Skip to main content

त्सुनामी

लेखक वर्षा म्हसकर-नायर यांनी मंगळवार, 15/03/2011 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा पुन्हा तू येतोस तुझा मीट्ट अंधार, गडद काळोख घेउन पुन्हा पुन्हा ते पाशवी, ऋद्र, आक्राळ -विक्राळ विद्रुप क्षण होऊन पुन्हा मी लढते, जीव तोडुन सत्याची अखंड तेवणारी ज्योत घेऊन, स्वत:तील सत्व जपत तू घोंघावत येतोस सुनामी सारखा आपल्या आक्राळ विक्राळ, विद्रुप विनाशकारी लाटेत मला संपवून टाकायला पण मी जिवाच्या आकांताने लढते स्वत:च्या आत्म्यात तेवणा-या सत्याच्या ज्योतीच्या आधाराने लढते लढते लढते त्या आक्राळ विक्राळ विनाशकारी सुनामीला पुन्हा एकदा परतवून लावते माझा मेंदु पुन्हा थोडा मरतो पण मी जिवंत रहाते मी पुन्हा त्या जिवनरुपी वेताळाला अन्गावर घेवुन पुढच्या प्रवासाला निघते
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1641
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

रुद्रावतारावर कविता ? !!!

........!!