रोज कौतुकात दंग बायको जरी ,
( चाल: आज गोकुळात रंग खेळतो हरी - )
रोज कौतुकात दंग बायको जरी ,
लाटणे जरा जपून आज बघ करी |धृ |
तोच मित्र रोज सिगारेट ओढतो
थेट खिशातून तुझ्या नोट काढतो ,
गुंतवुनी बोलण्यात चहा उकळतो -
सावध केले मी तुला कितीदा तरी |१|
सांग मित्रमंडळास काय जाहले ?
कुणी गंडविल्याविना कुणा न सोडले !
ज्यास त्यास लुटण्याचे चंग बांधले -
एकटाच वाचशील काय तू तरी |२|
तू कधीच रंगढंग नाही उधळला !
मित्रमंडळात तरी कसा गुंगला ?
तो पहा - चंडिकेस पत्ता लागला ...
हाय, धावली धरून लाटणे करी |३|
वाचने
1541
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
प्रतिक्रिया
हा हा! छान जमलंय आणि चालीवर म्हणताही येतंय.
अवांतरः मूळ गाण्याची चाल मी नेहमी चुकवतो आणि मग "राधिके जरा जपून जा तुझ्या घरी" नंतर "रघुपति राघव राजाराम" म्हणावंसं वाटतं.
भन्नाट जमलीय.
जमलं नमलं चाल पण जमलीय मस्त झालंय.
मस्त जम्लिये
हा हा हा मस्त
अमोल केळकर
हा हा! छान जमलंय आणि चालीवर