हल्ली बाजारात सगळीकडे 'हेल्थ फूड्स ' ची धूम आहे. जिथे बघावं तिथे 'कोलेस्टेरोल फ्री' , 'फायबर रिच', 'शुगर फ्री', 'लो कॅल' इ. लेबलं लावून कितीतरी खाण्याचे पदार्थ किंवा संबंधित पदार्थ, दुकानाच्या किंवा मॉल च्या प्रत्येक शेल्फातून आपल्याला खुणावत असतात. ह्यातील बहुतांश प्रोडक्ट एका चमचमीत किंवा एरवी 'unhealthy' समजल्या जाणाऱ्या पदार्थाचा 'देवकृपेन' जणू आपल्याचसाठी बनवलेला आरोग्यपूर्ण अवतार असतो. उ. दा. फ्रायम्स, चीज बॉल, चीझी वेफर, बिस्कीट इ. पण जर हे सगळे 'हेल्थ फूड्स' खरंच एवढे हेल्थी असते, तर मग जागतिक आरोग्य संघटनेन सगळ्यांचाच आहारात अमुक अमुक टक्के ह्या फूड्स चा समावेश असलाच पाहिजे असेच फर्मान नसते का काढले? ठीक आहे. अगदी एवढ्या टोकाला पण नको जाऊया. अमेरिका आणि इतर युरोपीय देशांमध्ये अश्या लाखो 'हेल्थ फूड' कंपन्यांनी गेल्या २० वर्षात खूप प्रगती केली आहे (शेयर मार्केट मधे) पण तरी त्या देशातल्या लठ्ठ लोकांची संख्या कमी झालेली नसून वाढलीच आहे. आणि आता हेच आपल्याही देशात घडतंय. कारण, मानसशास्त्रासंबंधीच आहे. अमेरिकेतच झालेल्या एका अध्ययनाप्रमाणे, 'हेल्थी' लेबल असलेले पदार्थ, इतर पदार्थांच्या प्रमाणात जास्त खाल्ले जातात आणि म्हणून त्या हेल्थ फूड मधून मिळणाऱ्या कॅलोरीस चं प्रमाण बरंच वाढून लोकं उलट आणि लठ्ठ होतात.
एक साधं उदाहरण घेऊया. एका डायेट जागरूक व्यक्ती समोर फ्रेंच फ्राईस किंवा बटाट्याची भजी आणि बेक्ड हेल्थ snack ठेवलं तर ते हेल्थ snack घेतील? ठीक आहे. आता जर फक्त पहिले दोन विकल्प असते तर त्यांनी काय केलं असतं? जर खरंच हेल्थ कोन्शिय्स असतील तर बहुदा ५ फ्रेंच फ्राईस किंवा २-३ भजी खाल्ली असतील. पण ह्याच व्यक्तीने त्या हेल्थ snack चा अर्धा पुडा फस्त केला असता.असे का? कारण त्याला कुणीतरी कुठलंतरी हेल्थ लेबल लावलेलं होतं. ह्याचा अर्थ हा नाही कि ते तुम्हाला फसवतायेत. पण आपणच त्या हेल्थी नूडल्स च्या पाकिटावर 'makes two servings' हे छापलेलं न वाचता ते माणशी एक पाकीट असं खातो. आणि अश्या वेळी तो 'हेल्थी' लेबल असलेला पदार्थ आपल्या आरोग्याला हानिकारक ठरतो.
वाचने
5309
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म्म्म्म्म्म
चांगला विषय
थोडे अजुन सविस्तर हवे होते.
कुठलाही पदार्थ प्रमाणाच्या
अरे बापरे !
चांगला लेख. एकंदरीतच पदार्थ
होय, असतात.........
बाकी आपण म्हणता त्या मुद्यात
लेबल वाचायला शिका....मुख्य
अमेरिका आणि इतर युरोपीय देशांमधील लठ्ठपणा
-१००
In reply to अमेरिका आणि इतर युरोपीय देशांमधील लठ्ठपणा by नेत्रेश
मॅकडोनाल्ड डॉलर मेन्यु
In reply to -१०० by विश्वनाथ मेहेंदळे
>>अमेरीकेल मॅकडोनल्ड मध्ये
In reply to मॅकडोनाल्ड डॉलर मेन्यु by नेत्रेश
असहमत!
In reply to अमेरिका आणि इतर युरोपीय देशांमधील लठ्ठपणा by नेत्रेश
काहीसा सहमत
In reply to असहमत! by स्वाती२
तुमचं
In reply to काहीसा सहमत by नेत्रेश
लेख अजून सविस्तर हवा. अन
या ठिकाणी मी "५० फक्त"
तुमच्या एवढ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
रच्याकने.
शिवाय
In reply to रच्याकने. by आनंदी गोपाळ