मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्रैराशिक ....

विश्वेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आठवत नाही ध्येया मी कधीचे तुझ्या मागे धावतो आहे तू पुढे कि मी माहित नाही पण सवय म्हणून जगतो आहे न तुला थकायची सवय राहिली न मला थकायची सवड एकमेकांभोवती फिरता फिरता होते दोघांचीही परवड जगण्याची हि युद्ध नीती मी शिकलो आईच्या पोटात उमगले नाही मलाच कधी शिरलो ऐहिकाच्या गोटात मिळाले भरभरून सगळे तरीही मी अजून मागतो आहे ... मन मारून केलेल्या सौद्यांना अन वचनांना जागतो आहे आज उमगले खरं तर, जगण्याच्या त्रेराशिकात मी सुखाला उपभोगाने भागतो आहे

वाचने 1479 वाचनखूण प्रतिक्रिया 5

कच्ची कैरी 23/03/2011 - 10:36
छान आहे कविता .सर्वच कडवे आवडले :)

गणेशा 23/03/2011 - 12:50
आठवत नाही ध्येया मी कधीचे तुझ्या मागे धावतो आहे तू पुढे कि मी माहित नाही पण सवय म्हणून जगतो आहे अप्रतिम ओळी .. आवडल्या .. अवांतर : त्रैराशिक म्हणजे काय ? प्लीज सांगता का ?