Skip to main content

दाबेली काका

दाबेली काका

Published on 05/03/2011 - 14:29 प्रकाशित मुखपृष्ठ
आज मी माझा एक अनुभव सांगणार आहे. ज्यामुळे मी माझी कोणालाही नावे ठेवण्याची सवय सोडली नाही पण खुप कमी केली. तर गोष्ट ८ वर्ष जुनी आहे.मी आणि माझी बहीण रोज संध्याकाळी फीरायला जायचो येताना ८.३०,८.४५ वाजता एक दाबेली च्या गाडीवर एक जुजबी ओळख असलेले काका दिसायचे. ३-३,४-४ दाबेल्या आपले खात असयचे. आता बघा ७५-८० वय असलेला माणुस असा जंक फूड खाताना बघुन काय विचार येणार? त्यात त्याच्या स्वभावामुळे त्यांचा थोडा रागच यायचा.काय पण म्हातारपणात जीभेला चट आहे.असा संवाद तर रोजच आमच्यात होत असे. असेच दिवस गेले आणि रोज दाबेली काका दिसतच होते.एका दिवशी एक प्रेतयात्रा जाताना दिसली,चेहेरा बघतो तर दाबेली काका. बरेच दिवस गेले आणि ही गोष्ट विस्मरणात गेली. नंतर असेच कधितरी बोलता बोलता माहित पडले कि त्यांची सुन त्यांना जेवणच देत नव्हती आणि एकुलता एक लाडका मुलगा पुरेसे पैसे पण देत नव्ह्ता म्हणून काका असे दाबली खाउन पोट भरत होते. आणि त्यामुळेच त्रास होउन रक्तदाब वाढून ह्रुदय विकाराचा झटका येउन त्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हा खुप वाइट वाट्ले होते. तेव्हापासून खरी परिस्थिती जाणुन न घेता नावे ठेवणे कोट्या करणे याला आळा बसला.
लेखनप्रकार

याद्या 3032
प्रतिक्रिया 16

दाबेली काकांची सून त्यांना जेवण देत नव्हती हे वाचुन वाईट वाटले.पण काय हो गुड्डु तुम्हाला त्या प्रेताचा चेहरा कसा बर दिसला ? आणि तुमच्या नाव ठेवण्याच्या सवयीला आळा बसला हे तर फारच उत्तम झाले :)

यालाच म्हणतात you shall not take first impression as last impression, किंवा आजकालच्या भाषेत ' दिखावेपे मत जाओ अपनी अकल लगाओ' असो, एकुलत्या एक लाडक्या मुलांची ही प्रव्रुत्ती होण्यामागे त्यांचे लाडके आई बाबाच कारणिभुत असतात ना ? लग्नानंतर बायको नवरारुपी मडक्यावर फक्त नविन रंगच लावु शकते, पण त्या मडक्याला आकार देउन भाजलेलं तर आईबापानिच असतं ना ? त्यामुळे नैसर्गिक वागणं जास्त संयुक्तिक असं वाट्तं, म्हणजे वाघीण कशी आपली पिल्लं मोठी झाली, शिकार करायला शिकली की त्यांना सोडुन देते, मग ते आणि त्यांचं आयुष्य, जगले जगतील नाहीतर मरतील, फुकटची भावनिक गुंतवणुक नाही. तसंच पिल्लं पण आपल्या आईसाठि शिकार करत नाहीत.

In reply to by ५० फक्त

तुम्हांला नक्की काय म्हणायचे आहे हे नाही समजले. :( दाबेली काकांच्या मुलाने त्यांच्यात भावनिक गुंतवणूक केलेली नाही (की ज्यामुळे त्यांना दाबेली खाउन पोट भरावे लागते) ही गोष्ट नैसर्गिक आहे का? आणि वर त्यांच्या मुलाचा असा अ‍ॅटीट्यूड : मग ते आणि त्यांचं आयुष्य, जगले जगतील नाहीतर मरतील. ?????????? -सूर्यपुत्र.

१. दाबेली काकांची सुटका झाली की जाचातुन ! २. कच्ची दाबेलीची आठवण झाली , आणि लै बोर झाले :) ३. दाबेली काकांना दाबेली खातात म्हणुन ( आणि ओरिगिनल नाव माहित नसल्याने) एक संबंधीत पेटणेम दिले होते , तेंव्हा त्याचं वाईट वाटायचं कारण समजलं नाही .. ४. पु.ले. शु. - बुड्ढु

गेली नाही. ती सुन आणि मुलगा त्या म्हातार्‍याशी वाईट वागत होते हे देखिल तुला एकुनच कळाले ना?का तु त्याचा अनुभव घेतला होतास? तसेच खाताना दुसर्‍याच्या ताटात व हाताकडे बघु नये ते देखिल वाईट असते. आता मी जर म्हटले कि दाबेलीवर तुझे मन गेल्यामुळे काका गचकले तर? तर आता खाणार्‍या कडे ओबामा सारखे लक्ष देवु नकोस.

In reply to by अविनाशकुलकर्णी

सहमत... मीही पूर्वी एकावेळी तीन दाबेली खायचो ( घरचे व्यवस्थित जेवायला घालत असूनही).... त्याची आठवण झाली आणि ड्वॉळे पानावले

In reply to by इंटरनेटस्नेही

'दाबेली' हे वाचुन एक अश्लील ज्योक आठवला.
समजले नाही.
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।। जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।
हा अश्लील जोक आहे?
ॠषिकेश चिंदरकर
की हा?

मंडळी प्रतिसाबद्दल धन्यवाद. मला एवढंच म्हणायच होतं कि दाबेली खाण्यामागचा हेतु चैन हा नसुन मजबुरी होती. हे न समजल्यामुळे आम्ही रोज त्यांना नावे ठेवत होतो याचे वाइट वाटले. आणि प्रेतयात्रेत चेहेरा बरेचदा उघडाच असतो,आणि माझी उंची ५ फुटा पेक्शा जास्त असल्यामुळे मला तो दिसला. आणि मला दुसर्र्याच्या ताटात बघायचि सवय अजिबात नाही........

In reply to by गुड्डु

माझी उंची ५ फुटा पेक्शा जास्त असल्यामुळे जाहिरात करणे टाळा. मला दुसर्र्याच्या ताटात बघायचि सवय अजिबात नाही बघुच नये मुळी... -खड्डु...