श्वानमित्र...एक हास्यकविता.?????
तिच्यासाठी मी माझा ..
नेहेमीचा रस्ता बदलला..
ती काही भेटली नाही..कळाले..
तिने आपला पत्ता बदलला..
प्रेमासाठी मात्र मी..
निवडला मार्ग नेकीचा होता..
ती तिथेही भेटली नाही..
काय करणार पत्ताच जर चुकीचा होता..
तिच्या गल्लित जाणे म्हणजे..
एक मोठे दिव्य होते..
मनेका गान्धीन्च्या मित्रान्चे..
तिथे जणु अभयारण्यच होते..
तिच्यासाठी मित्रानो..
काय काय नाहि मी केले सान्गा..?
खाम्बासारखा उभा तिच्याघरासमोर..
हरेक कुत्रे गेलेय वर करून दोन्ही टान्गा..
तिच्यासाठी तिच्याघराबाहेर
रोज मी असा लागलो ताटकळु
माझ्या दु:खाचा गहिवराने
गल्लीतली कुत्री रोज लागली व्हिव्ह्ळू
ती जालीम दुसर्याची झाली..
फुटके माझे नशीबच शेवटी..
अजुनहि तिच्या गल्लितली सारी कुत्री..
मी दिसताच हलवतात शेपटी..
तिचेही आभार मानावयास हवे..
तिनेच मला दिली ही नवी ओळख जणु..
ती न का मिळेना पण..
पुरी दुनिया मला "श्वानमित्र" लागलीय म्हणु..
- योगेश
खो: खो: खो: बाकी- >> अजुनहि
योग्या , खॅक्क करुन फुटलो ..
नवी ओळख आवडली
हा हा हा
मस्त अमोल