Skip to main content

मराठी चित्रपट

लेखक उगा काहितरीच यांनी गुरुवार, 03/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात चित्रपटांची सुरुवातच मुळी मराठी मानसाने (मान्सांनी) केली. तरी आज मराठी चित्रपट किंवा वाहिन्या पाहतांना हसावे का रडावे तेच कळत नाही. काही काही चित्रपट पाहतांना वाट्ते की मराठी चित्रपट हॉलिवुड पेक्शा सरस आहे (कथेत बर्का तंत्रज्ञानात नाही) उदा श्वास , चेकमेट . परंतु कधी कधी वाट्ते का चित्रपट तयार करतात हे लोक? ना बजेट ना कथा ! उदाहरण द्यायच तर नाथा पुरे आता , जाउ तिथं खाउ . मराठी चित्रपट वाहिन्याही सारखे सारखे तेच चित्रपट टाकुन बोर करतात. यांच्या जवळ सिड्या नसतात का? मराठीत एकही सुपरस्टार का नसावा ? सर्व मराठी कलाकारात तोचतोचपणा का? कोणताही नविन कलाकार वा दिग्दर्शक आल्या आल्या एकदम प्रभावीत करुन जातो पण काही दिवसांनी त्याला काय होते ? (भरत जाधव, पॅडी )मराठी दिग्दर्शक जास्तच प्रयोग करतात का? आनखी बरच काही आहे पण सध्या पुरे! हा माझा पहीलाच प्रयत्न कोनाला दुखवन्याचा उद्देश नाही . टंकलेखीत करणे खरच अवघड आहे. समजुन घ्यालच...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3967
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

१५ - २० वर्षांपुर्वी महाराष्ट्र सरकारने मराठी चित्रपटसॄष्टी टिकवण्यासाठी मराठी चित्रपट काढणार्‍या निर्मात्याला १५ लाखाचे अनुदान, अंशतः करपरतावा ईत्यादी योजना जाहीर केल्या. त्यामुळे मराठी चित्रपट चालला नाही तरी निर्मात्याचा पैसा वसुल होतो. बाकी चित्रपट जत्रेत वगैरे लाउन आणी मराठी वाहीन्यांना विकुन पैसा मिळतो तो वेगळाच. त्यामुळे धंद्याचे गणित जमलेल्या बर्‍याच अमराठी आणी मराठी निर्मात्यांनी अंत्यत कमी खर्चात टुकार मराठी चित्रपट काढुन प्रदर्शित करायला सुरवात केली.

दादा कोन्ड्के आमचे सुपरस्टारdada

मला तर वाटते अलका कुबलमुळेच मराठी चित्रपटांना वाईट दिवस आलेत .मराठी हिरोंचा तोच्च तोच पांचटपणा आणि त्यांची ती डायलॉग मारण्याची भंकस स्टाईल आणि असे बरेच घटक आहेत .अर्थात काही चांगले चित्रपटही आहेत पण फक्त औषधाला उरलेले !बघुया आता महेश मांजरेकरसारखे लोक काही चांगले दिवस आणतात का ते !

मला वाटते... १) बरेच रटाळ आणि काहीच हिट चित्रपट देण्याचा प्रघात बहुतेक सर्व चित्रपट क्षेत्रात आहे... उदा. हिंदी मध्ये वर्षाला ३०० पेक्षा जास्त चित्रपट निर्माण होतात पण त्यातले बघण्यासारखे ३० सुद्धा नसतात..हॉलीवूड मध्ये देखील असेच होते...आपण त्या चित्रपटांना हिट समजतो पण मुळ देशात तर त्याची 'हिट विकेट' उडालेली असते... २) मराठी मध्ये चांगले चित्रपट बनतात पण ते प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत...कारण जाहिरातीमध्ये मराठी चित्रपट कमी पडतात. आणि ज्यांची जाहिरात चांगली असते ते चित्रपट बऱ्या प्रमाणात हिट सुद्धा जातात..चांगले असो व नसो उदा. गेल्या २ वर्षातले महेश मांजरेकरचे चित्रपट. फक्त जाहिरात न केल्यामुळे चांगले असून देखील लोकांपर्यंत न पोहचलेले चित्रपट एक उनाड दिवस, कदाचित, छडी लागे छम छम, आम्ही असू लाडके...असे आणि अनेक.. ३) मराठी चित्रपटाचा इतिहासच काही अपवाद सोडता आशायाभिमुख आहे. इथे चित्रपटामध्ये 'सुपरस्टार' काही तरी करण्यापेक्षा सामान्य माणूसच असामान्य काहीतरी करतो असे दाखवले जाते. हे चुकीचे आहे की बरोबर आहे हे मला माहिती नाही आणि त्यावर भाष्य सुद्धा करायचे नाहीये.. ४) तंत्रज्ञान ही बाब खरेच काही वेळा कमकुवत असते...खरे तर मला 'जाऊ तिथे खाऊ' चित्रपट मनापसून आवडतो..पण त्यामध्ये चांगले तंत्रज्ञान वापरले असते तर चित्रपट तो आणखी मोहक बनला असता हे खरे.

मराठी चित्रपटात सगळे अगदी शुद्ध आणि बायकी मराठी का बोलत असतात बरं? चित्रपटातली भाषा आणि बोली भाषेत इतका फरक असतो की बस. उलाढाल नावाच्या चित्रपटात सुबोध भावे नामक प्राण्याने एका धंदेवाईक खुन्याच्या भूमिकेत इतकी शुद्ध मराठी भाषा वापरली आहे की याचं नाव सुबोधच असणार हे कोणालाही न सांगता कळेल. त्याचा मूर्ख गेटअप आणि तोंडावरचे खतरनाक वगैरे करण्याच्या नादात उर्मट दिसणारे भाव याबद्दल इथे बोलणे उचित होणार नाही या कारणास्तव स्वतःला आवरत आहे.

मुळात चित्रपट = चांगल्यात चांगली कला सादर करणे अस राहिलेलं नसुन...... चित्रपट = जेवढा पैसा मिळवता येईल तेवढा मिळवणे अस समीकरण झालं आहे.......

चेकमेट हा चित्रपट फरदीन खानच्या "एक खिलाडी एक हसीना " वरुन काढलेला आहे. आणि हा हिंदी चित्रपटही कुठल्यातरी हॉलिवुड चित्रपटाची कॉपी आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

चेकमेट हा चित्रपट फरदीन खानच्या "एक खिलाडी एक हसीना " वरुन काढलेला आहे. आणि हा हिंदी चित्रपटही कुठल्यातरी हॉलिवुड चित्रपटाची कॉपी आहे.
कॉन्फिडन्स