या पाखरांस आता
आहे निघून जाणे
हे शब्द सूर सरले
ओठी न येई गाणे
छेडीत रोज तारा
येई जुळून गीत
ह्रद्यातूनी भरोनी
येई फूलून प्रीत
सार्या स्मृती सुखाच्या
दाटून आज आल्या
गेली उडून पिल्ले
डोळ्यात प्रेमधारा
रे माझिया पिलांनो
हा जीव गुंतला रे
डोळ्यात आज माझ्या
बघ प्राण साठला रे
फिरता नभांगणात
परतून येथ या रे
वेड्या जीवास माझ्या
रे एक साद द्या रे
हे वेड या मनाचे
तुंम्हास रे कळावे
अन् शब्द सूर ताल
पुन्हा जुळून यावे
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3371
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख!
वा,
सुंदर किवता !
.
In reply to सुंदर किवता ! by िमसळपाव
लावणी
In reply to सुंदर किवता ! by िमसळपाव
वाह!
सुरेख, भावपूर्ण कविता!
मस्त कविता पुष्कर.