ऑफिसात जाताना असं होतं, कधी कधी माझा आणि बायकोचा वाद झालेला असतो, आम्ही तसेच ऑफिसला जातो, चेहरा लगेच कार्पोरेट झालेला असतो, पण आत काहीतरी बोलायचं राहिलेलं असतं, काहीतरी ऐकलेलं डोक्याच्या बाहेर निघायला तयार नसतं. टेबलवर फोन वाजत असतो, टॅण टॅ धॅन टॅ . voice call from **** टॅण टॅ धॅन टॅ ..
मी फोन उचलत नाही तर सायलेंट करुन ठेवतो, पुन्हा ४-५ मिनिटांनी फोन टॅण टॅ धॅन टॅ . voice call f******* टॅण टॅ धॅन टॅ , आता चिडणारा दुसरा कोणितरी असतो पण डायलॉग तोच -'अरे उचल ना फोन ' . मी तरी ही फोन उचलत नाही.
कधी कधी सगळं नेहमीसारखं असतं, म्हणजे बायकोशी वाद वगैरे काही नाही, तरी पण काम जास्त असतं, बॉस सकाळी सकाळी चिडलेला असतो, मग तरी पण मी फोन उचलत नाही.
पण घरी , माझा फोन कुठं तरी ठेवलेला असतो आणि तो वाजतो, आणि तो जर लगेच उचलला नाही गेला तर त्या फोनच्या रिंगटोन मध्ये एक आवाज वाढतो, बायकोचा ' अरे उचल ना फोन ' आणि मी लगेच फोन उचलतो. एकदा माझ्या एका ऑफिसताल्या मित्रानं घरी जेवायला आला असताना हे टिपलं, आणि दुस-या दिवशी लंच झाल्यावर टोचलं, ' का रे बायको म्हणाली की लगेच उचलतो फोन, आणि इथं च्यायला आमचं डोकं उठस्तोवर वाजतो, त्याला हात लावत नाही.
दुसरा मित्र तारे तोडतो ' अरे उगा तो फोन दुस-या कुणाचं तरी नाव घ्यायचा म्हणुन का हां ? मी उत्तर द्यायचं टाळतो आणि नेहमीप्रमाणे माझं मन भुतकाळात जातं,
काळ - डिसेंबर २००७ , स्थळ - जहांगिर हॉस्पिटल, पुणे वेळ - दुपारी ३- ४ च्या दरम्यान.
त्यावेळच्या ऑफिसतर्फे मिळणा-या फुकट वैद्यकीय सवलतींच्या लाभासाठी आम्ही तिथं, जहांगिर मध्ये. ओपिडिच्या जवळच थांबलो आहे, नंबर यायची वाट बघत. तेवढ्यात एक अॅम्ब्युलन्स येते, टँ टु टँ टु करत, दरवाज्याजवळची गर्दी बाजुला होते, त्यात आम्ही पण. दवाखान्यात आधीच माहीती कळाली असणार आहे, त्यामुळं तयारी आहेच. अर्ध्या मिनिटात ऑक्सिजन, सलाईन, अजुन काय काय बाहेर येतं, मागचा दरवाजा उघडतो रुग्णवाहिकेचा, अन स्ट्रेचर वर पहिल्यांदा चकचकीत पॉलिश केलेले बुट दिसतात अगदि स्वच्छ पांढ-या शुभ्र मोज्यांसहित , मग झक्कपैकी काळी कुळकुळित पँट. नंतर मात्र थोडीशी हिरवी चादर.
स्ट्रेचर पुर्ण बाहेर येतं, वय वर्षे ३०-३२, छान मिश्या छोट्याश्या, दाढी केलेली, आताच्या वॉर्डबॉयच्या हालचालीमुळं दिसणारा चमकदार सिल्कचा टाय. कुठंही रक्त नाही, कसला डाग नाही. तोंडाला मास्क लावलेला ऑक्सिजनचा. स्ट्रेचर पुढं गेलं की अजुन एक त्याच वयाचा आणि तशाच कपड्यातला तरुण उतरतो, त्याच्या हातात एक बॅग प्लॅस्टिकची. झालं पेशंट बाहेर आला अॅम्ब्युलन्सचं काम झालं ती निघुन जाते. वॉर्डबॉय व नर्सच्या नजरेतुन सरावलेली निराशा दिसत असते.
पेशंट ओपिडित नेतात, एका बेडला इर्मजन्सी साठीचे पडदे टाकले जातात, हे द्या ते द्या चालु होतं. दरवाज्यातुन दिसतंय सगळं, पण आमची चिंता वेगळी, आयला आता आपला नंबर यायला अजुन वेळ लागणार . पण नाहपण, तेवढ्यात दुस-या नर्स बाई बोलावतात. आम्ही आत जातो. त्या पडदा टाकलेल्या बेडच्या समोरच्या बेडवरच मला बसवतात , बिपि आणि काय काय चालु होतं. दोनच मिनिटं जातात. पडद्यामागुन मोबाईलची रिंग ऐकु येते, आत चार पाच जणांचे पाय दिसत आहेत पण कोणिच उचलत नाही. सिनियर नर्स चिडतात, ' अरे इमर्जन्शी में बोलाय ना सबको फोन बंद रखनेको !
दरवाज्यातुन चार माणसं आत येतात, दोन पुरुष, दोन बायका. त्यातली एक २७ - २८ ची. पंजाबी ड्रेस पण ओढणी मॅचिंग नाही,पायात स्लिपर, गळ्यात मंगळसुत्र, हातात महागातला मोबाईल कोणाला तरी लावतेय घाईघाईनं. पुन्हा पडद्याच्या आतुन रिंग येते, यावेळेला सिस्टरच्या अगोदर डॉक्टर चिडतात, ' you bloody, can't keep the phone off in emergency '
एक रडवेला आवाज येतो,' डॉक्टर पण रागावतात..... उचल ना फोन, प्लिज रे ..... उचल ना फोन.
.
.
.
.
म्हणुन मी टॅण टॅ धॅन टॅ . voice call from love टॅण टॅ धॅन टॅ वाजलं की लगेच फोन उचलतो.
वाचने
7732
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय कळला न्हाय ! डोक्यावरून
.
कळालं नाही
टॅण टॅ धॅन टॅ .. काहीच नाही
बहुधा त्या मेलेल्या मुलाचा
म्हणून...
२ - ३ वेग-वेगळे वीषय एकत्र
काहीच कळाले नाही.. डोक्यात
खरं आहे
अजुन थोडं सविस्तर
आमची वॉशिंग मशीण चोरीला
In reply to अजुन थोडं सविस्तर by वपाडाव
सॉल्लिड रे.... खतरा झालंय.
वर्णन जबरदस्त .. खास करुन
...
आत्ता कळले. लिंक लागली.
In reply to ... by ५० फक्त
आयच्चा घो! काय डेंजरफुल है
In reply to ... by ५० फक्त
ए आरे...बिडी चा आणि पाण्याचा
In reply to आयच्चा घो! काय डेंजरफुल है by धमाल मुलगा
संबंध
In reply to ए आरे...बिडी चा आणि पाण्याचा by Dhananjay Borgaonkar
च्यामारी अस होय...धन्स खुलाशा
In reply to संबंध by धमाल मुलगा
गोंधळ आणखीनच वाढला ....
नथिंग सिरियस ही त्याच्या
In reply to गोंधळ आणखीनच वाढला .... by sagarparadkar
सुन्न
गोंधळ
गोंधळुन गोंधळुन समजुन घ्यायचा
लेख कळला..एका ठिकाणीच गोंधळ
भीषण आहे ..
सोबत....!