Skip to main content

पांढरा किडा

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 22/03/2011 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरा किडा तुझी सांग येथे दखल कोण घेतो कशाला घशाला उगा त्रास देतो असामान्य विश्लेषकांच्या भितीने गझल घप्प कपड्यात झाकून नेतो नवे रोप लावत पुढे चालताना कुणी सांड मागून तुडवीत येतो पिके फस्त केली फळे पोखरूनी कुठूनी किडा पांढरा जन्म घेतो अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी कुणाच्याच बापास ना घाबरे तो . गंगाधर मुटे ..........................................
लेखनविषय:

वाचने 2131
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

कविता आणि त्या मागील भावना आवडली अवांतर :
कुठूनी किडा पांढरा जन्मते तो
या ऐवजी 'जन्म घेतो ' असे योग्य वाटते आहे का ? नसेल आवडले तर सोडुनी देणे

मस्त्,छान यापेक्षा दुसरे काही सुचत नाहीये ;)

मुटेजी - फारच मस्त जमलीय नवे रोप लावत पुढे चालताना कुणी सांड मागून तुडवीत येतो पिके फस्त केली फळे पोखरूनी कुठूनी किडा पांढरा जन्म घेतो मनापासून शुभेच्छा !!