धंदा -भाग एक
लेखनप्रकार
आपली भाकरी आणि आपलं मरण जिथं कुठे लिहीलं असेल तिथं माणसाला जावं लागतं . परळ स्टेशनच्या आवारात धंदा होता तेव्हाची गोष्ट . स्टेशनमास्तरपासून बापूजी प्रिंटींग प्रेस पर्यंत सगळी आपलीच माणसं होती .स्टेशनचा स्टाफ (खरा उच्चार स्टाप असा आहे )आपल्याशी दोस्तीत.त्यांना आपला फोन -चहा -नास्टा फुकट .त्यांचं पाणी -न्हाणी-संडास आपल्यासाठी फुकट.व्हिटीला जायचं झालं तर एक कोरं तिकीट घ्यायचं .संध्याकाळी परत आणून ठेवायचं .मास्तर पण पगाराला आकडा लावणार. फिगर फिट्ट नाही बसली तरी वळण झाल्यावर हमालासोबत पैसे पाठवूम द्यायचे. अॅक्सीडेन झाला की आपलीच पोरं पंचनाम्यावर सही करणार .मुडद्यासाठी मांजररपाट आपल्याकडे नेहेमी तयार असायचं .एखाद्या बॉडीत जीव दिसला की धंद्यावरूनच सगेवाल्यांना फोन करायचा नातेवाईक जीवंत माणसाला असतात आणि अॅक्सीडेनवाल्यांना सगेवाले असतात .(हे मी केयीएममध्ये शिकलो.) आपला धंदा भोईवाड्याच्या अंडर यायचा. पलीकडच्या भागला एलफिस्टन म्हणायचं. तिकडे तोडणकर कंपनीचा धंदा होता. आपलं आणि त्यांचं बरं होतं. आपले खिलाडी आपल्याकडे त्यांचे रमय्ये त्यांच्याकडे .सकाळी सहाच्या आधीच धंदा चालू व्हायचा.गाळा लिहीणारे उशीरा यायचे पण रायटर पावणेसहाला येऊन बाकड्यावर बसायचा. परेल वर्कशॉपची पब्लीक पहील्या शिफ्टला जाताना आकडा लावून जायची. धंदा फुल्ल होता. टाटा कंपाउंडची दहा बारा पोरं सकाळीच यायची. पलीकडच्या चाळीतल्या काही पोरांचा आपल्या धंद्यावर डोळा होता .त्यांचा गॉडफादर त्या वेळाचा कार्पोरेटर.अधून मधून नडी व्हायची. सिनीअर आपला असल्यामुळे प्रकरण संपायचं .अधून मधून दादरच्या पीसीला कळ लागली की तोडणकरांचा धंदा काही दिवस बंद व्हायचा .मग तिकडची जनता आपल्याकडे. कधी भोईवाडा टाईट असला तर आपली पब्लीक तिकडे.दोम्ही बंद असले तर मात्र कोपर्यावर पोरं उभी करूम खडेखडे बिटींग घ्यायला लागायचं.
आमचा धंदा स्टेशनच्या आवारात. दुकान लायनीत -समोरची चार झोपडी पण आपलीच. वर्कशॉपची पब्लीक (खरा उच्चार पपलीक असा आहे )पाना लागला ,जोडी लागली की रात्री पिऊन लास होईपर्यंत धंद्यावरच बसायची. आख्ख्या परळला दारुचं व्यसन आहे. पब्लीक हॉस्पीटलला जाणारं- टाटात जाणारं -वाडीयात जाणारं -केईम ला जाणारं-कस्तुरबाला जाणारं -महात्मा गांधीला जाणारं. हॉस्पीटलच्या बाहेर पडलं की सरळ चारशे मिली मारणार . "स्साला असे तसे पन मरनार मग पिवून मेलो तर काय "असा विचार करत पिणारं पपलीक तराट होऊन स्टेशनजवळ पायर्यांना अडखळणार आणि तसंच पडून रहाणार .फायलीतले कागद -एक्सरे वार्यावर उडून जाणार .आमचा धंदा समोरच. आपली पोरं पाणी मारणार तरी तशीच पडून राहणार . रात्री नऊला बिटचा राउंड मारायला हवालदार आले की खिसे तपासून रिकामे करणार .
अगदी धंद्यासमोर येऊन एखादा पडला तर आपल्याकडे सूर्यप्रकाश तेल होतंच. सूर्यप्रकाश तेल मालीश तेल होतं .आता कुठे मिळतं की नाही ते माहीती नाही. त्या तेलाचे दोन थेंब नाकपूडीत सोडले की नशा खल्लास. माणूस पायावर उभा राहून खळखळा मुतून थेट ट्रेनमध्ये बसणार.
अशाच एका डिसेंबरची गोष्ट. रात्र लवकर व्हायची .पोरांना दारु प्यायला एक निमीत्त. क्लोजची फिगर यायच्या आसपास बहुतेक जण टाईट. धंदा लवकर सामसूम व्हायचा. पलीकडच्या चाळीची पोरं हाच मोका घेऊन राडा घालायला यायची. एक दिवस संध्याकाळी खबर आली की रात्री पोरं येणारेत म्हणून .अशा दिवशीची रात्र भयंकर पॅरॅनॉईड(हा शब्द तेव्हा माहीती नव्हता) जायची. त्या दिवशी धंद्यावरच्या पोरांना -त्यातल्य त्यात कामाच्या अशा बॉडी बिल्डरना आम्ही कोरडं ठेवलं होतं .
संध्याकाळी एका जाडगेलासा माणूस आकडा लावून गेला होतां नेहेमीचा मेंबर नव्हता म्हणून लक्षात राहीला. धंद्यावर काठीवाले पण बरेच येतात. काठीवाले म्हणजे फिगर काय येणार ते माहीती असणारे -काठीवाला एखादा आला की गल्ला खल्लास करून जायचा. ते जाऊ देत.माणूस लक्षात राहीला खरा. दुपारी चारपाचशे रुपयाची बाजी करून हारून गेला होता म्हणून रायटरच्या ध्यानात पण राह्यला होता. चार पाच वेळा धंद्यावर घुटमळताना बघून पोरं आणखीनच भिरभिर झाली होती.अशी भिरभिर झाली की आपसात टेन्शन सुरु करायची.संध्याकाळी शेठ आले तेव्हा त्यांना कळलं की आज राडा आहे.त्यानी पिसीला फोन लावला.दोनदा वायरलेस येऊन गेली .तो माणूस वायलेसल्याशी काहीतरी बोलताना दिसला्. टेन्शन वाढायला सुरुवात झाली. समोर फेरीवाल्याला माणूस दाखवला .तो म्हणाला नया आदमी है सेठ.अशा वेळी शेठ रायटरला -गाळेवाल्याला मुतायला पण कोणच्या तरी सोबत पाठवायचा. मग रात्रीची फिल्डींग लावली ,भाया आणि हेमंत कोरे समोरच्या झोपडीत. बाकी पोरं अंधार करून आत. अकरा साडे अकरा पर्यंत काही नाही. मग बाटल्या आल्या.जीएम वाले -ओसीवाले-बीअरवाले.मी बीअरवाल्यात. बार वाजता झोपडीतली पोरं आत आली. टाटाकंपाउंड मध्ये विजा रहायचा. त्याच्या घरून डबा आला होता. अंड्याचे पोळे -मच्छी- थोडा सुका जवळा-भाकर्या. पाच मिनीटात डबा संपला. बाजूच्या भय्यीणीला आमच्या पोरांची भारी आवड,ती पण हेमंत दिसल्यावर चार टाईम फिरकून गेली. साडेबारा वाजले आणि शटरवर धाडकन कायतरी पडल्याच आवाज आला. एका मिलटात नशा खल्लास. पोरं तार्वटलेल्या डोळ्यानी उभी राह्यली. हेमंत पुढे होणार तेव्हढ्यात बाहेर कोनतरी पडल्याचा पण आवाज आला. बारक्याला स्टूलावर चढवून बघायला सांगीतलं. बारक्या पटकन खाली बसला.शेठ...तोच हाय...
अपूर्ण..
वाचने
29109
वाचनखूण
प्रतिक्रिया
56
पुढे ...
In reply to पुढे ... by छोटा डॉन
येच बोल रैलि हे! एक्दम टकाट़क
एकदम
लवकर
वा, वा
In reply to वा, वा by नंदन
जादूगाराने पहिली करामत
बापरे!
ज ब र्या द स्त ! पुढिल
In reply to ज ब र्या द स्त ! पुढिल by परिकथेतील राजकुमार
+१
पुढचा भाग कधी???
पुढे
आगे बताओ.
जबरदस्त लिखाण काका, तुम्ही
छान आवडले
सही
आयच्या गावात पाणी ... !!!!
जुनी मुंबई
बापरे
खल्लास ..पुढे ??
आयला.. फुरे??
आधी गोव टीम आली. मग लिखाळ
In reply to आधी गोव टीम आली. मग लिखाळ by गणपा
हेच्च हेच्च...
आपुन कदी आकडा लावला नसल्याने
अफलातून विषय आहे.. वेगळंच
छान लिहिले आहे .. पुढेल
छान लिहिले आहे .. पुढेल
पिव्वर माल. मस्त. वाचत आहे .
वाचतोय.
मेंढी .... !!!!!
हे
मस्त लिहिलेय. आकडे लावणारे
सूर्यप्रकाश तेल.....
एकदम वेगळ !! झिणझिण्या आल्या
थोर! __/\__
लेखन आवडलं. सूर्यप्रकाश तेल
नासिरुद्दीनचा सिनेमा
आणखी एक वेगळाच अनुभव!
आता अजून काय बोलावे एकदम
तुफान! लवकर लिहा. रामदास
झकास
पाना-जोडी-सायकल-बंद ... झक्कास सुरुवात
जल्दी लिखींग... हम वाट
मजा आली
करा!
कडक पयल्या धारेचा
In reply to कडक पयल्या धारेचा by बिपिन कार्यकर्ते
नाही
In reply to नाही by श्रावण मोडक
का उगीच त्या बिकाला लिहायला
In reply to का उगीच त्या बिकाला लिहायला by रेवती
आली
In reply to आली by श्रावण मोडक
"ओके"
काका
जबरदस्त...
मस्तच...
लेखन आवडलं.
लेखन आवडलं.
लेखन आवडलं.
जबराट