हरवली पोर माझी कविता नावाची !
लेखनविषय:
काय सांगु कहानी
या वेड्या बापाची
हरवली पोर माझी
कविता नावाची !
कामाच्या ओझ्यामंधी
भान हुतं गेल सरुन
डोळ्यात टिपुस ना परि
ओढ पोरी तुझीच तिथुन
कारभारनीच तुकडं
काही ग्वॉड लागना
शेतांमधी पाटाच
काही पाणी वाहिना
वाटच्या धुळीसंग
कोणी चालना
चिमण्यांही आज कुठं
दाणं टिपना
सांगतो मी कहानी
या वेड्या बापाची
हरवली पोर माझी
कविता नावाची !
दारातल्या अंगणात
काही रात निजना
पारिजाताचा सडा
आज काही सांगना
चंद्राची कोर बी
कुठ दिसना
आभाळाची माया
आज काही बोलना
उसवल मन आज
इचार करवाना
हरवली पोर माझी
कुठ सापडना..
- शब्दमेघ ( ३ मार्च २०११)
भाषेचे स्थान : बारामती
२. नको बोलु बाबा काही :- http://www.misalpav.com/node/17097
वाचने
4696
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
गणेशा
In reply to गणेशा by पैसा
पैसा ताई..प्रथम धन्यवाद ...
गणेशा - सांगतो मी कहानी या
तुमची कविता बघून अगदी लगेच
In reply to तुमची कविता बघून अगदी लगेच by राघव
आज जरी दूर तुझं गोजिरं
मश्त जमलिय
मस्त
सर्वांचे आभार .. राघव जी
काय सांगू कसं सांगू सुरुवात
काय सांगू कसं सांगू सुरुवात
In reply to काय सांगू कसं सांगू सुरुवात by नगरीनिरंजन
वाह!
कविता अशीच असते
In reply to कविता अशीच असते by अरुण मनोहर
अरुण जी मनापासुन धन्यवाद