✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

धंदा -भाग एक

र
रामदास यांनी
Tue, 04/05/2011 - 13:23  ·  लेख
लेख
आपली भाकरी आणि आपलं मरण जिथं कुठे लिहीलं असेल तिथं माणसाला जावं लागतं . परळ स्टेशनच्या आवारात धंदा होता तेव्हाची गोष्ट . स्टेशनमास्तरपासून बापूजी प्रिंटींग प्रेस पर्यंत सगळी आपलीच माणसं होती .स्टेशनचा स्टाफ (खरा उच्चार स्टाप असा आहे )आपल्याशी दोस्तीत.त्यांना आपला फोन -चहा -नास्टा फुकट .त्यांचं पाणी -न्हाणी-संडास आपल्यासाठी फुकट.व्हिटीला जायचं झालं तर एक कोरं तिकीट घ्यायचं .संध्याकाळी परत आणून ठेवायचं .मास्तर पण पगाराला आकडा लावणार. फिगर फिट्ट नाही बसली तरी वळण झाल्यावर हमालासोबत पैसे पाठवूम द्यायचे. अ‍ॅक्सीडेन झाला की आपलीच पोरं पंचनाम्यावर सही करणार .मुडद्यासाठी मांजररपाट आपल्याकडे नेहेमी तयार असायचं .एखाद्या बॉडीत जीव दिसला की धंद्यावरूनच सगेवाल्यांना फोन करायचा नातेवाईक जीवंत माणसाला असतात आणि अ‍ॅक्सीडेनवाल्यांना सगेवाले असतात .(हे मी केयीएममध्ये शिकलो.) आपला धंदा भोईवाड्याच्या अंडर यायचा. पलीकडच्या भागला एलफिस्टन म्हणायचं. तिकडे तोडणकर कंपनीचा धंदा होता. आपलं आणि त्यांचं बरं होतं. आपले खिलाडी आपल्याकडे त्यांचे रमय्ये त्यांच्याकडे .सकाळी सहाच्या आधीच धंदा चालू व्हायचा.गाळा लिहीणारे उशीरा यायचे पण रायटर पावणेसहाला येऊन बाकड्यावर बसायचा. परेल वर्कशॉपची पब्लीक पहील्या शिफ्टला जाताना आकडा लावून जायची. धंदा फुल्ल होता. टाटा कंपाउंडची दहा बारा पोरं सकाळीच यायची. पलीकडच्या चाळीतल्या काही पोरांचा आपल्या धंद्यावर डोळा होता .त्यांचा गॉडफादर त्या वेळाचा कार्पोरेटर.अधून मधून नडी व्हायची. सिनीअर आपला असल्यामुळे प्रकरण संपायचं .अधून मधून दादरच्या पीसीला कळ लागली की तोडणकरांचा धंदा काही दिवस बंद व्हायचा .मग तिकडची जनता आपल्याकडे. कधी भोईवाडा टाईट असला तर आपली पब्लीक तिकडे.दोम्ही बंद असले तर मात्र कोपर्‍यावर पोरं उभी करूम खडेखडे बिटींग घ्यायला लागायचं. आमचा धंदा स्टेशनच्या आवारात. दुकान लायनीत -समोरची चार झोपडी पण आपलीच. वर्कशॉपची पब्लीक (खरा उच्चार पपलीक असा आहे )पाना लागला ,जोडी लागली की रात्री पिऊन लास होईपर्यंत धंद्यावरच बसायची. आख्ख्या परळला दारुचं व्यसन आहे. पब्लीक हॉस्पीटलला जाणारं- टाटात जाणारं -वाडीयात जाणारं -केईम ला जाणारं-कस्तुरबाला जाणारं -महात्मा गांधीला जाणारं. हॉस्पीटलच्या बाहेर पडलं की सरळ चारशे मिली मारणार . "स्साला असे तसे पन मरनार मग पिवून मेलो तर काय "असा विचार करत पिणारं पपलीक तराट होऊन स्टेशनजवळ पायर्‍यांना अडखळणार आणि तसंच पडून रहाणार .फायलीतले कागद -एक्सरे वार्‍यावर उडून जाणार .आमचा धंदा समोरच. आपली पोरं पाणी मारणार तरी तशीच पडून राहणार . रात्री नऊला बिटचा राउंड मारायला हवालदार आले की खिसे तपासून रिकामे करणार . अगदी धंद्यासमोर येऊन एखादा पडला तर आपल्याकडे सूर्यप्रकाश तेल होतंच. सूर्यप्रकाश तेल मालीश तेल होतं .आता कुठे मिळतं की नाही ते माहीती नाही. त्या तेलाचे दोन थेंब नाकपूडीत सोडले की नशा खल्लास. माणूस पायावर उभा राहून खळखळा मुतून थेट ट्रेनमध्ये बसणार. अशाच एका डिसेंबरची गोष्ट. रात्र लवकर व्हायची .पोरांना दारु प्यायला एक निमीत्त. क्लोजची फिगर यायच्या आसपास बहुतेक जण टाईट. धंदा लवकर सामसूम व्हायचा. पलीकडच्या चाळीची पोरं हाच मोका घेऊन राडा घालायला यायची. एक दिवस संध्याकाळी खबर आली की रात्री पोरं येणारेत म्हणून .अशा दिवशीची रात्र भयंकर पॅरॅनॉईड(हा शब्द तेव्हा माहीती नव्हता) जायची. त्या दिवशी धंद्यावरच्या पोरांना -त्यातल्य त्यात कामाच्या अशा बॉडी बिल्डरना आम्ही कोरडं ठेवलं होतं . संध्याकाळी एका जाडगेलासा माणूस आकडा लावून गेला होतां नेहेमीचा मेंबर नव्हता म्हणून लक्षात राहीला. धंद्यावर काठीवाले पण बरेच येतात. काठीवाले म्हणजे फिगर काय येणार ते माहीती असणारे -काठीवाला एखादा आला की गल्ला खल्लास करून जायचा. ते जाऊ देत.माणूस लक्षात राहीला खरा. दुपारी चारपाचशे रुपयाची बाजी करून हारून गेला होता म्हणून रायटरच्या ध्यानात पण राह्यला होता. चार पाच वेळा धंद्यावर घुटमळताना बघून पोरं आणखीनच भिरभिर झाली होती.अशी भिरभिर झाली की आपसात टेन्शन सुरु करायची.संध्याकाळी शेठ आले तेव्हा त्यांना कळलं की आज राडा आहे.त्यानी पिसीला फोन लावला.दोनदा वायरलेस येऊन गेली .तो माणूस वायलेसल्याशी काहीतरी बोलताना दिसला्. टेन्शन वाढायला सुरुवात झाली. समोर फेरीवाल्याला माणूस दाखवला .तो म्हणाला नया आदमी है सेठ.अशा वेळी शेठ रायटरला -गाळेवाल्याला मुतायला पण कोणच्या तरी सोबत पाठवायचा. मग रात्रीची फिल्डींग लावली ,भाया आणि हेमंत कोरे समोरच्या झोपडीत. बाकी पोरं अंधार करून आत. अकरा साडे अकरा पर्यंत काही नाही. मग बाटल्या आल्या.जीएम वाले -ओसीवाले-बीअरवाले.मी बीअरवाल्यात. बार वाजता झोपडीतली पोरं आत आली. टाटाकंपाउंड मध्ये विजा रहायचा. त्याच्या घरून डबा आला होता. अंड्याचे पोळे -मच्छी- थोडा सुका जवळा-भाकर्‍या. पाच मिनीटात डबा संपला. बाजूच्या भय्यीणीला आमच्या पोरांची भारी आवड,ती पण हेमंत दिसल्यावर चार टाईम फिरकून गेली. साडेबारा वाजले आणि शटरवर धाडकन कायतरी पडल्याच आवाज आला. एका मिलटात नशा खल्लास. पोरं तार्वटलेल्या डोळ्यानी उभी राह्यली. हेमंत पुढे होणार तेव्हढ्यात बाहेर कोनतरी पडल्याचा पण आवाज आला. बारक्याला स्टूलावर चढवून बघायला सांगीतलं. बारक्या पटकन खाली बसला.शेठ...तोच हाय... अपूर्ण..
  • धंदा -भाग २
  • धंदा -भाग -३

Book traversal links for धंदा -भाग एक

  • धंदा -भाग २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
29082 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

पुढे ...

छोटा डॉन
Tue, 04/05/2011 - 13:27 नवीन
पुढे काय ? पटकन येऊद्यात प्लीज ... - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

येच बोल रैलि हे! एक्दम टकाट़क

पियुशा
Tue, 04/05/2011 - 16:14 नवीन
येच बोल रैलि हे! एक्दम टकाट़क ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

एकदम

विनायक प्रभू
Tue, 04/05/2011 - 13:33 नवीन
वरिजनल
  • Log in or register to post comments

लवकर

मी_ओंकार
Tue, 04/05/2011 - 13:38 नवीन
लवकर लवकर
  • Log in or register to post comments

वा, वा

नंदन
Tue, 04/05/2011 - 13:39 नवीन
जादूगाराने पहिली करामत करायच्या आधी पोराटोरांनी अपेक्षेने सरसावून बसावं, तशी पुढच्या भागांची वाट पाहतो आहे :). लेख वाचताना आंबेडकर रोड - नरे पार्क - कामगार मैदान - आरेम्भट शाळा आणि पारशी नावांच्या गल्ल्यांचा तो परिसर डोळ्यासमोर तरळून गेला.
  • Log in or register to post comments

जादूगाराने पहिली करामत

मृत्युन्जय
Tue, 04/05/2011 - 14:15 नवीन
जादूगाराने पहिली करामत करायच्या आधी पोराटोरांनी अपेक्षेने सरसावून बसावं, तशी पुढच्या भागांची वाट पाहतो आहे +१. सालं लोक प्रतिसाद पण लै भारी देतात मिपावर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

बापरे!

पैसा
Tue, 04/05/2011 - 13:46 नवीन
हे कुठचं जग आहे? आणखी लवकर येऊ द्या!
  • Log in or register to post comments

ज ब र्‍या द स्त ! पुढिल

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/05/2011 - 13:47 नवीन
ज ब र्‍या द स्त ! पुढिल भागासाठी उत्कंठा वाढली आहे. ओपन क्लोज आणि पिवळ्या मळकट चिठ्ठ्या डोळ्यासमोर तरळुन गेल्या.
  • Log in or register to post comments

+१

असुर
Tue, 04/05/2011 - 15:48 नवीन
+१ ज ब रा ट!!! एकदम तुफान सुरुवात!! अशी पहिल्या दुसर्‍या भागातच राड्याला सुरुवात झाली की कसं गार गार वाटतं!! रामदासकाकांच्या पोतडीतून कधी हिरे-माणकं बाहेर पडतात तर कधी लंगडा-मेंढीच्या चिठ्ठ्या!! केवळ कमाल आहे!!! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पुढचा भाग कधी???

निखिल देशपांडे
Tue, 04/05/2011 - 13:52 नवीन
पुढचा भाग कधी???
  • Log in or register to post comments

पुढे

sneharani
Tue, 04/05/2011 - 13:54 नवीन
पुढे? येऊ दे लवकर!
  • Log in or register to post comments

आगे बताओ.

विनीत संखे
Tue, 04/05/2011 - 13:56 नवीन
पुढे?
  • Log in or register to post comments

जबरदस्त लिखाण काका, तुम्ही

५० फक्त
Tue, 04/05/2011 - 13:59 नवीन
जबरदस्त लिखाण काका, तुम्ही लिहित रहा, आम्ही वाचत राहु.
  • Log in or register to post comments

छान आवडले

अनुराग
Tue, 04/05/2011 - 14:15 नवीन
ज ब र्‍या द स्त ! पुढिल भागासाठी उत्कंठा वाढली आहे.
  • Log in or register to post comments

सही

चेतन
Tue, 04/05/2011 - 14:23 नवीन
सही अवांतरः ही कथातरी पूर्ण करणार का...?
  • Log in or register to post comments

आयच्या गावात पाणी ... !!!!

टारझन
Tue, 04/05/2011 - 14:23 नवीन
आयच्या गावात पाणी ... !!!! नेमकं क्रमशः !! होप पुर्ण कराल ! -
  • Log in or register to post comments

जुनी मुंबई

आप्पा
Tue, 04/05/2011 - 14:27 नवीन
गिरणगाव (लालबाग परळ) भाग डोळ्यासमोर उभे राहीले. अजुन परळ स्टेशन भागात एवढा फरक नाही पण ते गिरणी कामगार कुठे आहेत. बाकी आता जुने राड्याचे दिवस संपले आता.
  • Log in or register to post comments

बापरे

सविता००१
Tue, 04/05/2011 - 14:35 नवीन
डेन्जरस दिसतय एकूण
  • Log in or register to post comments

खल्लास ..पुढे ??

सुहास..
Tue, 04/05/2011 - 14:38 नवीन
खल्लास ..पुढे ??
  • Log in or register to post comments

आयला.. फुरे??

साबु
Tue, 04/05/2011 - 14:39 नवीन
लवकर लिवा....
  • Log in or register to post comments

आधी गोव टीम आली. मग लिखाळ

गणपा
Tue, 04/05/2011 - 15:14 नवीन
आधी गोव टीम आली. मग लिखाळ लिहिते झाले सोबत त्यांनी रंगाशेठना पण कोषातुन बाहेर काढलनीत. आणि आता रामदास काका..... सिनियर प्लेअर्स रंगात येउन खेळायला लागले हे, हे नव वर्ष चांगल जाणार याचीच नांदी आहे. :) . . . काका वाचतोय ,और भी आंदो.
  • Log in or register to post comments

हेच्च हेच्च...

धमाल मुलगा
Tue, 04/05/2011 - 16:31 नवीन
अगदी हेच्च म्हणतोय. कधी नव्हे ते म्हैन्याच्या २५-२७ तारखेला खेळायला जावं आन काच्चकन चक्री लागावी, चक्री बसली म्हणून पुन्ना आकडा लावावा तर दुसर्‍या टायमाला ज्याकपॉट बसावा असा आनंद झालेला आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आपुन कदी आकडा लावला नसल्याने

llपुण्याचे पेशवेll
Tue, 04/05/2011 - 15:16 नवीन
आपुन कदी आकडा लावला नसल्याने काय षा* कळलं नाय!
  • Log in or register to post comments

अफलातून विषय आहे.. वेगळंच

गवि
Tue, 04/05/2011 - 15:26 नवीन
अफलातून विषय आहे.. वेगळंच जग.. ग्रेटच.. वाचतोय...
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे .. पुढेल

गणेशा
Tue, 04/05/2011 - 15:37 नवीन
छान लिहिले आहे .. पुढेल भागाच्या प्रतिक्षेत ... लिहित रहा ... वाचत आहे ...
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे .. पुढेल

गणेशा
Tue, 04/05/2011 - 15:37 नवीन
छान लिहिले आहे .. पुढेल भागाच्या प्रतिक्षेत ... लिहित रहा ... वाचत आहे ...
  • Log in or register to post comments

पिव्वर माल. मस्त. वाचत आहे .

आनंद
Tue, 04/05/2011 - 15:44 नवीन
पिव्वर माल. मस्त. वाचत आहे .
  • Log in or register to post comments

वाचतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/05/2011 - 15:50 नवीन
लै भारी .....! पुभाप्र. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मेंढी .... !!!!!

पक्का इडियट
Tue, 04/05/2011 - 15:59 नवीन
मेंढी .... !!!!!
  • Log in or register to post comments

हे

श्रावण मोडक
Tue, 04/05/2011 - 16:07 नवीन
हे पूर्ण करणार आहात ना?
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलेय. आकडे लावणारे

इरसाल
Tue, 04/05/2011 - 16:21 नवीन
मस्त लिहिलेय. आकडे लावणारे कशातूनही आणि कुठूनही सारासार संबंध जोडतात सट्ट्यासाठी आकडा लावणार्यांसाठी आजू बाजूचा कोणीही काही आकडा बरळला तरी चालतो. बघा हा जरा आता........................... सकाळपासून चार वेळा जावून आलो. त्याच्या हातात टमरेल आणि ह्याच्या डोक्यात चार हा आकडा. आयला ट्रेन आज २ तास लेट झाली राव. दोन किंवा मग लहान पोराला पकडून हातातल्या कागदावर कोणतेही ३/४ आकडे लिहायला सांगायचे. कोणी जर पायाळू असेल तर त्याला जाम भाव असतो असल्या लोकांकडून. अन्दी-धुंदी शॉट बसला तर मग काय विचारु नका.
  • Log in or register to post comments

सूर्यप्रकाश तेल.....

धमाल मुलगा
Tue, 04/05/2011 - 16:34 नवीन
आत्ता उजेड पडला डोसक्यात! _/\_ ही तीच गोष्ट आहे ना मुनीवर्य? असेल तर आम्ही पीटातली जागा पकडून बसलेलोच आहोत. येऊंद्या पुढचा भाग!
  • Log in or register to post comments

एकदम वेगळ !! झिणझिण्या आल्या

स्पंदना
Tue, 04/05/2011 - 16:48 नवीन
एकदम वेगळ !! झिणझिण्या आल्या वाचताना. पुढे?
  • Log in or register to post comments

थोर! __/\__

अरुण मनोहर
Tue, 04/05/2011 - 18:18 नवीन
थोर! __/\__
  • Log in or register to post comments

लेखन आवडलं. सूर्यप्रकाश तेल

रेवती
Tue, 04/05/2011 - 19:01 नवीन
लेखन आवडलं. सूर्यप्रकाश तेल म्हणजे काय ते समजलं नाही.
  • Log in or register to post comments

नासिरुद्दीनचा सिनेमा

चतुरंग
Tue, 04/05/2011 - 19:16 नवीन
आहे म्हटलं की काम कसं होणार ह्याची चिंता करायची नाय आपलं काम फक्त सिनेमा बघण्याचं, तसं बघायला बसलोय! पुढचं रीळ लावा! (मटकाकिंग्)रंगा खत्री
  • Log in or register to post comments

आणखी एक वेगळाच अनुभव!

धनंजय
Wed, 04/06/2011 - 00:30 नवीन
आणखी एक वेगळाच अनुभव!
  • Log in or register to post comments

आता अजून काय बोलावे एकदम

निनाद मुक्काम …
Wed, 04/06/2011 - 01:52 नवीन
आता अजून काय बोलावे एकदम राडेबाज लेखन .
  • Log in or register to post comments

तुफान! लवकर लिहा. रामदास

प्राजु
Wed, 04/06/2011 - 01:52 नवीन
तुफान! लवकर लिहा. रामदास काका... ब्यॅक इन फिल्ड!!
  • Log in or register to post comments

झकास

निशदे
Wed, 04/06/2011 - 02:25 नवीन
पुढचा भाग लवकर.............जास्त वाट बघायला लावू नका.....:)
  • Log in or register to post comments

पाना-जोडी-सायकल-बंद ... झक्कास सुरुवात

सुनील
Wed, 04/06/2011 - 06:54 नवीन
पुढील भागाची वाट पाहतोय...
  • Log in or register to post comments

जल्दी लिखींग... हम वाट

मदनबाण
Wed, 04/06/2011 - 08:40 नवीन
जल्दी लिखींग... हम वाट बघिंग... ;) (छपरी) ;)
  • Log in or register to post comments

मजा आली

मुक्तसुनीत
Wed, 04/06/2011 - 08:51 नवीन
निराळ्या जगाची सफर घडली. मजा आली. चित्रण वास्तवदर्शी आहे खरं.
  • Log in or register to post comments

करा!

पिवळा डांबिस
Wed, 04/06/2011 - 11:00 नवीन
करा! करा राडा!!!! आम्ही फुकटची गिर्‍हाईकां गावलोय नाय?:) पोटात गोळा घेऊन वाट बघतोय पुढं काय व्हईल याची!!!! आमच्यासारख्या पेद्रट भटाबामणांना वगीच भिववायचां!!! स्वामी, शोभत नाय तुमाला हे!!!! :)
  • Log in or register to post comments

कडक पयल्या धारेचा

बिपिन कार्यकर्ते
Wed, 04/06/2011 - 11:56 नवीन
कडक पयल्या धारेचा माल! अवांतर: गोडबोला चचला काय?
  • Log in or register to post comments

नाही

श्रावण मोडक
Wed, 04/06/2011 - 16:28 नवीन
अवांतर: गोडबोला चचला काय?
नाही. तो 'माती' उकरत बसला आहे. "ओके"?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

का उगीच त्या बिकाला लिहायला

रेवती
Wed, 04/06/2011 - 18:22 नवीन
का उगीच त्या बिकाला लिहायला भाग पाडताय. त्यानं लिहिलं तर वाचवणारे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

आली

श्रावण मोडक
Wed, 04/06/2011 - 19:17 नवीन
आली बहिणाबाई लगेच भावाची बाजू घ्यायला. लिहू दे तर खरं त्याला आधी... आम्ही वाचू. तुम्ही नका वाचू. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

"ओके"

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 04/08/2011 - 14:52 नवीन
रामदास काका, पुढचा भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

काका

आनंदयात्री
गुरुवार, 04/07/2011 - 04:36 नवीन
काका, आधीच्या अपूर्ण कथांची हुरहुर अजुन ताजी आहे म्हणुन निषेध व्यक्त करायला या कथेतल्या या भागावर प्रतिसाद देणार नाही. साला आम्ही लोक तुमच्या कथांवर जीव लावुन बसायचे अन पुढचा भाग अनंत काळापर्यंत येतच नाही. - आंद्या कल्याण
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा