Skip to main content

एकविसाव्या शतकातली कहाणी

लेखक कोमल यांनी बुधवार, 02/03/2011 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
एक आहे ही गोष्ट, आटपाट नगरीची यामद्धे आहेत अर्थातच, एक राजा- एक राणी ! पूर्वी सारखं नव्हे बरं,एकच राजा आणि एकच राणी, एकविसाव्या शतकांत असते, प्रत्येकाची स्वतंत्र नगरी,स्वतंत्र कहाणी! आपल्या गोष्टितल्या राजाला,राणी आवडली अगदी सहजच आणि राणीनेही संमती दिली,थोड्या हित्गुजांताच ! दोघांची मग सुरु झाली स्वतंत्र कहाणी, दोघांची नगरी, हिच्या मनाचा "तो" राजा, त्याच्या मनाची "ही" राणी, उघड्या डोळ्यानी दोघांनी,संसाराची स्वप्नं रचली, आई-बाबा वगैरे ठीक,पण बाळाची सुद्धा नावे ठरली ! प्रत्येक गोष्ट दोघांच्या मताप्रमाने,मनासारखी घडत होती, राजा-राणी आणि त्यांची दुनिया एकमेकाताच गुरफतात होती ! राजाच्या घरी दोघांच्या नात्याची कुणकुण लागली, आणि स्वप्नात सुद्धा विचार न केलेली वेळ आली ! घर की राणी? राजाच्या निर्णयाचा क्षण आला, दोन प्रेमांच्या वेड्या चक्रात राजा बिचारा अड़कुन पडला! २ वर्षांच प्रेम की २० वर्षांच नातं? जन्मभराची साथ की कर्त्तव्य महत्तावाच? नाजुक हळवे मन, की मेंदुतल्या विचारांचा पसरा? "काय निवडू?" वेडा विचारे स्वताला... ताजं कोवळ पान झाडा पासून गळाल, आणि राजा-राणीच स्वप्न ही धुळीला मिळाल ! तिच्या नाजुक हातातून, हात सोडवत नाही मग त्याने हातच कापून ठेवला, आणि मनातून तिचा विचार जात नाही म्हणून मनाचा कप्पा अलगद बंद केला! राणीला हा निर्णय सांगताना , अदृश्य रक्ताच्या चिळ्कान्द्या उडाल्या , तिला सावरताना मात्र , त्याच्या प्रेमाचाच पूर्ण कस लागला! वातावरण निवळल, दोघही सावरली ! मग दोघांनी समंजसपणे, वेगवेगळी नगरी स्वीकारली ! एकमेकांच्या आठवणीना जपत, तो बनला "त्याच्या" विश्वाचा राजा, ती बनली "तिच्या" नगरिची राणी, एकविसाव्या शतकातली, स्वतंत्र नगरी, स्वतंत्र कहाणी !!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3357
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

.

In reply to by आत्मशून्य

हा पेन्गुइन का अन कसा नाचतोय हो?? कस केल तुम्ही हे??

ही तर पुरातन काळापासूनची कहाणी झाली, यात नवीन काय? राजा-राजा किंवा राणी-राणी अशी कथा असती तर तिला एकविसाव्या शतकातली म्हणता आले असते. असो. पु ले शु

In reply to by अवलिया

तेच म्हणावयाचे होते. पण कवयित्री आयडी प्रमाणेच कोमल मनाच्या असाव्यात आणि ह्या प्रश्नामुळे हळव्या झाल्या असाव्यात. एकविसाव्या शतकात चित्र बदलल्या असुनही तेच चित्र दाखवणे काय बरं सुचवायचे असेल ? पु.क्.शु. -(हळवं मन संघटणा) टारझन

In reply to by अवलिया

राजा-राजा किंवा राणी-राणी अशी कथा असती तर तिला एकविसाव्या शतकातली म्हणता आले असते.
+ १ सहमत आहे हलकट नान्याशी. बाकी खाली आमचे परममित्र श्री. टारझन.. सध्या मुक्काम मंडई ह्यांच्याशी देखील सहमत आहे. अंमळ हळवी असणारी कविता भावुक करुन गेली. (कोणाला करुन गेली ते विचारु नये, अपमान केला जाईल.) 'लोक प्रेम वगैरे सारखे अनावश्यक चाळे का करतात?' ह्यावर श्री. अवलिया यांनी काही मार्गदर्शनपर लेखन करावे असे सुचवतो आणि माझे ४० /४२ शब्द संपवतो. बादवे हि कविता तुम्ही स्वतः लिहिली आहे का? ह्या आधी इथे वाचायला मिळाली होती.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>>'लोक प्रेम वगैरे सारखे अनावश्यक चाळे का करतात?' या ऐवजी चाळे करतांना प्रेम वगैरे अनावश्यक गोष्टी मधे का आणतात? यावर लेख लिहावा म्हणतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हि कविता माझीच आहे..ही बाब तुम्ही नजरेत आणुन दिल्याब्द्दल धन्यवाद...या व्यक्ति वर लवकरच कारवाइ होइ ल... http://krutishilta.blogspot.com/ हा माझा ब्लोग आहे...

घर की राणी? राजाच्या निर्णयाचा क्षण आला,
घर की राणी? इतका फालतु प्रष्न पडुच कसा काय शकतो एकविसाव्या शतकात ? स्वःतचे घर घेता येत नाही का राजाला ? त्याच्यात इतका सुद्धा दम नाही का ? कविता आवडली, पन सॉरी, अजिबात पटलेली नाही. दम असलेला राजा/णकु.

In reply to by नरेशकुमार

घर की राणी? याचा अर्थ आइ -वडील की प्रेम असा होतो.. राजा च्या भावनान चा व कवितेचा चुकिचा मतितार्थ लावलेला आहे..

तेरे ख्वाबो मै अब दम घुटता है कोई राह दिखा दे मुझे हमराह बनकर. ये मेरी मजबुरी ना समझ अब ये आदत बन गयी है

In reply to by गुड्डु

माझ्या मते ग.दि.मा. ,पाडगावकरां पासून संदिप सलिल पर्यंत सर्वंनी प्रेम केलय... कुणी कविते वर करत तर कुणी भटकंती वर...कुणी देहा वर करतं तर कुणी आत्म्या वर... तुम्हि पण केलच असेल की... आणि नसेल केल तर तुम्ही खुप मोठ्या आनंदाला मुकला आहात....