दाबेली काका
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आज मी माझा एक अनुभव सांगणार आहे. ज्यामुळे मी माझी कोणालाही नावे ठेवण्याची सवय सोडली नाही पण खुप कमी केली.
तर गोष्ट ८ वर्ष जुनी आहे.मी आणि माझी बहीण रोज संध्याकाळी फीरायला जायचो येताना ८.३०,८.४५ वाजता एक दाबेली च्या गाडीवर एक जुजबी ओळख असलेले काका दिसायचे. ३-३,४-४ दाबेल्या आपले खात असयचे. आता बघा ७५-८० वय असलेला माणुस असा जंक फूड खाताना बघुन काय विचार येणार? त्यात त्याच्या स्वभावामुळे त्यांचा थोडा रागच यायचा.काय पण म्हातारपणात जीभेला चट आहे.असा संवाद तर रोजच आमच्यात होत असे.
असेच दिवस गेले आणि रोज दाबेली काका दिसतच होते.एका दिवशी एक प्रेतयात्रा जाताना दिसली,चेहेरा बघतो तर दाबेली काका.
बरेच दिवस गेले आणि ही गोष्ट विस्मरणात गेली. नंतर असेच कधितरी बोलता बोलता माहित पडले कि त्यांची सुन त्यांना जेवणच देत नव्हती आणि एकुलता एक लाडका मुलगा पुरेसे पैसे पण देत नव्ह्ता म्हणून काका असे दाबली खाउन पोट भरत होते. आणि त्यामुळेच त्रास होउन रक्तदाब
वाढून ह्रुदय विकाराचा झटका येउन त्यांचा मृत्यू झाला होता.
तेव्हा खुप वाइट वाट्ले होते. तेव्हापासून खरी परिस्थिती जाणुन न घेता नावे ठेवणे कोट्या करणे याला आळा बसला.
प्रतिक्रिया
वाईट वाटले
+१
यालाच म्हणतात you shall not
म्हणजे?
१. दाबेली काकांची सुटका झाली
गुड्या लेका लोकांना विनाकारन नावे ठेवायची सवय तुझी अजुन काही
लेख वाचुन दाबेलीचा धसका घेतला
धसका
शब्दाशब्दाला सहमती.... मास्तर
आता कोणालाही कधी दाबेली खायला घालायची नाही
'दाबेली' हे वाचुन एक अश्लील
?
बहुतेक ॠषिकेश चिंदरकर हाच एक
बहुतेक हो, पण तरीही...
मंडळी प्रतिसाबद्दल
माझी उंची ५ फुटा पेक्शा जास्त