गणपा आणि नाटक्या
नमस्कार मंडळी,
बरेच दिवसांपासून गणपाच्या हातच्या अफलातून पाककृती खाताना हा विचार करत होतो की याच्या बरोबर कोणते कॉकटेल चांगले लागेल. घरी थोडेफार प्रयोग केल्यानंतर असे वाटू लागले की आपण गणपाशेटलाच विचारावे का अश्या जॉईंट-व्हेंचर बद्दल? आणि गणपाशेठनी झटकन परवानगी दिली. थोडक्यात म्हणजे मी गणपाशेटच्या जोरावर माझी पब्लीसीटी करतो आहे म्हणाना. असो नमनाला घडाभर तेल पुरे.
तर एकंदर योजना अशी की गणपा एक पाकृ आणि मी त्या बरोबर जमेल असे एक कॉकटेल असा विकांताचा मेन्यू म्हणन द्यायचा. तर मंडळी जर ही कल्पना आवडली असेल तर प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही. तेव्हा लवकरात लवकर कळवा...
गणपा आणि नाटक्या
वाचने
7506
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
अरे वा "टिम पार्टी" ची कल्पना मस्त आहे !!
In reply to टिम पार्टी by आनंदयात्री
टीम पार्टी! :-)
गुड वन आंद्या!
नेकी और पुछ पुछ.... नाटक्या आणी गणपा म्हणजे जीवघेणे काँबिनेशन.
आहा हा हा.... काय ती नजाकतीने सांगतलेली कॉकटेलची कृती आणी गणपाची कलाकुसरीने बनवलेली पाकृ ... स्वर्ग असेल तर तो ह्याच धाग्यावर असेल..
वाट बघतो आहे...
In reply to नेकी और पुछ पुछ.... by शेखर
गणपा भौ नजीकच्या भवीष्यकाळात भारतभूमीवर अवतरणार आहेत का? :(
(अनुभवी) चिंतामणी.
छानंच!!! खाणे अन पिणे याची आम्हाला भारी आवड आहे.
बरेच दिवसांपासून गणपाच्या हातच्या अफलातून पाककृती खाताना हा विचार करत होतोआँ? नाटक्याशेटनी देश बदललान् काय की? असो, तुमची आयड्या वाचून कॉस्टकोमधून इनोचा सुपर लार्ज फॅमिली प्याक आणल्या गेला आहे :)
वाह वाह ...जल्दी आंदो ..
नेकी और पुछ पुछ!
हो जाने दो!!
वा वा! ही खरी प्यार्टी!!
क्या बात है! फर्मास जुगलबंदी होणार तर.
ओहो!!
खाणे आणि पिणे ? ?
नाही, नको. ;)
च्यायला, या दोघांना इनोनं कंत्राट दिलंय का?
करा काय करायचं ते... सालं तुम्ही ऐकणार थोडंच आहे मी नाही म्हटलं म्हणून.
युतीचं राजकारण.;)
नेकी और पुछ पुछ ?
होउन जाउ दे ....
असंच काहीतरी म्हणतात ना?
ह्या युतीची वाट पाहत आहे, लवकर सुरू करा "खान पान".. :)
स्वाती
हे कॉकटेल लै भारी लागणार! ;)
-रंगटेल
क.ल.प.ड !!!!!
नेकी और पूछ पूछ? येऊद्यात. तुमच्यासारख्या लोकांनी ताजमहालांचे आराखडे आणि फोटू पाठवले की आम्हीदेखील आमच्या परीने काहीतरी बांधून काढू.
(अवांतर - गेल्या एकदोन आठवड्यात अनेक जुने जुने लोक आणि अनेक नवीन लोक चांगलं लिहायला लागले आहेत. अवलियांनी जाहीर सत्कार करण्याचा हा परिणाम म्हणावा का?)
"अर्थ म्हणतो दारु दारु, पोट म्हणते चिकन चिकन" :)
अशी गत होणारे आता. :)
पाहतो आता वाट अन् काय.
झकास टीम,
पाकृच्या प्रतिक्षेत
येउ द्या, पण माझ्या सारख्या दारु न पिणा-या आणि फक्त व्हेज खाणा-यासाठी पण काही येउद्या.
शिवशक्ती - भिमशक्ती एकत्र ? :)
- रिनशक्ती
In reply to शिवशक्ती - भिमशक्ती एकत्र ? by टारझन
भिमशक्ती म्हणजे टारुभाऊ हे माहिती होतं.. पण शिवशक्ती म्हणजे कोण?
ह.घ्या. हो टारूभाऊ
हा मद्यमांसाहारा .. आपलं दुग्धशर्करा योग आला तर जिथे असेल तिथे पोहोचेन हो नाटक्याशेट :)
बाकी कट्टा असो वा गप्पा.. नाटक्या शेटचा उत्साह आणि एनर्जी वाखणण्याजोगी असते याचे आम्ही साक्षीदार आहोत.. :)
होऊन जाउ द्या एक जोरदार कट्टा.. आमचा या खानपान लोकपाल बिलाला पुर्ण पाठिंबा आहे.. :)
In reply to हा मद्यमांसाहारा .. आपलं by मराठमोळा
वाटच बघतो आहोत. मागल्या वेळे सारखा एक जोरदार कट्टा नक्कीच करू. तसाही इथे कट्टा करून बरेच दिवस झालेत.
गणपाच्या पाकृ आणी जोडीला तुझी पेयं. व्वा!
तुझी कॉकटेलं चवीने ढोसलेली आहेतच, आता ह्या संयुक्त प्रकल्पामुळे इतरांनाही त्याचा लुत्फ घेता येईल. आणि पाकृ तूदेखील टाकाव्यास. तुझ्या हातचे अनेक चविष्ट पदार्थ खाल्लेले आठवतात.
असल्या जोड-मेजवानीसाठी दुरूदुरून येणार्यांची रेलचेल होणार. विमानकंपन्यांना भाडी वाढवता येणार. त्यांचा अवाच्यासवा फायदा होणार. विमानकंपन्यांचे समभाग आताच विकत घ्यावे म्हणतो.
अरे वा! होऊन जाउदे! लवकर सुरू करा!
टिम पार्टी