Skip to main content

गणपा आणि नाटक्या

लेखक नाटक्या यांनी गुरुवार, 07/04/2011 04:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, बरेच दिवसांपासून गणपाच्या हातच्या अफलातून पाककृती खाताना हा विचार करत होतो की याच्या बरोबर कोणते कॉकटेल चांगले लागेल. घरी थोडेफार प्रयोग केल्यानंतर असे वाटू लागले की आपण गणपाशेटलाच विचारावे का अश्या जॉईंट-व्हेंचर बद्दल? आणि गणपाशेठनी झटकन परवानगी दिली. थोडक्यात म्हणजे मी गणपाशेटच्या जोरावर माझी पब्लीसीटी करतो आहे म्हणाना. असो नमनाला घडाभर तेल पुरे. तर एकंदर योजना अशी की गणपा एक पाकृ आणि मी त्या बरोबर जमेल असे एक कॉकटेल असा विकांताचा मेन्यू म्हणन द्यायचा. तर मंडळी जर ही कल्पना आवडली असेल तर प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही. तेव्हा लवकरात लवकर कळवा... गणपा आणि नाटक्या

वाचने 7515
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

अरे वा "टिम पार्टी" ची कल्पना मस्त आहे !!

In reply to by आनंदयात्री

टीम पार्टी! :-) गुड वन आंद्या!

नेकी और पुछ पुछ.... नाटक्या आणी गणपा म्हणजे जीवघेणे काँबिनेशन. आहा हा हा.... काय ती नजाकतीने सांगतलेली कॉकटेलची कृती आणी गणपाची कलाकुसरीने बनवलेली पाकृ ... स्वर्ग असेल तर तो ह्याच धाग्यावर असेल.. वाट बघतो आहे...

बरेच दिवसांपासून गणपाच्या हातच्या अफलातून पाककृती खाताना हा विचार करत होतो
आँ? नाटक्याशेटनी देश बदललान् काय की? असो, तुमची आयड्या वाचून कॉस्टकोमधून इनोचा सुपर लार्ज फॅमिली प्याक आणल्या गेला आहे :)

क्या बात है! फर्मास जुगलबंदी होणार तर.

नाही, नको. ;) च्यायला, या दोघांना इनोनं कंत्राट दिलंय का? करा काय करायचं ते... सालं तुम्ही ऐकणार थोडंच आहे मी नाही म्हटलं म्हणून.

ह्या युतीची वाट पाहत आहे, लवकर सुरू करा "खान पान".. :) स्वाती

नेकी और पूछ पूछ? येऊद्यात. तुमच्यासारख्या लोकांनी ताजमहालांचे आराखडे आणि फोटू पाठवले की आम्हीदेखील आमच्या परीने काहीतरी बांधून काढू. (अवांतर - गेल्या एकदोन आठवड्यात अनेक जुने जुने लोक आणि अनेक नवीन लोक चांगलं लिहायला लागले आहेत. अवलियांनी जाहीर सत्कार करण्याचा हा परिणाम म्हणावा का?)

हा मद्यमांसाहारा .. आपलं दुग्धशर्करा योग आला तर जिथे असेल तिथे पोहोचेन हो नाटक्याशेट :) बाकी कट्टा असो वा गप्पा.. नाटक्या शेटचा उत्साह आणि एनर्जी वाखणण्याजोगी असते याचे आम्ही साक्षीदार आहोत.. :) होऊन जाउ द्या एक जोरदार कट्टा.. आमचा या खानपान लोकपाल बिलाला पुर्ण पाठिंबा आहे.. :)

गणपाच्या पाकृ आणी जोडीला तुझी पेयं. व्वा! तुझी कॉकटेलं चवीने ढोसलेली आहेतच, आता ह्या संयुक्त प्रकल्पामुळे इतरांनाही त्याचा लुत्फ घेता येईल. आणि पाकृ तूदेखील टाकाव्यास. तुझ्या हातचे अनेक चविष्ट पदार्थ खाल्लेले आठवतात.

असल्या जोड-मेजवानीसाठी दुरूदुरून येणार्‍यांची रेलचेल होणार. विमानकंपन्यांना भाडी वाढवता येणार. त्यांचा अवाच्यासवा फायदा होणार. विमानकंपन्यांचे समभाग आताच विकत घ्यावे म्हणतो.