✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शीर्षक नसलेली सत्यकथा!!

प
पिवळा डांबिस यांनी
Wed, 04/06/2011 - 11:23  ·  लेख
लेख
एक नेहमीसारखाच कंटाळवाणा नोकरीचा दिवस..... मी रोजच्याप्रमाणे ऑफिसात येऊन दाखल झालो होतो... नेहमीचीच कामं! काही सहकार्‍यांवर सोपवली, जी फक्त माझ्यासाठीच होती ती करून संपवली..... आता दिवस मोकळा.... पण नशीब नेहमीच साथ देत नाही!!! "ट्रिंग, ट्रिंग...", फोन वाजला.... "हॅलो:....", मी "हॅलो, सर, धिस इस जेनिफर स्मिथ, फ्रॉम डॅलस, टेक्सास.....", जेनिफर ही माझी एक सीआरए, क्लिनिकल रीसर्च असोसिएट.... "हाय जेनिफर, नाईस टू हिअर फ्रॉम यू आफ्टर अ लॉन्ग टाईम! हाउ कॅन आय हेल्प यू?" "सर, आय अ‍ॅम अल्सो प्लीज्ड टू टॉक टू यू बट अंडर अन्फोर्चुनेट सरकमस्टान्सेस!!!!" "व्हाय, व्हॉट इस द मॅटर?" "सर आय हॅव अ पेशंन्ट हियर! शी इज नॉट रिस्पॉन्डिंग टू अवर मेडिकेशन!!! यू नीड टू कम हियर एएसएपी, सर!!!!" "व्हाय? आरन्ट द लोकल डॉक्टर्स देअर? हाऊ ओल्ड इज शी? "शी इज जस्ट सिक्स, डॉक!!!" "........", मी. "दॅट इस व्हाय आय गेव्ह यू अ कॉल!!!! यू नीड टू कम हियर पर्सनली......" "बट व्हाय मी? इजंट ग्रेग अ‍ॅव्हेलेबल?", मी... ग्रेगजॉन्सन हा आमचा क्लिनिकल ट्रायल अटेन्डिन्ङ डॉक्टर!! आणि मला माझ्या वीकांताची काळजी!!! "ग्रेग मे नॉट बी एबल टु हॅन्डल इट सर! नो ऑफेन्स टू हिम, बट धिस इज माय हंबल ओपिनियन!!!!", फील्डमध्ये वर्षानुवर्षे काम करून सरावलेली जेनिफर हे बोलत होती!!! मला झक मारत सिरियस व्हावंच लागलं.... ".... ओके, ओके!!! आय विल बी ऑन द नेक्स्ट पॉसिबल फ्लाईट" "थॅन्क्यू सर!!!", जेनिफरच्या आवाजात एक अनोखं गहिवरलेपण...,"सॉरी सर, आय नो आय अ‍ॅम स्पॉयलिंग युवर वीकेंन्ड!!!!" "फक द वीकेन्ड!!! आय विल बी देअर बाय टूनाईट!!", आयची ** या वीकांताच्या!!! " आय हॅव फक्ड माय वीकेन्ड टू, सर!!!! सी यू देन! यू विल नॉट बी डिसअपॉईंटेड!!!", जेनिफर इज अ गुड गर्ल.... क्लिक...... चिल्ड्रन्स मेडिकल सेन्टर इन डॅलस...... खास लहान मुलांसाठी निघालेलं हॉस्पिटल...... बालवयातच आयुष्याच्या अखेरच्या प्रवासाला निघालेले ते निष्पाप जीव..... मला इथे यायला अजिबात आवडत नाही... कारण हॄदय कळवळतं त्या इवल्याल्या जीवांचे हाल बघून!!!! आणि संतापतंही!!!! मनावर दगड ठेवूनच मी त्या हॉस्पिटलच्या सरकत्या दारातून प्रवेश केला..... जेनिफर होतीच स्वागताला.... "प्लीज फॉलो मी सर, हियर शी इज..." (क्रमशः)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
17913 वाचन

💬 प्रतिसाद (73)

प्रतिक्रिया

वाचतोय.......

नि३
Wed, 04/06/2011 - 11:28 नवीन
वाचतोय.......
  • Log in or register to post comments

पिडा काका, विषय शिर्ष हलवणारा

स्पंदना
Wed, 04/06/2011 - 11:30 नवीन
पिडा काका, विषय शिर्ष हलवणारा दिसतोय. पुढचा भाग वाचावा की नको हा विचार चाललाय. मला लहान मुलांबद्दल अस काही वाचताना फार त्रास होतो.
  • Log in or register to post comments

+ १ पण पुढचा भाग वाचायची ओढ

विनायक बेलापुरे
Wed, 04/06/2011 - 11:57 नवीन
+ १ पण पुढचा भाग वाचायची ओढ लागली आहे. पुस्तकासारखा शेवट आधी पाहता आला असता तर बरं, असं वाटतयं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

पुढे ...

छोटा डॉन
Wed, 04/06/2011 - 11:31 नवीन
पिडांकाका, वाचतो आहे. पुढच्या भाग पटकन टाका ... - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

हं - To be or not to be

सहज
Wed, 04/06/2011 - 11:33 नवीन
पुढे वाचायचे की नाही वाचायचे हा मोठा प्रश्न आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हम्म...

पैसा
Wed, 04/06/2011 - 11:41 नवीन
वाचून डोक्याला त्रास होणार हे नक्की. पण पिडां लिहितायत आणि वाचायचं नाही हे कसं शक्य आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+१+२

छोटा डॉन
Wed, 04/06/2011 - 11:58 नवीन
सहजरावांना +१ >>पण पिडां लिहितायत आणि वाचायचं नाही हे कसं शक्य आहे? पैसाताईंना +२ - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+१ टु सहजराव... +२ टु

वपाडाव
Wed, 04/06/2011 - 17:37 नवीन
+१ टु सहजराव... +२ टु पैसातै... +३ टु डाण्राव...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

सत्यकथेची सुरुवात मनाची पकड

यशोधरा
Wed, 04/06/2011 - 11:32 नवीन
सत्यकथेची सुरुवात मनाची पकड घेणारी झालेली आहे. लहान मुलांविषयी दु:खद वाचायला लागणारे का? :( अवांतर : एक विनंती आहे की कथेतले संभाषण मराठीकरण करुन नाही का देता येणार? एखाद दुसरा शब्द, वाक्य इंग्लिशमध्ये ठीकच आहे, पण वाक्येच्या वाक्ये वाचायला नको वाटते.
  • Log in or register to post comments

सॉरी!

पिवळा डांबिस
Wed, 04/06/2011 - 11:44 नवीन
कथेतले संभाषण मराठीकरण करुन नाही का देता येणार? सॉरी, मला नाही देता येणार.... कारण मग ती कथा ज्या वातावरणात फुलली आहे ते वातावरण नाही मला उभं करता येणार!!!! कथा पूर्ण झाल्यावर जर तुम्ही ती पुन्हा सर्वस्वी सं पूर्ण मराठीतच उभी करणार असाल तर तुमचे स्वागत आहे... पण तोवर क्षमस्व!!!! (अधिक चर्चा हवी असल्यास ती खवमध्ये करू)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ओके

यशोधरा
Wed, 04/06/2011 - 11:56 नवीन
ओके :) पुढील कथेची वाट पहात आहे. अवांतर: चर्चा वगैरे काय हो काका? आणि सॉरी/ क्षमस्व? :( काका ष्टोरी सांगतत म्हणून विचारुचा धाडस केलय आणि तितकी मोकळीक घेतलय... तुमका आवडूक नाय तर सॉरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

धन्यवाद!

पिवळा डांबिस
Wed, 04/06/2011 - 11:57 नवीन
जेंव्हा तुझं व्यक्तिचित्र लिहीन तेंव्हा ते संपूर्ण मराठीतूनच लिहीन!!! आय प्रॉमिस, ओके? आता हास बघू!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

>जेंव्हा तुझं व्यक्तिचित्र

यशोधरा
Wed, 04/06/2011 - 12:00 नवीन
>जेंव्हा तुझं व्यक्तिचित्र लिहीन >> बाप्रे! जाहीर शिव्यो घालतल्यात तर! :D नको हां! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

+१

नंदन
Wed, 04/06/2011 - 12:41 नवीन
जेंव्हा तुझं व्यक्तिचित्र लिहीन तेंव्हा ते संपूर्ण मराठीतूनच लिहीन!!!
नक्की लिहा हो काका - तेही मालवणीतून. काकांक काळजी!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

तुका संपादित करुक देवचे आसत

यशोधरा
Wed, 04/06/2011 - 12:52 नवीन
तुका संपादित करुक देवचे आसत :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

लेखकाची अडचण समजू शकतो

पंगा
गुरुवार, 04/07/2011 - 02:32 नवीन
एक विनंती आहे की कथेतले संभाषण मराठीकरण करुन नाही का देता येणार? एखाद दुसरा शब्द, वाक्य इंग्लिशमध्ये ठीकच आहे, पण वाक्येच्या वाक्ये वाचायला नको वाटते.
मराठी कथेत इंग्रजीतील वाक्येच्या वाक्ये वाचायला नको वाटते हे खरेच आहे, परंतु लेखकाची अडचण समजू शकतो. "कथा ज्या वातावरणात फुलली आहे ते वातावरण उभे करता येणार नाही" हा एक मुद्दा आहेच, शिवाय अनेकदा संवाद मराठीत जसेच्या तसे आणि आशयाला धक्का न पोहोचता आणण्यात एका प्रकारची कृत्रिमता येण्याचा धोका असतो, तो टाळावासा वाटणे साहजिक आहे. विशेषतः,
"फक द वीकेन्ड!!! आय विल बी देअर बाय टूनाईट!!", आयची ** या वीकांताच्या!!! " आय हॅव फक्ड माय वीकेन्ड टू, सर!!!! सी यू देन! यू विल नॉट बी डिसअपॉईंटेड!!!", जेनिफर इज अ गुड गर्ल....
यांसारखे संवाद मराठमोळ्या वातावरणात आणल्यास फारच विचित्र वाटू शकतील असे वाटते. "माझ्या वीकांताची ऐशीतैशी!" *, "माझ्या वीकांताची ऐशीतैशी तर मी अगोदरच करून ठेवलेली आहे साहेब!" * असे काहीसे भाषांतर करून वेळ मारून नेता येईल खरी **, पण तसे ते केल्यास मग ती नेमकी अर्थच्छटा येणार नाही, आणि ते नेमके वातावरण - आणि विशेष करून संवादकर्त्यांची एकमेकांशी अनौपचारिकता - मनश्चक्षूंसमोर नेमकी उभी राहणार नाही, या लेखकाच्या म्हणण्याची प्रचीती यावी, असे वाटते. आणि ही अडचण समजण्यासारखी आहे. अशा अडचणीत लेखकाला न टाकलेलेच बरे. (* अतिरिक्त उद्गारचिन्हे गाळलेली आहेत.) (** याहून थेट अशी शतप्रतिशत मराठमोळी भाषांतरे अर्थातच शक्य आहेत, परंतु मग ती मूळ तर्जुम्यातील वाक्यांपेक्षा खूपच अधिक अनौपचारिक होतील; आणि किती वाचक ती पचवू शकतील याबद्दल साशंक आहे.) बाकी,
सत्यकथेची सुरुवात मनाची पकड घेणारी झालेली आहे.
याच्याशी सोळा आणे सहमत. अत्यंत प्रभावी सुरुवात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

प्रत्येकवेळेस एवढी चिरफाड

शिल्पा ब
गुरुवार, 04/07/2011 - 02:39 नवीन
प्रत्येकवेळेस एवढी चिरफाड केलीच पाहिजे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

त्याचे असे आहे...

पंगा
गुरुवार, 04/07/2011 - 02:51 नवीन
त्यांनी प्रश्न विचारला. मला त्यात अडचण नेमकी काय असू शकेल ती दिसते आहे असे वाटले. मी सांगितले. मामला खतम. आता यावर अधिक चर्चा (आणि तीही इथे) झालीच पाहिजे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

काकांना विचारले हो.

यशोधरा
गुरुवार, 04/07/2011 - 15:46 नवीन
काकांना विचारले हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

?

पंगा
गुरुवार, 04/07/2011 - 17:44 नवीन
त्याने काय फरक पडतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

काकांनी आधीच उत्तर दिले,

यशोधरा
गुरुवार, 04/07/2011 - 17:47 नवीन
काकांनी आधीच उत्तर दिले, संपला विषय. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

ओ साहेब हुरहूर लावून ठेवलीय

इरसाल
Wed, 04/06/2011 - 11:34 नवीन
ओ साहेब हुरहूर लावून ठेवलीय .....आता जास्त वेळ न लावता पुढचा भाग टाका पाहू लवकर आतुरतेने वाट पाहतोय म्हटलं..........................
  • Log in or register to post comments

वाचतोय............नि

नन्दादीप
Wed, 04/06/2011 - 11:42 नवीन
वाचतोय.... . . . . . . . . स्तब्ध....!!!
  • Log in or register to post comments

या वर्षाची सुरवात चांगली

आनंद
Wed, 04/06/2011 - 11:44 नवीन
या वर्षाची सुरवात चांगली होतेय, एका पेक्षा एक महारथी लिहते होतायेत.
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Wed, 04/06/2011 - 12:42 नवीन
या वर्षाची सुरवात चांगली होतेय, एका पेक्षा एक महारथी लिहते होतायेत.
सहमत आहे. पहिला भाग अगदी पकड घेणारा, वाचतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

+२

सखी
Wed, 04/06/2011 - 18:15 नवीन
या वर्षाची सुरवात चांगली होतेय, एका पेक्षा एक महारथी लिहते होतायेत. हेच टंकणार होते - मिपाला साडेतीन मुहर्तातील एकाची गरज होती असे दिसतेय. सुरवात नेहमीसारखीच उत्सुकता वाढवणारी, पकड घेणारी झाली आहे, भाग अजुन थोडेसे मोठे टाकता येतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+३

आनंदयात्री
Wed, 04/06/2011 - 20:35 नवीन
मिपा वर छान आधीसारखे भरभरुन लेखन येतेय म्हणुन आनंद वाटतो. पिडाकाकांचे लेखन म्हटले की पहिले अ‍ॅलिसनचे आणि काकांच्या गॉडपॅरेंट होण्याची गोष्ट आठवते, यापुढे आता ही लेखमाला आठवेल असे वाटते. काका सत्यकथा लिहितात आणि काका बेश्ट आहेत म्हणुन या गोष्टीचा शेवट करुण होणार नाही याची खात्री आहे. (अवांतरः बाकी काका साहेब असल्याने काकांना हापिसात बर्‍यापैकी वेळ मिळतो हे निरिक्षण नोंदवुन ठेवले ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

पिडांकाका भाग खुपच लहान आहे

मृत्युन्जय
Wed, 04/06/2011 - 11:48 नवीन
पिडांकाका भाग खुपच लहान आहे हो. पण वाचतोय. आशा करतो की सुखांत आहे.
  • Log in or register to post comments

(No subject)

प्रीत-मोहर
Wed, 04/06/2011 - 11:50 नवीन
:(
  • Log in or register to post comments

>>>>बालवयातच आयुष्याच्या

प्रास
Wed, 04/06/2011 - 11:51 नवीन
>>>>बालवयातच आयुष्याच्या अखेरच्या प्रवासाला निघालेले ते निष्पाप जीव..... मला इथे यायला अजिबात आवडत नाही... कारण हॄदय कळवळतं त्या इवल्याल्या जीवांचे हाल बघून!!!! आणि संतापतंही!!!!<<<< एकदम सहमत! पुढचं लिखाण वाचायची घाई झालेली आहे. लवकर येऊ द्या पिडांकाका.....
  • Log in or register to post comments

वाचतेय

sneharani
Wed, 04/06/2011 - 11:53 नवीन
वाचतेय...!
  • Log in or register to post comments

हम्म्म.....

साबु
Wed, 04/06/2011 - 11:53 नवीन
वाचुन रहिलोय....
  • Log in or register to post comments

नाही

रामदास
Wed, 04/06/2011 - 12:02 नवीन
माझा विश्वास आहे. डोळे पुसून झाल्यावर तुम्ही हसवणारच आम्हाला.
  • Log in or register to post comments

सहमत

श्रावण मोडक
Wed, 04/06/2011 - 15:55 नवीन
मुनीवर्यांशी सहमत व्हायला आवडेल. पण पाहू. रडवलं तरी हरकत नाही. बाकी कसेही असो, पिडां लिहिताहेत हा मोठ्या आनंदाचा भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

केवळ पिडांची कथा आहे म्हणून

बिपिन कार्यकर्ते
Wed, 04/06/2011 - 12:05 नवीन
केवळ पिडांची कथा आहे म्हणून पुढे वाचायचं धाडस करणारे. त्रास होईल बहुधा.
  • Log in or register to post comments

च्यायला... आता रडिवणार

धमाल मुलगा
Wed, 04/06/2011 - 12:29 नवीन
:( च्यायला... आता रडिवणार तुम्ही?
  • Log in or register to post comments

.

टारझन
Wed, 04/06/2011 - 12:33 नवीन
.
  • Log in or register to post comments

वाचतोय काकानु... पु.भा.प्र.

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/06/2011 - 12:46 नवीन
वाचतोय काकानु... पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

पुढे काय वाढुन ठेवलं असेल

गणपा
Wed, 04/06/2011 - 13:14 नवीन
पुढे काय वाढुन ठेवलं असेल याचा आताशी फारसा विचार न करता (डॉक्याला शॉट न लावता) वाचेन म्हणतो. पण काकानु वाचायला सुरवात करता करताच संपला. मनीच्या बाता : मेल्या काकाने उपास सोडलाय ते का कमी आहे?
  • Log in or register to post comments

-)

टारझन
Wed, 04/06/2011 - 13:21 नवीन
हा गणप्या काका ला मेल्या बोलला .. मी आत्ता पाहिलं .. करड्या आवाजात बोलला .. !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

काका वाचतोय...

निखिल देशपांडे
Wed, 04/06/2011 - 13:29 नवीन
काका वाचतोय...
  • Log in or register to post comments

पुढचं लिखाण वाचायची घाई झालेली आहे.

महेश काळे
Wed, 04/06/2011 - 13:46 नवीन
लवकर येऊ द्या !! आतुरतेने वाट पाहतोय म्हटलं..........................
  • Log in or register to post comments

:-)

दिपक
Wed, 04/06/2011 - 14:26 नवीन
पिंडाकाका स्ट्राईक्स बॅक.. लवकर येऊद्या वाचतोय..
  • Log in or register to post comments

अरे बापरे

चित्रा
Wed, 04/06/2011 - 18:08 नवीन
वाईट वाटते आहे, पुढे काय वाचावे लागणार म्हणून. (पण पिडा लिहायला लागले याचा आनंदही झाला).
  • Log in or register to post comments

पुढचा भाग लवकर येऊ दे

शित्रेउमेश
Wed, 04/06/2011 - 18:10 नवीन
पुढचा भाग लवकर येऊ दे काका... सुरुवातच भन्नाट झालीये..... शेवट गोड असेल अपेक्षा करतो..... ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  • Log in or register to post comments

रावसाहेबांच्या भाषेत...

नाटक्या
Wed, 04/06/2011 - 19:16 नवीन
सांगायचं झालं तर ते पोर मारून बिरून नका टाकू हा.. लहान पोर मारून आडयन्सला रडवून पैसा (प्रतिक्रिया) मिळवायचं ते पापं बघा.. थू!! ( त्यापेक्षा अस्सं कर ते जेनिफर नाय तर ते ग्रेग असतयं का नाही ते म्हातारंच असणार ते, मारा की तेला, काय पब्लीक रडंल तेव्हढं रडू देत ) आणि हो ते सारखे क्रमशः नको हो काका, लवकर एकादाच काय ती पुर्ण करून टंका.
  • Log in or register to post comments

रावसाएब अमर रहें

क्राईममास्तर गोगो
Wed, 04/06/2011 - 21:33 नवीन
आमचं तोंड पण अगदी गटारच की... ;-) पण खरंच पहिला भाग म्हणून छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

पिडा इज ब्यॅक!! काका...

प्राजु
Wed, 04/06/2011 - 19:28 नवीन
पिडा इज ब्यॅक!! काका... मस्त!! सॉल्लिड आनंद झालाय ..तुम्हाला पुन्हा लिहिताना पाहून. :)
  • Log in or register to post comments

अतिशय संवेदनशील विषय आहे, आणि

५० फक्त
Wed, 04/06/2011 - 19:37 नवीन
अतिशय संवेदनशील विषय आहे, आणि तुमच्या लेखणीतुन तेवढ्याच सहजतेनं उतरतो आहे. पुढचं वाचणं होईल का नाही ते माहित नाही, पण जमलं तर वाचेन. तुम्ही लिहित रहा, आम्ही वाचत राहु.
  • Log in or register to post comments

लवकर येउंदेत...

विकास
Wed, 04/06/2011 - 20:09 नवीन
पुढचा भाग लवकर येउंदेत...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा