नेहमीसारखेच - १
नेहमीसारखेच - २
नेहमीसारखेच - ३
आजही मावळतीला ढग काळवंडले...
अगदी नेहमीसारखेच...
आजही तुझ्या स्मरणाने डोळे पाणावले...
अगदी नेहमीसारखेच...
कसे सांगावे तुला गं...
रोज पहाटेसह निघतो मी...
मला अर्ध्या वाटेवर सोडून...
पहाट, सकाळ, मध्यांन्न सगळे जातात परतुनी...
पण तरी मी चालत राहतो...
तुझ्या शोधात वणवण फिरतो...
कुठ जाऊन दडतेस गं...
अखेर मी तसाच...शरीर थकवून...घरी परततो...
बिछान्यावर अंग टाकून...शुद्ध हरपतो...
अन् मग...तू स्वप्नात येऊन विचारतेस....
कुठे असा भटकत होतास वेड्यासारखा...कधीची वाट पाहतेय...
तेही नेहमीसारखेच....अगदी नेहमीसारखेच....
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०९\०३\२०११)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2216
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
अन् मग...तू स्वप्नात येऊन
तिन्ही कविता मनाला चटका लावुन गेल्या...
धन्यु अथांग तै!! वाचत रहा...
In reply to तिन्ही कविता मनाला चटका लावुन गेल्या... by अथांग
धन्यु