Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पियुशा on Wed, 03/02/2011 - 10:45
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
पहिला पहिला क्रश ...... प्रत्येकाच्या आयुष्यात हा दिवस येत्तोच (अपवाद वगळता) आमच्याही आयुष्यात हा दिवस तसा जरा लवकरच आला असेच म्हणावे लागेल . त्यावेळी मी नववीत असेन ,आमच्या धिंगाणेबाज कंपूत आम्ही ५-६ मुली होतो आमच्या वर्गात दोन मॉनिटर होते एक मुलांचा ,आणि एक मुलींची ,(ती मी होते ) त्यामुळे काही मुली माझ्यावर नेहमी खार खाऊनच असायच्या वर्ष संपत आले होते जवळ जवळ, पण ग्रुप मधल्या काही मुलीन मधला बदल थोडा उशिराच लक्षात आला माझ्या ! म्हणजे तमुक तमुक मुलगा दिसला कि चोरून चोरून स्मैलींची देवाणघेवाण....... चोरून चोरून चिठ्या - चपट्या, गाणी गुणगुणन, ... (मुलींसाठी )सक्तीची दोन वेण्या आणि काळी रिबीन असताना हि कधीकधी पोनी बांधन, दोन चार केसांची बट मुद्दाम गालावर रुळवन, आणि म्याड्मचे वेणी का नाही घातली ? म्हणून बोलणे खाण..... आणि विशेष ज्यां -ज्यां कबुतरांच्या जोड्या जमल्या होत्या ती टाळकी आम्हाला नेहमी टाळायचे ......खेळायला पण आणि अभ्यासाला पण ..... गम्मत अशी कि ज्या मुलींशी आमची खुन्नस होती त्या बाकी मला जरा टरकायाच्या जरा नरमाईने वागायच्या ... (मी कधी त्यांच्या घरी पचकले (त्यांच्या प्रेमप्रकरणावर )तर नसती पंचाईत !म्हणून बहुतेक ) मला आणि कपूला (कल्पिता ) इंटरेस्ट, त्याना चिडवण्यात वाटायचा वर्गाच्या खिडकी जवळच बेंच होता आमचा ,बाहेर येणारे जाणारे आणि विशेष आत डोकावणारे या सर्वावर आमचा डोळा असायचा " ए गौरे......................देखो तेरा शाहरुख जा .... रहा हे हे हे .... हि हि हि हु हु हु ... गौरी लगेच बद्कासारखी मान उंचावून पहायची ........... काय पण सोल्लिड मजा यायची त्यांना चिडवायला ......... शाळेच्या रस्त्यावरच एका छोटस कॅन्टीन होत आणि त्या शेजारीच एक मावा(मटका) कुल्फी , सरबत ,रॉयल कुल्फीची गाडी लागलेली असायची भर दुपारी उन्हात मावा कुल्फी खाणे म्हणजे अहा अहा सारा थकवा पळून जायचा ......पण सध्या आम्हाला फुकट मध्ये मावा कुल्फी मिळायची कारण ओळखीची एक दोन कबुतरांची जोडी तिथे लुडबुडत असायची आणि आम्ही त्यांना पाहिलं हे (त्यांच्या मुद्दाम लक्षात आणून द्यायचं ) लक्षात आल कि लगेच आम्हाला फुकटात कुल्फी नाहीतर सरबत फ्री फ्री फ्री ...................... नंतर स्पोर्ट days आले आम्ही रनिंग मध्ये भाग घेतला होता नेमकी जिंकायच्या बेतात असताना मध्येच माझा टांगा कल्टी झाला बाकीच्या म्याडम धावत आल्या त्यांनी मला हाताला धरून साईडला घेतले ,पाणी पाजले, आणी त्यात ते पण होते विनय सर ...... आमच्या फुटलेल्या ढोपराणा त्यांनी हळुवार मलम लावले आणि तिथून पुढे......... माझ आयुष्य काही दिवसासाठी प्रेमाच्या झोक्यावर बसून हिंदोळ्या खाऊ लागल मला काय झाल हे मलाच समजत नव्हत न अभ्यासात मन लागेना ना खेळण्यात मला पण अचानक प्रेमाचा साक्षात्कार झाला होता ... आणि तो हि आमच्या विनय सरांवर (अरे बाप रे) विनय सर , २४-२५ वर्षाचे ,जोग्रोफी शिकवायचे ,गोरा रंग ,कुरळे केस ,नाजूकसा चष्मा , बोलणे हि अगदी मृदू ! (त्यामुळ मुली फार मरायच्या त्यांच्यावर ,आणि मुल जळायचे त्यांच्यावर ) वर्गात आले कि पहिला सुविचार वाचणार (लिहिणारी मीच ) ...मग तासाला सुरुवात .... शिकवण पण कित्ती छान ,मधेच एखाददुसरा विनोद करून सर्वाना हसवणार मधेच एखाद्या झोपाळू ला टपली मारणार त्यांना त्यांची खुर्ची नेहमी स्वच्छ हवी असे ,एकदा त्यावर धूळ दिसली तर त्यांनी " बोरसे (मुलांचा monitar ) ला बोलावले "ये बोरसे ये खुर्चीवर बैस ...लाजू नको बैस बैस ....त्याला सुरुवातीला काही कळलेच नाही सर का अस म्हणताय ? तो लाजत लाजत खुर्चीवर बसला आणि त्याची प्यांट मागून खडूच्या धुळीन पांढरी झाली तेव्हा सर्व वर्गात हास्याचे तुषार उडाले होते बिचारा .......... सर ;-"बोरसे समजले ना तुला काय ते ?" उद्यापासून धूळ दिसली नाही पाहिजे ओके ...monitar ना तू? त्यांच्या अश्या गमती -जमती मूळ हसून हसून वाट लागायची त्यांचा तास संपूच नये असे वाटायचे मला ! आता रोज सकाळी आम्हाला " खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम अर्पावे ", " "शेजार्यावर प्रेम करा" " "तुम्ही जेवढे प्रेम जगाला द्याल ,त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळेल" हेच सुविचार आठवायचे सगळ्यां जोडप्यांना चीडवणारी मी आता मला त्यांची अवस्था समजत होती........... मला कुठलाही पिक्चर पहिला कि विनय सरच हिरो म्हणून दिसायचे भले तो, सलमान असो कि शाहरुख ..... मन अगदी पिसासारख अलगद, " कभी इस क्लास में, कभी उस क्लास मे" त्यांना शोधायचं ते दिसले कि पाहून गोड हसायचं, ते पण हसायचे ........ वर्गात त्याचंपण सारख पियू आज सुविचार छान लिहिला ,अक्षर छान आहे तुझ ! "तू टेस्ट मध्ये छान स्कोर केला ह ! कीप इट up गुड ........" आमची स्वारी एकदम हवेत .................. असेच आमचे आयुष्यातले मोरपिसा सारखे सुंदर दिवस मजेत चालले होते होते पण पण अचानक तो दिवस आला .... "पियू जरा इकडे ये ....काय सर '" सर ; -आग त्या प्रभा म्याडम बरेच दिवस झाले आजारी आहेत त्यांना भेटलीस का तू ? (मी अन तिला भेटेन अशक्य ! एक नंबरची खडूस,पण ह्यांना काय पडलाय तीच ) मी ;नाही हो सर, का? सर : तुला माहित आहे त्या कुठ राहतात? (डोम्बल तुमच कशाला भेटताय ? दाल मे कुच्छ काला तो नही) मी ; अज्जिबात माहिती नाही हो सर मला त्या कुठ राहत्तात! सर ; होका जाऊदे अग मला कुणीतरी सांगितलं कि पियू त्यांच्या घरी डान्स प्र्याक्टीस ला जायची म्हणून सहज विचारलं !(कुणी काडया केल्या कुणास ठाऊक ) शाळा सुटली तरी तेच विचार विनय सर कशाला चालले तिकडे मरायला नसता खुराक डोक्याला माझ्या ......... दुसर्या दिवशी सकाळी सकाळी आधी विचारले "भेटले का हो सर प्रभा म्याडम्ला......" सर ; नाही ग वेळ नाही मिळाला आणि तश्यापण त्या आल्या आहेत शाळेत आज ! हो क्का (हुष श .......................बर झाल )मरून दे .. आम्हाला अस सुखी बघन देवाला खटकल जाने आम्हाला चिकन pox (कांजण्या )झाल्या आणि सर्व चेहरा भर पसरल्या डॉक्टरांनी त्या बर्या होई पर्यंत शाळेत जाऊ नको ह !नाहीतर दुसर्यानाही होतील असा प्रेमळ सल्ला दिला म्हणजे काय १०-१५ दिवस घरी .....नही............बोंबला............... कांजण्या पेक्षा विनय सर दिसणार नाहीत भेटणार नाहीत ह्या विचाराण गलबलून आल एक एक दिवस कसा कसा गेला मला विचारू नका ! आणि शेवटी तो दिवस आला आणि आम्ही सायकलवरून शाळेकडे प्रस्थान केले ८.१५ ची शाळा असून एरवी आम्ही ८.२५ पोहचून ग्राउंडला दोन राउंड मारायचो आणि आज चक्क ८ ला पोहचून आम्ही विनय सरांची आतुरतेने वाट पाहत बसलो ........प्रार्थना झाली,वर्गात जाउन बसलो सुदैव माझ पहिला तास भूगोलाचाच होता माझ सर्व लक्ष दाराकडे आत्ता येतील मग येतील १० मिनिट झाली .... मध्येच सायन्स च्या म्याडम टपकल्या आणि सायन्सचा तास सुरु झाला मी वेळापत्रक तीनदा चेक केले अरेच्या हे कस काय बुवा ? मी कपुला कोपराने ढूसनी दिली " हे काय ग कपू म्याडम भणजाळली का ? भूगोलाचा तास आहे ना? काय ग विनय सर कुठाय ? आले नाही का आज ? बर नाही का त्यांना ? कपू हळूच ;"ए बावळे जस काय तुला माहितच नाहीं" मी : आईशपथ सांग कि क्काय क्काय ?सांग न प्लीज ? आग त्याचं लग्न झाल ५-६ दिवसापूर्वी प्रभा म्याड्मशी ... क्काय ?कधी? कस? केव्हा ? (कपू अक्ख्या वर्गाची नव्हे शाळेची जेम्स बोन्ड होती अस म्हटल तरी चालेल पट्ठीला सर्व खबरबात असायची ) "छुपे रुस्तुम होते दोघ पण, लव्ह म्यारेज केल त्यांनी आता १५ दिवस रजेवर! हे ऐकून माझ्या डोक्यात हजार घण्टा वाजू लागल्या टन टन टन.......... "प्रभा sss ती दात फारुळी ,सश्यासारखे दोन दात पुढ आलेली खडूस, ती आवडली ? क्काय पण चोइस आहे विनय सरांचा ..... कुठ विनय सर अन कुठ ती ? बाकीच्या मुली (मी ) मेल्या होत्या का ? कपू ;" जाऊ दे ना ती म्हण आहे ना " दिल आया गधी............."अपनेको क्या फरक पडता हे ? (फरक तो पडता हे भाई तुम नहीं समझोगी ") "देवा तू मला ५ -६ वर्ष आधी जगात पाठवलं असत तर तुझ क्काय बिघडल असत का रे ?" (हे बालिश विचार तेव्हाचे ,म्हणून भाषा तशीच वापरली आहे, गुरूंचे स्थान आदरणीय आहे ):)
  • Log in or register to post comments
  • 16233 views

प्रतिक्रिया

Submitted by सूर्यपुत्र on Wed, 03/02/2011 - 11:02

Permalink

हे देखणे मास्तर...

गेल्या किती जन्मातले आमचे पाप असते, की असे देखणे मास्तर शिकवायला येतात... :( अगदी कॉलेजात सुद्धा. च्यायला, तोंड दाबून बुक्क्यांचा मार... :( बुकलून काढावासा वाटतो मास्तर. (हे बालिश विचार ,म्हणून भाषा तशीच वापरली आहे, गुरूंचे स्थान आदरणीय आहे ) :) -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments

Submitted by मी ऋचा on Wed, 03/02/2011 - 11:09

Permalink

मस्त!

मस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 03/02/2011 - 11:11

Permalink

क्रश आवडला.

मस्त लिहिलंय!
  • Log in or register to post comments

Submitted by महेश-मया on Wed, 03/02/2011 - 11:30

Permalink

छान

प्रेमात पडल्यावर आयुष्य काही दिवसासाठी प्रेमाच्या झोक्यावर बसून हिंदोळ्या खाऊ लागते, खरच असं असते का ?
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 03/02/2011 - 11:31

Permalink

:)

विणय काकांनी एका बालिश काकुंची णिवड ण करता सुयोग्य निवड केल्याबद्दल विनय काकांचे अभिणंदण :) चॉइस केलेल्या प्रभा म्याडम नक्कीच सुंदर असाव्यात हे लेखिकेच्या बालिष आयुसेवरुन स्पष्ट होते. शेवटी लिहील्याप्रमाणे लेखाप्रमाणे भाषा ही बालिष आहे. :) बर्‍याच ठिकाणी अनुस्वार नसल्याने , तोडकी वाक्यरचना आणि भरपुर डॉट्स असल्याने आख्यान वाचल्यासारखे वाटले. - चिन्मय सर प्रोफेसर (शारिरिक शिक्षण, भुगोल,इतिहास ) , सेंट हेलेना काँन्व्हेंट स्कुल, कँप.
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Wed, 03/02/2011 - 12:19

In reply to :) by टारझन

Permalink

१४ फेब्रु पेश्शल - प्रपोज कषे

१४ फेब्रु पेश्शल - प्रपोज कषे माराल ? प्रेषक टारझन दिनांक गुरुवार, 10/02/2011 - 12:23 अ‍ॅज यु वॉल णो एक जनहितार्थ धागा काढावा अशी हाक मला अंतर्मनातुन आली उमेद्वार इतपर्यंत .. हे काय आहे रे टार्या तुझ आपल अस आहे "दुसर्या शिकवे ब्रम्ह ....................";)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 03/02/2011 - 12:51

In reply to १४ फेब्रु पेश्शल - प्रपोज कषे by पियुशा

Permalink

उगी उगी बाळ उगी उगी

उगी उगी बाळ उगी उगी :) कुजकट सल्ला : शुद्धलेखन आणि बालिषपणा ह्यातला समजवायला कोणी विनय सर भेटतो का बघा जालावर :) -(खाऊ की) गिळुशा
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Wed, 03/02/2011 - 12:59

In reply to उगी उगी बाळ उगी उगी by टारझन

Permalink

आम्हि कुनाला सल्ला मागितला

आम्हि कुनाला सल्ला मागितला नाहि शुद्धलेखन तुझ कस आहे हे बघ कि आधि तुच शोध एखादि मड्ड्म अन्तरजालावर तुला शिकवनारि उगि उगि टारुबाळ
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on गुरुवार, 03/03/2011 - 10:06

In reply to आम्हि कुनाला सल्ला मागितला by पियुशा

Permalink

आम्ही बी

पण जरा गुरु शिष्याच अन्तर असाव म्हनतोय (टिप्;आपल्या प्रायवेट गोष्टी जालावर आनु नये) आदेश
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची on गुरुवार, 03/03/2011 - 20:01

In reply to आम्ही बी by श्री गावसेना प्रमुख

Permalink

तुम्हीच विनय सर का हो?

तुम्हीच विनय सर का हो?
  • Log in or register to post comments

Submitted by गेंडा on Tue, 03/22/2011 - 01:03

In reply to १४ फेब्रु पेश्शल - प्रपोज कषे by पियुशा

Permalink

हा हा हा.

बाये तु ह्ये करायचे धैर्य कसे केलेस ह्यो मपल्याला सांग. (अब संबभलके रहो. तुम्हारी टक्कर किसेक साथ है ह्ये समज लो)
  • Log in or register to post comments

Submitted by सुत्रधार on Wed, 03/02/2011 - 11:44

Permalink

अस पण असतय काय

छान सुरुवात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश१११ on Wed, 03/02/2011 - 11:49

Permalink

पियुषा - छान आणि मस्त.

पियुषा - छान आणि मस्त. थोड्याशा भाषिक चुका आहेत. त्या सुधरवता येतील. भाषेला छान लय आहे.हे महत्वाचे. गौरी लगेच बद्कासारखी मान उंचावून पहायची ........... हे छान लिहिले आहे. त्तुम्ही एवढे लिहिता हे महत्वाचे. लिहित रहा.लय आहेच. खूप शुभेच्छा .
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Wed, 03/02/2011 - 11:53

Permalink

हा हा हा......

मस्त मस्त.... एकदम आमची शाळा आठवली. आणि आमच्या सोनाली खरे (असच नाव होत त्या म्याडमचे!!) नजरेसमोर तरळुन गेल्या!!! जाऊ दे.... गेले ते दिन गेले......
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Wed, 03/02/2011 - 11:53

Permalink

हा हा हा......

मस्त मस्त.... एकदम आमची शाळा आठवली. आणि आमच्या सोनाली खरे (असच नाव होत त्या म्याडमचे!!) नजरेसमोर तरळुन गेल्या!!! जाऊ दे.... गेले ते दिन गेले......
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 03/02/2011 - 11:59

Permalink

>>>> आता रोज सकाळी आम्हाला "

>>>> आता रोज सकाळी आम्हाला " खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम अर्पावे ", " "शेजार्यावर प्रेम करा" " "तुम्ही जेवढे प्रेम जगाला द्याल ,त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळेल" हेच सुविचार आठवायचे<<< >>>(हे बालिश विचार तेव्हाचे ,म्हणून भाषा तशीच वापरली आहे, गुरूंचे स्थान आदरणीय आहे )<<< चान चान - इ. ९वी ला सायन्स टिचर आवडणारा. (मॅडमना टिचर म्हणायचो आणि मास्तरांना सर)
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Wed, 03/02/2011 - 11:59

Permalink

लेख व शैली आवडली..मजा आ गया

लेख व शैली आवडली..मजा आ गया वाचताना....
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Wed, 03/02/2011 - 12:18

Permalink

सारे कळत, नकळत च घडते :-)

पियुशा , लेख अगदी मनापासून आवडला. आमची मुलींची शाळा होती, दुर्दैवाने आम्हाला शिकवणार्‍या सर्वच मॅडम होत्या कोणी सर कधीच नव्हते त्यामुळे शाळेत असे काही अनुभव कधीच आले नाहीत. पण कॉलेजात असताना असे infatuations चे अनुभव बरेच आले. एखाद्या मुलाने अगदी मनापासून विचारले तरी ही मुस्लिम असल्याने मुर्खासारखे मी त्याला धुडकावून हि लावलेले आठविले . :-( कॉलेज मध्ये शेवटच्या वर्षी आमच्या वर्गातल्या चक्क ८ जोड्याचा विवाह संपन्न झाला . बहुतेकांनी फिल्मी श्टाईलमध्ये घरातून पळून जाऊन जाऊन लग्न केले होते. " उनके सर पें प्यार का भूत जो सवार था .." अन मग त्यांच्या लग्नात इतरांचे "क्या खयाल है ? हो जाए ???? " वाले लुक्स ही आठविले :-) जुन्या गोष्टी आठवून दिल्याबध्द्ल मनापासून धन्यवाद .. तू तुझी completely carried away होणारी मनाची अवस्था छान मांडली आहेस .
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 03/02/2011 - 13:07

In reply to सारे कळत, नकळत च घडते :-) by वाहीदा

Permalink

एखाद्या मुलाने अगदी मनापासून

एखाद्या मुलाने अगदी मनापासून विचारले तरी ही मुस्लिम असल्याने मुर्खासारखे मी त्याला धुडकावून हि लावलेले आठविले .
हे सगळे खोटे आहे :P
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Wed, 03/02/2011 - 13:09

In reply to एखाद्या मुलाने अगदी मनापासून by परिकथेतील राजकुमार

Permalink

हा !! हा! हा !

तूला रे काय माहित चोच्या ??
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 03/02/2011 - 13:20

In reply to हा !! हा! हा ! by वाहीदा

Permalink

तुला प्रपोज करण्यापेक्षा तो

तुला प्रपोज करण्यापेक्षा तो आत्महत्या करणे जास्ती पसंत करणार नाही का? ;) रोज भांडुन भांडुन जीव घेशील त्याचा.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 03/02/2011 - 13:23

In reply to तुला प्रपोज करण्यापेक्षा तो by परिकथेतील राजकुमार

Permalink

स्पा आपल्या पेक्षा थोरला आहे

स्पा आपल्या पेक्षा थोरला आहे काय रे पर्‍या ? :) -परेशां जिंदगी से मजा लुंगा
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Wed, 03/02/2011 - 13:32

In reply to तुला प्रपोज करण्यापेक्षा तो by परिकथेतील राजकुमार

Permalink

त्याचा जीवजाण्या आधी

त्याचा जीवजाण्या आधी तुझ्या कैफेत आणून सोडेन मग तू त्याला जीवदान दे हां :-) (आता उरले-सुरलेले विचार खरडवहीत व्यक्त करा, नाहीतर या धाग्याचे काश्मिर होईल )
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Wed, 03/02/2011 - 12:19

Permalink

मजा येईल वाचुन

मला तर आता शिक्शक म्हटले कि बार ची व तीनपत्ती क्लबाची आठवन होते.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Wed, 03/02/2011 - 12:20

Permalink

लै भारी. आम्हालाही आमच्या

लै भारी. आम्हालाही आमच्या चाबुकस्वार बाई आठवल्या!
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Wed, 03/02/2011 - 12:31

Permalink

मस्त लेख पियु, आवडला

मस्त लेख पियु, आवडला मनापासुन. >>>(हे बालिश विचार तेव्हाचे ,म्हणून भाषा तशीच वापरली आहे, गुरूंचे स्थान आदरणीय आहे )<<< हे पण आवडलं. :) शाळेत वगैरे असताना आपल्य टीर्चस बद्दल असा विचारपण करणे म्हणजे फार वाईट आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Wed, 03/02/2011 - 12:35

Permalink

हॅहॅहॅहॅहॅहॅ

हे पण आवडलं. शाळेत वगैरे असताना आपल्य टीर्चस बद्दल असा विचारपण करणे म्हणजे फार वाईट आहे. हा इनोद तर खुप आवडला. शाळेत असताना बर्‍याच पोरी पोराना भाव देत नाहित, त्याना समवयस्क पोर लिंबुटिंबु वाटतात. त्यामुळे त्याना शिक्षकाच्यावरच ज्यादा भरवसा वाटतो.
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Wed, 03/02/2011 - 12:39

In reply to हॅहॅहॅहॅहॅहॅ by वेताळ

Permalink

हॅहॅहॅहॅहॅहॅ सोल्लिड विनोद

हॅहॅहॅहॅहॅहॅ सोल्लिड विनोद करता "वेताळ्"साहेब
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Wed, 03/02/2011 - 12:48

In reply to हॅहॅहॅहॅहॅहॅ by वेताळ

Permalink

त्याना समवयस्क पोर लिंबुटिंबु वाटतात कारण

त्याना समवयस्क पोर लिंबुटिंबु वाटतात कारण मुलिंचे विचार मुलांपेक्षा उच्च असतात म्हणून त्यांच्या अपेक्षा ही उच्चच असतात ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 03/02/2011 - 12:53

In reply to त्याना समवयस्क पोर लिंबुटिंबु वाटतात कारण by वाहीदा

Permalink

=)) =)) आज काय विनोदाची लाट

=)) =)) आज काय विनोदाची लाट आलीये काय =)) - निच्च
  • Log in or register to post comments

Submitted by VINODBANKHELE on Wed, 03/02/2011 - 13:03

In reply to =)) =)) आज काय विनोदाची लाट by टारझन

Permalink

=)) =)) आज काय विनोदाची लाट

=)) =)) आज काय विनोदाची लाट आलीये काय =)) विनोद च आलाय........................... मज्जा करा........
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Wed, 03/02/2011 - 13:05

In reply to =)) =)) आज काय विनोदाची लाट by VINODBANKHELE

Permalink

लाटेच्या पल्याड काही लिहणार का ??

लाटेच्या पल्याड काही लिहणार का ?? का लाटेत वाहून जाणार ? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 03/02/2011 - 13:11

In reply to लाटेच्या पल्याड काही लिहणार का ?? by वाहीदा

Permalink

हो

हो .. लिहीणार ना ... चिऊ काउ च्या गोष्टी आणि प्रतिसाद =))) =)) =)) आपण ना गडे .. अस्सं करु .. आपण ना त्याला खुप रागवु .. अय्या गडे .. बय्या गडे ..
पिस्तुल से काट डालुंगा //`;`''''''''
आरारारारारा ... =)) =)) =)) काय डायलॉग आहे .. इथुन पुढे ह्याचे "एन " विडंबण पाडण्याचा विडा उचलतो =)) =)) जबरा .. - पिटीउषा घंटी से तंबोरा बजाऊंगा
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Wed, 03/02/2011 - 13:15

In reply to हो by टारझन

Permalink

अरे हलकटा

हॅ।अ‍ॅहॅहॅहॅहॅ तुला ही सही सुचली कशीरे?
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 03/02/2011 - 18:01

In reply to अरे हलकटा by वेताळ

Permalink

येका चित्रपटातला डायलॉग

येका चित्रपटातला डायलॉग आहे. कदाचित गोलमाल-२ मध्ये वसुली मारतो.
गन है चिर के रख दुंगा.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Wed, 03/02/2011 - 13:15

In reply to हो by टारझन

Permalink

अरे हलकटा

हॅ।अ‍ॅहॅहॅहॅहॅ तुला ही सही सुचली कशीरे?
  • Log in or register to post comments

Submitted by VINODBANKHELE on Wed, 03/02/2011 - 13:00

Permalink

आपले ते उदात्त

आपले ते उदात्त प्रेम.......................... आणि दुसर्याचे लफडे.................
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Wed, 03/02/2011 - 13:03

Permalink

मस्त ग आवल्डा लेख

मस्त ग आवल्डा लेख
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 03/02/2011 - 13:16

Permalink

उत्तम.. आवडले...

उत्तम.. आवडले...
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Wed, 03/02/2011 - 13:22

Permalink

अतिशय सुंदर लिहिले आहे..

अतिशय सुंदर लिहिले आहे.. वाचतच रहावे असे वाटते ... मन हळुच मागच्या काळाचा वेध घेते अआणि पुढील लिखान पियुषाचे नसुन आपलेच आहे असे वाटते .. भुतकाळतील पानेच आपल्या पुढे फडफड करतायेत असे वाटते
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 03/02/2011 - 13:27

In reply to अतिशय सुंदर लिहिले आहे.. by गणेशा

Permalink

मन हळुच मागच्या काळाचा वेध

मन हळुच मागच्या काळाचा वेध घेते अआणि पुढील लिखान पियुषाचे नसुन आपलेच आहे असे वाटते ..
काय गणेशा , आपण पण विणय सरांवर लाईन मारायचात काय ? अबब :) ऐकावे ते णवलच्चे :) - जांभय सर इतिहास के लेक्चर मे मॅथ्स लुंगा
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Wed, 03/02/2011 - 14:11

In reply to मन हळुच मागच्या काळाचा वेध by टारझन

Permalink

लिखान आपलेच आहे असे वाटते ..

लिखान आपलेच आहे असे वाटते .. म्हणजे तो काळ .. ती वर्गातील मस्ती .. सगळे तसेच असे बोलायचे होते .. आणि त्या मस्तीत आपल्याला ही कश्या मॅडम आवडायच्या ते ही आठवले .... ती मस्ती ते सगळे लिहिण्याची येथे गरजच पडली नाही यीतके ओघवते लिखान आहे , सर्वांना त्यांच्या भुतकाळात घेवुन जाणारे असा अर्थ होता .. आता येव्हडे लिहिताना चुकुन आले असतील काही शब्द कमी तर चु.भु.दे.घे. अवांतर एक उदाहरण : आता तुम्ही तुमचा अल्बम पाहत आठवणी काढत बसला आहे हे वाचल्यावर , आम्हाला पण असेच वाटते एकदम माझ्या मनातील लेख असा रिप्लाय दिला. तर आम्ही ही असेच अल्बम पाहुन आठवणीत रमुन जातो असा अर्थ होतो .. ना की आम्ही पण तुमचा अल्बम पाहुन आठवणीत हरवतो एकदम मनातलेच बोलला असा अर्थ लावु नये असे वाटते .
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 03/02/2011 - 13:24

Permalink

तुम्ही

शाळेत गेला होतात तर... ब्वॉर्रर्र.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Wed, 03/02/2011 - 14:02

In reply to तुम्ही by अवलिया

Permalink

शाळेत गेला होतात तर...

शाळेत गेला होतात तर... ब्वॉर्रर्र. >>> =)) =)) हाण्ण !!
  • Log in or register to post comments

Submitted by कच्ची कैरी on Wed, 03/02/2011 - 13:42

Permalink

हे पियु

हे पियु तुस्सी तो छा गये ! तुझ्या विनय सरांची गोष्ट वाचुन आमचे केमिस्ट्रीचे सोनवने सर आठवले मला ते अजिबातच आवडत नव्हतेभोकर्या डोळ्यांचे !(गुरुंचे स्थान आदरणीय आहेच पण त्यांचे एक विशेषण सांगितले )पण बाकी वर्गातल्या मुली नेहमी त्यांच्याच गप्पा करत असायच्या ,त्यांना पुन्हा पुन्हा काहीतरी अडचणी विचारायला जायच्या पण हे सगळ आम्ही अकरावीत असतांना मग आम्ही १२ वीत गेल्यावर त्यांचे लग्न झाले आणि सगळ्यांना अडचणी येण बंद झाल .
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 03/02/2011 - 13:44

In reply to हे पियु by कच्ची कैरी

Permalink

आम्ही १२ वीत गेल्यावर त्यांचे

आम्ही १२ वीत गेल्यावर त्यांचे लग्न झाले आणि सगळ्यांना अडचणी येण बंद झाल . बापरे !
  • Log in or register to post comments

Submitted by मी ऋचा on Wed, 03/02/2011 - 13:56

In reply to आम्ही १२ वीत गेल्यावर त्यांचे by अवलिया

Permalink

))))))) )))भावना पोचल्या! @

:)))))))) :))))भावना पोचल्या! @ कच्ची कैरी : ताई जरा सपश्ट लिवा की
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 03/02/2011 - 15:01

In reply to ))))))) )))भावना पोचल्या! @ by मी ऋचा

Permalink

प्रेषक अवलिया दिनांक Wed,

प्रेषक अवलिया दिनांक Wed, 02/03/2011 - 13:44. आम्ही १२ वीत गेल्यावर त्यांचे लग्न झाले आणि सगळ्यांना अडचणी येण बंद झाल . बापरे !
अरे अरे अरे ... विवेकानंद .. रामानंद .. सच्चिदानंद .. . देवानंद .. काय आहे हे ? मिपाचा प्रगल्भ महिलावर्ग अशा अडचणी उघड्यावर सांगायला लागला .. हे पाहुन "गैरसोय " झाली .. आवरा !! वर परत खालचा खुलासा पाहुन " मी नाही त्यातली आणि अडचण बंद झाली " ही म्हण आठवली नाही तर नवलंच !! - अडचणींवर मात कर डालुंगा
  • Log in or register to post comments

Submitted by कच्ची कैरी on Wed, 03/02/2011 - 17:28

In reply to प्रेषक अवलिया दिनांक Wed, by टारझन

Permalink

बायल्या

ए बायल्या गडु कशाला उगाच बायकांमध्ये तुझे नकटे नाक खुपसतो आहेस रे !नोज खुप्सेकर कुठला !
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Wed, 03/02/2011 - 14:08

In reply to आम्ही १२ वीत गेल्यावर त्यांचे by अवलिया

Permalink

नाना,

कसला हलकट्ट आहेस .. नको ते विचार कसे काय तुझ्या मनात येतात ??
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com