✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रसिद्धी

व
वपाडाव यांनी
Wed, 03/02/2011 - 17:12  ·  लेख
लेख
प्रसिद्धी मिळालेली पण वंगळी/वक्टी /आचरट/बिभत्स/छिछोर गाणी मुद्दामच लेखाचं नाव अर्धवट ठेवलं. नाहीतर वरूनच कळुन जायचं कि आत काय लिहिले आहे. काही दिसांपुर्वी मुलुखावेगळी यांचा सुप्रसिद्धी न मिळालेली पण चांगली गाणी हा लेख वाचला आणि तेव्हाच हे लिहायची इच्छा झाली. पण वेळ न मिळाल्यामुळे आणि या गाण्यांनी विचार करायला (पक्षी: आठवण्यासाठी) खूप वेळ घेतला म्हणून उशीर झाला. तर झाले असे, की ही जी गाणी मी तुमच्यासमोर टंकत आहे, ती सुमधुर, रसाळ, ऐकीव वगैरे प्रकारात मोडत नाहीत. पण आमच्यासारख्या (टुक्कार)लोकांत फारच (चिक्कार) लोकप्रिय आहेत. चांगल्या गाण्यांवर तर सर्वच जण प्रकाश टाकतात. पण अश्या गाण्याचं काय ज्यांची गोडी तर बर्याच जणांना आहे पण उल्लेख मात्र कोणीच करायला धजत नाही. ही गाणी वेगळी का? तर त्यांची काही प्रमाणे आहेत. एक तर त्यांची चाल, दुसरे त्यांची रचना, तिसरे आणि महत्वपूर्ण म्हणजे त्यांचे शब्द किंवा अभिप्रेत असलेले अर्थ. तर, या समूहातली जवळपास सर्वच गाणी सर्वांनीच ऐकली असतील, पण उजाळा म्हणून मी हा एक प्रयत्न केला आहे. आपल्याला माहिती असल्यास उत्तम आणि आणखी काहींची भर घातल्यास अत्त्युत्तम. संपादकांना विनंती की धागा जर मिपा नियमावलीच्या बाहेर वाटतोय आणि उडवावयाचा असेल तर कल्पना द्यावी. उडवण्यास काहीच हरकत नाही. १. मुझको राणाजी माफ करना. करण-अर्जुन सिनेमातलं हे गाणं. ममता कुळकर्णी (वाचणार्यांची पक्षी: पाहणार्यांची अवस्था बिकट करणारी यक तारका) आणी गाण्याचे बोल (काला काला घुंघट काहेको डाला, का करी आई गोरी मुंह कही काला) ही जमेची बाजु. "गुपचुप गुपचुप गुपचुप गुपचुप गुपचुप, छत पे सोया था......" म्हंटले की कसंससं व्हायला होतं. अ.सां.न.ल.(अ फॉर असुज्ञ) बाईंचे नृत्य कौशल्य तर वाखाणण्याजोगे. या चित्रपटातलं जाती हू मै हे गाणं सुद्धा कमी-अधिक प्रमाणात याच पठडीतलं. फक्त बोल छान आहेत. २. चढ गया उपर रे, अटरिया पे लोटन कबुतर. दलाल सिनेमा अन मिथुनदा. आता काय सांगावं अजुन. हे गाणं बस "क्या बात !! क्या बात !! क्या बात !!" यातील चोरी चोरी मैने भी तो यारी निभायी रे हे गाणं तितकंच विरुद्ध म्हणजे अगदी श्रवणीय. ३. भोलीभाली लडकी खोल तेरे दिल की. ममता अन अक्कीचं ह्ये गाणं 'टाप आफ आल'. चाल, बोल, लोकेशन अन नृत्य सर्वच बाबींत येक क्रमांक काढतंय हे गाणं. वेन्जॉय करता येण्यासारखं पण टपोरी. आपलं आल टैम फेवरेट. यातलं जहेर है के प्यार है तेरा चुम्मा एकदम छिछोर गाणं. ४. चमक चम चमके अंगुरी बदन. असंच एक साध-सुधं गाणं. लिहिण्यासारखं जास्त काही नाही म्हणुन. ५. सरकाई ल्येओ खटिया जाडा लगे है. राजाबाबु-गोविंदा नि करिश्मा वैनी काय तुफान नाचले आहेत या गाण्यात. बनेल घालुन गोविंदा नि लेहंगा का काय ते घालुन क्रिश्मा. बाज, उश्या, चादरी यांचा यथासांग वापर करुन घेतलाय. या चित्रपटातील ईतरही गाणी छान आहेत, जसे पक चिक पक राजाबाबु आणी अ आ ई उ उ ऊ मेरा दिल ना तोडो. ६. ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है. अनु मलिक यांच्या आवाजातील देव कोहलींच सुंदर गाणं-जुडवा. सल्लुमियाँचा डँस नि रंभाकाकु नि करिश्मावैनी. सगळे 'एका पेक्षा एक'. ७. जब तक रहेगा समोसे मे आलु. चित्रपट-मिस्टर & मिसेस खिलाडी. अनु मलिकचं गाणं. लिरिक्स (अतिशय फालतु )त्याचंच असावं बहुतेक. नो आयड्या. ८. मेरी छतरी के निचे आजा, क्यु सोचे है ---खडी खडी. तहेलका नावाचा मल्टी स्टारर पिक्चर. वेणिवाला अमरिश, शक्तिमान, जावेद जाफरी, नसीरुद्दीन शाह (तद्दन फालतु चित्रपटात ह्याने काम करायला होकार का दिला? हे न कळालेलंच बरं). ४ जण मजा करण्याच्या मुडमध्ये असतील तर पाहता येण्याजोगा चित्रपट. ९. बत्ती ना बुझा, मुझे लगता है डर. १०. भरो माँग मेरी भरो, करो प्यार मुझे करो. वरील दोन्हिही गाण्यांविषयी न लिहिलेलंच बरं. ११. मैने पैदल से जा रा था, उने आटो से आ री थी. वाहहहह !!! वाहहहह !!! गाणं लिहावं तर असं. पक्क्या दख्खणी हैदराबादी भाषेतील. या भाषेच्या संदर्भासाठी 'द अंग्रेज' पहावा. एक्स्प्रेशन वाईज (लै विचार केला पण मराठी शबुत गावलाचं न्हाय) गोविंदा वेक लवंबर. १२. एक चुम्मा तु मुझको उधार दई दे. छोटे सरकार चित्रपटातील माथेफिरु लिरिक्स असलेलं गाणं. शिल्पा शेट्टी म्हतारी (सध्या) असुन इतकी छान दिस्त्ये. तेव्हा तर तिचा काळ होता. गोविंदाचे ठुमके एकावर एक. त्याच तर्हेचं शुल चित्रपटातील दिलवालों के दिल का करार लुटने. १३. चांदी की डाल पर सोने का मोर. सल्लुची टपोरी भुमिका, राणीचा लाडीक अभिनय आणी होळीचा धिंगाण्याचा माहौल. १४. खिडकी खुली जरा, जरा पर्दा सरक गया. गोविंदा वन्स अगेन-दिवाना मस्ताना. त्याच्या डँसने धुमाकुळ (हंगामा) घातला. अनिल कपूर, गोविंदा अन चावला आजी सर्वच जण खास. या यादीत अजुन अलिकडे एक-दोनगाण्यांची वाढ झालेली आहे. १५. नॉटी नॉटी सैया सैया - कॅश ह्या गाण्याचे शब्दांकन चांगले आहे, पण चित्रीकरण ज्या पद्धतीने केलंय, ते अगदी अपर्तीमरित्या अर्वाच्य तर्हेने. नट्यांच्या कापडांवर २ रुपये जरी जास्त खर्च केला असता तर आपल्या जुन्या (कसब्याच्या) बाजारातील नवी कापडं विकत घेता येत होती. त्या देओल काकुंच्या मर्दानी शरीराला पाहुन म्हणे खलीला घेर्या आलेल्या. गाणं छान, रितेशला दाढी करण्यासाठी मिपावरुन मदत करण्याचं आश्वासनसुद्धा. तर मग मित्रहो कसं वाटलं ते कळवा. बाकीची या सदरातील गाणी आपण सुचवावी. अवांतर : लिवायला लई कटाळा यितु. एक टंकलेखक फायजे. व्यनितुन संपर्क करा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
संगीत
विनोद
विडंबन
मौजमजा
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
14202 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

हम तो तंबू में बंबू लगाई रहे

गवि
Fri, 03/04/2011 - 11:12 नवीन
हम तो तंबू में बंबू लगाई रहे थे. मर्द. (जो मर्द होता है उसे दर्द नही होता.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

(जो मर्द होता है उसे दर्द नही

वपाडाव
Fri, 03/04/2011 - 11:31 नवीन
(जो मर्द होता है उसे दर्द नही होता.)
नव्हे ते असे आहे. मर्द को दर्द नही होता. जबड्यात हात घातल्याबद्दल स्वारी. -(मर्द मराठा)वपाडाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

(मर्द मराठा)वपाडाव

गोगोल
Fri, 03/04/2011 - 11:39 नवीन
ऊप्स .. म्हणजे आता ऊर्वरित आयुष्यात तुम्हाला चुकून माकून दर्द झाला तर??? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

शिंपल हाय, खिशात himani fast

वपाडाव
Fri, 03/04/2011 - 11:51 नवीन
शिंपल हाय, खिशात himani fast relief - दर्द मिटाये चुटकी मे किंवा डिस्प्रिन - दर्द क अंत, तुरंत बाळगायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

नाही-१अमितजींच्या या

गवि
Fri, 03/04/2011 - 12:26 नवीन
नाही -१ अमितजींच्या या डायलॉगविषयी मला खात्री आहे. जो मर्द होता है उसे दर्द नही होता. मर्द को दर्द नही होता हे अन्य कुठेतरी किंवा एखाद्या संवादात आले असेल. पण "मर्द" सिनेमाचा मेन डाय्लॉक "जो मर्द होता है उसे दर्द नही होता." आणि ते तंबूचं गाणं त्यातच होतं. इतर मुख्य झलक्स : चाबकाचे फटके, त्यावर मिठागरातील प्रेमपूर्ण मीठचोळणी, आणि तात्काळ गवताच्या गंजीत प्रेमपूर्ण प्रयाण... इ इ त्यानंतर देशातल्या गरीब जनतेचे रक्त रोज भरपूर काढून घेऊन लोणच्याच्या बरण्यांत काढून फडताळांत साठवून ठेवणे आणि इतर वेळात त्यांजकडून दगड धोंडे वाहून कष्टाची कामे करुन घेणे. कृपया तज्ञांनी पाठिंबा द्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

अरे बाबूजी जरा धीरे चलो बिजली

स्पा
Fri, 03/04/2011 - 11:45 नवीन
अरे बाबूजी जरा धीरे चलो बिजली गिरी यया बिजली गिरी या गाण्याने तर पार य्याड लावला होतं पघा... त्या गायिकेचा (?) "हिरवट" आवाज तर लय भारी होता
  • Log in or register to post comments

गायिकेचा (?) आवाज सोनु कक्कर

वपाडाव
Fri, 03/04/2011 - 11:53 नवीन
गायिकेचा (?) आवाज
सोनु कक्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मोठे व्हा!

धमाल मुलगा
Fri, 03/04/2011 - 18:38 नवीन
पडद्यावरची 'या ना गुप्ता' म्हणवून घेणारी सळसळणारी बिजली बघायची सोडून गाण्यामागचं नरडं कोणाचं ह्याचा शोध घेत बसला होता? मोठे व्हा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ती बी काय कमी नाय !!!!! लोक

वपाडाव
Sat, 03/05/2011 - 10:38 नवीन
ती बी काय कमी नाय !!!!! लोक आपापल्या परीने जे झेपेल ते करतात्/पाहतात्/ऐकतात. आम्ही मोठे आहोतंच हे.वे.सां.न ल. झेपेल ते ;-) अवांतर : हा प्रतिसाद गविंच्या धाग्यावर यायला हवा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

"दिल का दरवाजा

एक
Fri, 03/04/2011 - 23:32 नवीन
खुल्ला है राजा" हे शिल्पा शेट्टींच आमंत्रण-वजा-गाणं राहिलं का? पिक्चरचं नाव विसरलो. पण त्यात ३ हिरॉईन्स आणि अक्षयकुमार होता असं म्हणतात. ;)
  • Log in or register to post comments

श्या ! ह्या सगळ्यात आमच्या

परिकथेतील राजकुमार
Sat, 03/05/2011 - 12:43 नवीन
श्या ! ह्या सगळ्यात आमच्या लाडक्या मिथुनदाचे आणि आयेशा झुणका भाकरीचे* 'घुटुर घुटूम.. .. चढ गया उपर रे अटरीया पे सोना कबुतर रे..' असे काही गाणे कसे विसरले लोक्स ? *शब्द सौ. कणेकर गुर्जी
  • Log in or register to post comments

नाराज......

वपाडाव
Sat, 03/05/2011 - 16:33 नवीन
एक तर परांनी आम्हाला दिलेला फैला प्रतिसाद अन त्यात त्यांनी तो लेख अपुर्ण/अर्धवट वाचुन दिला आहे असं वाटायला कुठेच जागा सोडली नाही. तसं हा त्यांचा दुसरा प्र. आहे पण या आधी त्यांनी आणंदयात्रींचा समाचार घेतला होता. धाग्याविशयी काही लिहिण्यात नव्ह्ते आले. तर राहीला प्रश्न त्या गाण्याचा. ते तर वरंच दुस्र्या क्र. शिलेक्ट केलेलं आहे. एवडं म्ह्त्वाचं कसं इस्रु शकीन मी.
२. चढ गया उपर रे, अटरिया पे लोटन कबुतर. दलाल सिनेमा अन मिथुनदा. आता काय सांगावं अजुन. हे गाणं बस "क्या बात !! क्या बात !! क्या बात !!" यातील चोरी चोरी मैने भी तो यारी निभायी रे हे गाणं तितकंच विरुद्ध म्हणजे अगदी श्रवणीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आभार

वपाडाव
Sat, 03/05/2011 - 16:40 नवीन
या धाग्यावर प्रतिसाद देणार्या सर्व हौशी जणांचे आभार......
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा