आठवत नाही ध्येया मी कधीचे तुझ्या मागे धावतो आहे
तू पुढे कि मी माहित नाही पण सवय म्हणून जगतो आहे
न तुला थकायची सवय राहिली न मला थकायची सवड
एकमेकांभोवती फिरता फिरता होते दोघांचीही परवड
जगण्याची हि युद्ध नीती मी शिकलो आईच्या पोटात
उमगले नाही मलाच कधी शिरलो ऐहिकाच्या गोटात
मिळाले भरभरून सगळे तरीही मी अजून मागतो आहे ...
मन मारून केलेल्या सौद्यांना अन वचनांना जागतो आहे
आज उमगले खरं तर,
जगण्याच्या त्रेराशिकात मी सुखाला उपभोगाने भागतो आहे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1486
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
जगण्याच्या त्रैराशिकात मी
मस्त
मस्त
आठवत नाही ध्येया मी कधीचे
त्रैराशिक म्हणजे
In reply to आठवत नाही ध्येया मी कधीचे by गणेशा