्षक नसलेली सत्यकथा!!

प
पिवळा डांबिस यांनी
Wed, 04/06/2011 - 11:23  ·  लेख
लेख
एक नेहमीसारखाच कंटाळवाणा नोकरीचा दिवस..... मी रोजच्याप्रमाणे ऑफिसात येऊन दाखल झालो होतो... नेहमीचीच कामं! काही सहकार्‍यांवर सोपवली, जी फक्त माझ्यासाठीच होती ती करून संपवली..... आता दिवस मोकळा.... पण नशीब नेहमीच साथ देत नाही!!! "ट्रिंग, ट्रिंग...", फोन वाजला.... "हॅलो:....", मी "हॅलो, सर, धिस इस जेनिफर स्मिथ, फ्रॉम डॅलस, टेक्सास.....", जेनिफर ही माझी एक सीआरए, क्लिनिकल रीसर्च असोसिएट.... "हाय जेनिफर, नाईस टू हिअर फ्रॉम यू आफ्टर अ लॉन्ग टाईम! हाउ कॅन आय हेल्प यू?" "सर, आय अ‍ॅम अल्सो प्लीज्ड टू टॉक टू यू बट अंडर अन्फोर्चुनेट सरकमस्टान्सेस!!!!" "व्हाय, व्हॉट इस द मॅटर?" "सर आय हॅव अ पेशंन्ट हियर! शी इज नॉट रिस्पॉन्डिंग टू अवर मेडिकेशन!!! यू नीड टू कम हियर एएसएपी, सर!!!!" "व्हाय? आरन्ट द लोकल डॉक्टर्स देअर? हाऊ ओल्ड इज शी? "शी इज जस्ट सिक्स, डॉक!!!" "........", मी. "दॅट इस व्हाय आय गेव्ह यू अ कॉल!!!! यू नीड टू कम हियर पर्सनली......" "बट व्हाय मी? इजंट ग्रेग अ‍ॅव्हेलेबल?", मी... ग्रेगजॉन्सन हा आमचा क्लिनिकल ट्रायल अटेन्डिन्ङ डॉक्टर!! आणि मला माझ्या वीकांताची काळजी!!! "ग्रेग मे नॉट बी एबल टु हॅन्डल इट सर! नो ऑफेन्स टू हिम, बट धिस इज माय हंबल ओपिनियन!!!!", फील्डमध्ये वर्षानुवर्षे काम करून सरावलेली जेनिफर हे बोलत होती!!! मला झक मारत सिरियस व्हावंच लागलं.... ".... ओके, ओके!!! आय विल बी ऑन द नेक्स्ट पॉसिबल फ्लाईट" "थॅन्क्यू सर!!!", जेनिफरच्या आवाजात एक अनोखं गहिवरलेपण...,"सॉरी सर, आय नो आय अ‍ॅम स्पॉयलिंग युवर वीकेंन्ड!!!!" "फक द वीकेन्ड!!! आय विल बी देअर बाय टूनाईट!!", आयची ** या वीकांताच्या!!! " आय हॅव फक्ड माय वीकेन्ड टू, सर!!!! सी यू देन! यू विल नॉट बी डिसअपॉईंटेड!!!", जेनिफर इज अ गुड गर्ल.... क्लिक...... चिल्ड्रन्स मेडिकल सेन्टर इन डॅलस...... खास लहान मुलांसाठी निघालेलं हॉस्पिटल...... बालवयातच आयुष्याच्या अखेरच्या प्रवासाला निघालेले ते निष्पाप जीव..... मला इथे यायला अजिबात आवडत नाही... कारण हॄदय कळवळतं त्या इवल्याल्या जीवांचे हाल बघून!!!! आणि संतापतंही!!!! मनावर दगड ठेवूनच मी त्या हॉस्पिटलच्या सरकत्या दारातून प्रवेश केला..... जेनिफर होतीच स्वागताला.... "प्लीज फॉलो मी सर, हियर शी इज..." (क्रमशः)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
17913 वाचन

💬 प्रतिसाद (73)

प्रतिक्रिया

येऊ दे अजून

निनाद मुक्काम …
Wed, 04/06/2011 - 20:41 नवीन
येऊ दे अजून ह्या वैद्यकीय शेत्रातील लोकांचे आयुष्य अजब असते . म्हणजे समजा विकांताला बायकोचा किंवा एखाद्या मित्राचा वाढदिवस म्हणून घरी बायको वाट पाहत आहे .व डॉक्टर अश्या प्रकारची केस हाताळून घरी येत आहे .तेव्हा त्यांना लगेच आपला मूड स्वीच कसा काय करून लगेच आंनद साजरा करेन .? अश्या घटना त्यांच्या वयक्तिक आयुष्यात प्रभाव टाकतात का ? हा प्रश्न नेहमी मला पडतो
  • Log in or register to post comments

पुन्हा लिहायला घेतले हे उत्तम

धनंजय
Wed, 04/06/2011 - 21:39 नवीन
पुन्हा लिहायला घेतले हे उत्तम!
  • Log in or register to post comments

काका

गोगोल
Wed, 04/06/2011 - 22:04 नवीन
तुम्ही डॉक्टर आहात?
  • Log in or register to post comments

वाचतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 04/06/2011 - 22:25 नवीन
पुढचा भाग लवकर टाका. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

पुढच्या भागाची वाट पाहत आहे.

शिल्पा ब
Wed, 04/06/2011 - 22:58 नवीन
पुढच्या भागाची वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments

वा! 'पेनामध्ये भरतो शाई... आता करितो भरपाई', म्हणालात..

बहुगुणी
गुरुवार, 04/07/2011 - 01:59 नवीन
..भरपाई चांगलीच होणार असं दिसतंय! येऊ द्या लवकर पुढचे भाग.. (पुढचं कथानक CRO आणि clinical trials शी संबंधित असेल का असा विचार करतोय..)
  • Log in or register to post comments

काका, वाचतेय!! रडावू नका

भाग्यश्री
गुरुवार, 04/07/2011 - 04:12 नवीन
काका, वाचतेय!! रडावू नका प्लीज!!
  • Log in or register to post comments

वाचतोय...

लिखाळ
गुरुवार, 04/07/2011 - 19:15 नवीन
वाचतोय...
  • Log in or register to post comments

मस्त सुरूवात सिडॉ!

नीधप
गुरुवार, 04/07/2011 - 23:44 नवीन
मस्त सुरूवात सिडॉ!
  • Log in or register to post comments

स्तब्ध

सविता००१
Fri, 04/08/2011 - 11:15 नवीन
...
  • Log in or register to post comments

पुढे?

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 04/08/2011 - 11:46 नवीन
पुढे? (रोमन लिपीतलं मराठी आणि देवनागरी लिपीतलं इंग्लिश वाचायला त्रास होतो खरा!)
  • Log in or register to post comments

काका...

चिगो
Fri, 04/08/2011 - 15:10 नवीन
पकड घेणारी सुरुवात आहे.. कुठल्याही अपेक्षा न ठेवता आणि मागण्या न करता, पुभाप्र.
  • Log in or register to post comments

वाच्तोय

विनायक प्रभू
Fri, 04/08/2011 - 15:18 नवीन
पु.भा.ल्.टा.
  • Log in or register to post comments

पुढे काय आणि कधी? या भागावरून

नगरीनिरंजन
Fri, 04/08/2011 - 17:39 नवीन
पुढे काय आणि कधी? या भागावरून काहीच अंदाज लागत नाहीये.
  • Log in or register to post comments

चांगली सुर्वात पण छोटा भाग ..

भडकमकर मास्तर
Fri, 04/08/2011 - 18:20 नवीन
चांगली सुर्वात पण छोटा भाग .. येउद्या
  • Log in or register to post comments

मस्त

राजेश घासकडवी
Fri, 04/08/2011 - 22:55 नवीन
पुढची कथा येऊ द्यात. हे वर्ष मिपावरील एकंदरीत लेखनाच्या दर्जाच्या बाबतीत सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं जाणार अशी चिह्नं दिसत आहेत.
  • Log in or register to post comments

वाचतेय ...

प्राजक्ता पवार
Fri, 04/08/2011 - 23:04 नवीन
वाचतेय ...
  • Log in or register to post comments

वाचतेय. पुढचा भाग लवकर टाका.

शहराजाद
Sat, 04/09/2011 - 01:46 नवीन
वाचतेय. पुढचा भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments

ह्या लेखाचा पुढचा भागाचा दुवा

NiluMP
Fri, 06/26/2015 - 23:18 नवीन
ह्या लेखाचा पुढचा भागाचा दुवा कोणाला माहित आहे का?
  • Log in or register to post comments

शाब्बास

मी-सौरभ
Sun, 06/28/2015 - 13:53 नवीन
खाण कामगार झिंदाबाद
  • Log in or register to post comments

काय छान सस्पेंस क्रिएट केलात

शि बि आय
Mon, 06/29/2015 - 12:56 नवीन
काय छान सस्पेंस क्रिएट केलात हो ! अगदी सुरुवाती पासूनच पकड घेतली आहे कथेने. पुढचा भाग कधी टाकणार आहात?
  • Log in or register to post comments

आणि हो ते सारखे क्रमशः नको हो

तुडतुडी
Tue, 06/30/2015 - 16:51 नवीन
आणि हो ते सारखे क्रमशः नको हो काका, लवकर एकादाच काय ती पुर्ण करून टंका.>>+11111111 पहिला भाग फारच छोटा झाल्यासारखा वाटतोय
  • Log in or register to post comments

या कथेचे पुढचे भाग कुठे

शित्रेउमेश
Mon, 04/15/2024 - 12:55 नवीन
या कथेचे पुढचे भाग कुठे मिळतील??
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा