Skip to main content

बहकलेले दिवस

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 08/04/2011 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
कसे ते बहकलेले दिवस अन् कश्या त्या मंतरलेल्या रात्री मोहर तुझ्या अवघ्या देहास अन् सुगंधी दरवळ माझ्या गात्री एवढे एवढे होत उरले होते जग फक्त आपल्या दोघांचे क्षणाक्षणांवर उमटले होते सुंदर ठसे आपल्या मिलनाचे सहवासी सुखाचा सोहळा निळ्या नभीचा निळा चांदवा अद्भुत अनुभव आगळा तुझ्या मिठीचा नवा गोडवा कंपित ओठांची धुंद सय थरथरते स्पर्श मोरपिशी गंधित श्वासांची संथ लय झरझरते हर्ष हृदयाशी झुगारून दे काळाची बंधने फिरून जागवं ते क्षणन् क्षण उभारून दे स्मरणांची स्पंदने भारुनी अस्वस्थतेचे कणन् कण |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०८/०४/२०११)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3356
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

मस्त! छान जमलीये कविता! एवढे एवढे होत उरले होते जग फक्त आपल्या दोघांचे क्षणाक्षणांवर उमटले होते सुंदर ठसे आपल्या मिलनाचे हे तर अप्रतिम! फक्त एक प्रश्न आहे. 'मोहोर तुझ्या अवघ्या देहास' की 'मोहर तुझ्या अवघ्या देहास'?

>>मोहर तुझ्या अवघ्या देहास अन् सुगंधी दरवळ माझ्या गात्री हे खासच!

कंपित ओठांची धुंद सय थरथरते स्पर्श मोरपिशी गंधित श्वासांची संथ लय झरझरते हर्ष हृदयाशी सुरेख !!

अप्रतिम काव्य ... सहवासी सुखाचा सोहळा निळ्या नभीचा निळा चांदवा अद्भुत अनुभव आगळा तुझ्या मिठीचा नवा गोडवा विशेष आवडले

कशी राहिली ही ' शृंगाररसपूर्ण कविता' वाचायची? बाकी 'मिका' हे नाव शोभतंय हा....

छान आहे कविता. थोडा स्वानुभव मिसळून प्यालो आणि आणखी बरं वाटलं . फिरून जागाव ते क्षणन् क्षण हे जगावं असं असेल पण जागावं ला ही काही हरकत नाही .