कसे ते बहकलेले दिवस
अन् कश्या त्या मंतरलेल्या रात्री
मोहर तुझ्या अवघ्या देहास
अन् सुगंधी दरवळ माझ्या गात्री
एवढे एवढे होत उरले होते
जग फक्त आपल्या दोघांचे
क्षणाक्षणांवर उमटले होते
सुंदर ठसे आपल्या मिलनाचे
सहवासी सुखाचा सोहळा
निळ्या नभीचा निळा चांदवा
अद्भुत अनुभव आगळा
तुझ्या मिठीचा नवा गोडवा
कंपित ओठांची धुंद सय
थरथरते स्पर्श मोरपिशी
गंधित श्वासांची संथ लय
झरझरते हर्ष हृदयाशी
झुगारून दे काळाची बंधने
फिरून जागवं ते क्षणन् क्षण
उभारून दे स्मरणांची स्पंदने
भारुनी अस्वस्थतेचे कणन् कण
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०८/०४/२०११)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3344
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त! छान जमलीये कविता! एवढे
आयला..
In reply to मस्त! छान जमलीये कविता! एवढे by नगरीनिरंजन
छानच. मस्त रचना. ननिं ना
कविता आवडली
मस्तच!
शॉलिट्ट... शॄंगार रसाने
मस्त कविता !!
कंपित ओठांची धुंद सय थरथरते
अप्रतिम काव्य ... सहवासी
आहा..
मस्त
मस्त!
छानंच !
धन्यु...
छानच!
वा !!
नाही
In reply to वा !! by रामदास
छान छान !