पांढरा किडा
तुझी सांग येथे दखल कोण घेतो
कशाला घशाला उगा त्रास देतो
असामान्य विश्लेषकांच्या भितीने
गझल घप्प कपड्यात झाकून नेतो
नवे रोप लावत पुढे चालताना
कुणी सांड मागून तुडवीत येतो
पिके फस्त केली फळे पोखरूनी
कुठूनी किडा पांढरा जन्म घेतो
अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी
कुणाच्याच बापास ना घाबरे तो
. गंगाधर मुटे
..........................................
वाचने
2151
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आणि त्या मागील भावना
कविता आणि त्या मागील भावना आवडली
अवांतर :
या ऐवजी 'जन्म घेतो ' असे योग्य वाटते आहे का ?
नसेल आवडले तर सोडुनी देणे
बदल केलाय.
In reply to कविता आणि त्या मागील भावना by गणेशा
बदल केलाय. :)
रेहेमानी किडा ह्यावरही येऊ
रेहेमानी किडा ह्यावरही येऊ द्या
- गंगाराम कुटे
मस्त
मस्त्,छान यापेक्षा दुसरे काही सुचत नाहीये ;)
सुरेख!!
सुरेख!!
छान...
छान...
वा वा ऊस्फूर्त अन तडफदार लेखन.
.
आवडली
आवडली
मुटेजी - फारच मस्त जमलीय नवे
मुटेजी - फारच मस्त जमलीय
नवे रोप लावत पुढे चालताना
कुणी सांड मागून तुडवीत येतो
पिके फस्त केली फळे पोखरूनी
कुठूनी किडा पांढरा जन्म घेतो
मनापासून शुभेच्छा !!
+१
In reply to मुटेजी - फारच मस्त जमलीय नवे by प्रकाश१११
अस्सेच म्हणतो. :)
राघव