पहिला पहिला क्रश ......
पहिला पहिला क्रश ......
प्रत्येकाच्या आयुष्यात हा दिवस येत्तोच (अपवाद वगळता)
आमच्याही आयुष्यात हा दिवस तसा जरा लवकरच आला असेच म्हणावे लागेल .
त्यावेळी मी नववीत असेन ,आमच्या धिंगाणेबाज कंपूत आम्ही ५-६ मुली होतो आमच्या वर्गात दोन मॉनिटर होते एक मुलांचा ,आणि एक मुलींची ,(ती मी होते )
त्यामुळे काही मुली माझ्यावर नेहमी खार खाऊनच असायच्या
वर्ष संपत आले होते जवळ जवळ, पण ग्रुप मधल्या काही मुलीन मधला बदल थोडा उशिराच लक्षात आला माझ्या !
म्हणजे तमुक तमुक मुलगा दिसला कि चोरून चोरून स्मैलींची देवाणघेवाण.......
चोरून चोरून चिठ्या - चपट्या, गाणी गुणगुणन, ...
(मुलींसाठी )सक्तीची दोन वेण्या आणि काळी रिबीन असताना हि कधीकधी पोनी बांधन, दोन चार केसांची बट मुद्दाम गालावर रुळवन, आणि म्याड्मचे वेणी का नाही घातली ? म्हणून बोलणे खाण.....
आणि विशेष ज्यां -ज्यां कबुतरांच्या जोड्या जमल्या होत्या ती टाळकी आम्हाला नेहमी टाळायचे ......खेळायला पण आणि अभ्यासाला पण .....
गम्मत अशी कि ज्या मुलींशी आमची खुन्नस होती त्या बाकी मला जरा टरकायाच्या जरा नरमाईने वागायच्या ...
(मी कधी त्यांच्या घरी पचकले (त्यांच्या प्रेमप्रकरणावर )तर नसती पंचाईत !म्हणून बहुतेक )
मला आणि कपूला (कल्पिता ) इंटरेस्ट, त्याना चिडवण्यात वाटायचा
वर्गाच्या खिडकी जवळच बेंच होता आमचा ,बाहेर येणारे जाणारे आणि विशेष आत डोकावणारे या सर्वावर आमचा डोळा असायचा
" ए गौरे......................देखो तेरा शाहरुख जा .... रहा हे हे हे ....
हि हि हि हु हु हु ...
गौरी लगेच बद्कासारखी मान उंचावून पहायची ...........
काय पण सोल्लिड मजा यायची
त्यांना चिडवायला .........
शाळेच्या रस्त्यावरच एका छोटस कॅन्टीन होत आणि त्या शेजारीच एक मावा(मटका) कुल्फी , सरबत ,रॉयल कुल्फीची गाडी लागलेली असायची भर दुपारी उन्हात मावा कुल्फी खाणे म्हणजे अहा अहा सारा थकवा पळून जायचा ......पण सध्या आम्हाला फुकट मध्ये मावा कुल्फी मिळायची कारण ओळखीची एक दोन कबुतरांची जोडी तिथे लुडबुडत असायची आणि आम्ही त्यांना पाहिलं हे
(त्यांच्या मुद्दाम लक्षात आणून द्यायचं )
लक्षात आल कि लगेच आम्हाला फुकटात कुल्फी नाहीतर सरबत फ्री फ्री फ्री ......................
नंतर स्पोर्ट days आले
आम्ही रनिंग मध्ये भाग घेतला होता नेमकी जिंकायच्या बेतात असताना मध्येच माझा टांगा कल्टी झाला बाकीच्या म्याडम धावत आल्या त्यांनी मला हाताला धरून साईडला घेतले ,पाणी पाजले, आणी त्यात ते पण होते विनय सर ......
आमच्या फुटलेल्या ढोपराणा त्यांनी हळुवार मलम लावले आणि तिथून पुढे......... माझ आयुष्य काही दिवसासाठी प्रेमाच्या झोक्यावर बसून हिंदोळ्या खाऊ लागल
मला काय झाल हे मलाच समजत नव्हत न अभ्यासात मन लागेना ना खेळण्यात
मला पण अचानक प्रेमाचा साक्षात्कार झाला होता ...
आणि तो हि आमच्या विनय सरांवर (अरे बाप रे)
विनय सर , २४-२५ वर्षाचे ,जोग्रोफी शिकवायचे ,गोरा रंग ,कुरळे केस ,नाजूकसा चष्मा , बोलणे हि अगदी मृदू !
(त्यामुळ मुली फार मरायच्या त्यांच्यावर ,आणि मुल जळायचे त्यांच्यावर )
वर्गात आले कि पहिला सुविचार वाचणार (लिहिणारी मीच ) ...मग तासाला सुरुवात ....
शिकवण पण कित्ती छान ,मधेच एखाददुसरा विनोद करून सर्वाना हसवणार मधेच एखाद्या झोपाळू ला टपली मारणार
त्यांना त्यांची खुर्ची नेहमी स्वच्छ हवी असे ,एकदा त्यावर धूळ दिसली तर त्यांनी " बोरसे (मुलांचा monitar ) ला बोलावले
"ये बोरसे ये खुर्चीवर बैस ...लाजू नको बैस बैस ....त्याला सुरुवातीला काही कळलेच नाही सर का अस म्हणताय ?
तो लाजत लाजत खुर्चीवर बसला आणि त्याची प्यांट
मागून खडूच्या धुळीन पांढरी झाली तेव्हा सर्व वर्गात हास्याचे तुषार उडाले होते
बिचारा ..........
सर ;-"बोरसे समजले ना तुला काय ते ?" उद्यापासून धूळ दिसली नाही पाहिजे ओके ...monitar ना तू?
त्यांच्या अश्या गमती -जमती मूळ हसून हसून वाट लागायची
त्यांचा तास संपूच नये असे वाटायचे मला !
आता रोज सकाळी आम्हाला " खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम अर्पावे ", " "शेजार्यावर प्रेम करा" "
"तुम्ही जेवढे प्रेम जगाला द्याल ,त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळेल"
हेच सुविचार आठवायचे
सगळ्यां जोडप्यांना चीडवणारी मी आता मला त्यांची अवस्था समजत होती...........
मला कुठलाही पिक्चर पहिला कि विनय सरच हिरो म्हणून दिसायचे भले तो, सलमान असो कि शाहरुख .....
मन अगदी पिसासारख अलगद, " कभी इस क्लास में, कभी उस क्लास मे" त्यांना शोधायचं
ते दिसले कि पाहून गोड हसायचं, ते पण हसायचे ........
वर्गात त्याचंपण सारख पियू आज सुविचार छान लिहिला ,अक्षर छान आहे तुझ !
"तू टेस्ट मध्ये छान स्कोर केला ह ! कीप इट up गुड ........"
आमची स्वारी एकदम हवेत ..................
असेच आमचे आयुष्यातले मोरपिसा सारखे सुंदर दिवस मजेत चालले होते
होते पण पण
अचानक तो दिवस आला ....
"पियू जरा इकडे ये ....काय सर '"
सर ; -आग त्या प्रभा म्याडम बरेच दिवस झाले आजारी आहेत त्यांना भेटलीस का तू ?
(मी अन तिला भेटेन अशक्य ! एक नंबरची खडूस,पण ह्यांना काय पडलाय तीच )
मी ;नाही हो सर, का?
सर : तुला माहित आहे त्या कुठ राहतात?
(डोम्बल तुमच कशाला भेटताय ? दाल मे कुच्छ काला तो नही)
मी ; अज्जिबात माहिती नाही हो सर मला त्या कुठ राहत्तात!
सर ; होका जाऊदे अग मला कुणीतरी सांगितलं कि पियू त्यांच्या घरी
डान्स प्र्याक्टीस ला जायची म्हणून सहज विचारलं !(कुणी काडया केल्या कुणास ठाऊक )
शाळा सुटली तरी तेच विचार
विनय सर कशाला चालले तिकडे मरायला नसता खुराक डोक्याला माझ्या .........
दुसर्या दिवशी सकाळी सकाळी आधी विचारले "भेटले का हो सर प्रभा म्याडम्ला......"
सर ; नाही ग वेळ नाही मिळाला आणि तश्यापण त्या आल्या आहेत शाळेत आज !
हो क्का (हुष श .......................बर झाल )मरून दे ..
आम्हाला अस सुखी बघन देवाला खटकल जाने
आम्हाला चिकन pox (कांजण्या )झाल्या आणि सर्व चेहरा भर पसरल्या
डॉक्टरांनी त्या बर्या होई पर्यंत शाळेत जाऊ नको ह !नाहीतर दुसर्यानाही होतील असा प्रेमळ सल्ला दिला
म्हणजे काय १०-१५ दिवस घरी .....नही............बोंबला...............
कांजण्या पेक्षा विनय सर दिसणार नाहीत भेटणार नाहीत ह्या विचाराण गलबलून आल
एक एक दिवस कसा कसा गेला मला विचारू नका !
आणि शेवटी तो दिवस आला आणि आम्ही सायकलवरून शाळेकडे
प्रस्थान केले
८.१५ ची शाळा असून एरवी आम्ही ८.२५ पोहचून ग्राउंडला दोन राउंड मारायचो
आणि आज चक्क ८ ला पोहचून आम्ही विनय सरांची आतुरतेने वाट पाहत बसलो ........प्रार्थना झाली,वर्गात जाउन बसलो
सुदैव माझ पहिला तास भूगोलाचाच होता माझ सर्व लक्ष दाराकडे आत्ता येतील मग येतील १० मिनिट झाली ....
मध्येच सायन्स च्या म्याडम टपकल्या आणि सायन्सचा तास सुरु झाला
मी वेळापत्रक तीनदा चेक केले अरेच्या हे कस काय बुवा ?
मी कपुला कोपराने ढूसनी दिली " हे काय ग कपू म्याडम भणजाळली का ?
भूगोलाचा तास आहे ना?
काय ग विनय सर कुठाय ?
आले नाही का आज ? बर नाही का त्यांना ?
कपू हळूच ;"ए बावळे जस काय तुला माहितच नाहीं"
मी : आईशपथ सांग कि क्काय क्काय ?सांग न प्लीज ?
आग त्याचं लग्न झाल ५-६ दिवसापूर्वी प्रभा म्याड्मशी ...
क्काय ?कधी? कस? केव्हा ?
(कपू अक्ख्या वर्गाची नव्हे शाळेची जेम्स बोन्ड होती अस म्हटल तरी चालेल पट्ठीला सर्व खबरबात असायची )
"छुपे रुस्तुम होते दोघ पण, लव्ह म्यारेज केल त्यांनी आता १५ दिवस रजेवर!
हे ऐकून माझ्या डोक्यात हजार घण्टा वाजू लागल्या टन टन टन..........
"प्रभा sss ती दात फारुळी ,सश्यासारखे दोन दात पुढ आलेली खडूस, ती आवडली ?
क्काय पण चोइस आहे विनय सरांचा .....
कुठ विनय सर अन कुठ ती ? बाकीच्या मुली (मी ) मेल्या होत्या का ?
कपू ;" जाऊ दे ना ती म्हण आहे ना " दिल आया गधी............."अपनेको क्या फरक पडता हे ?
(फरक तो पडता हे भाई तुम नहीं समझोगी ")
"देवा तू मला ५ -६ वर्ष आधी जगात पाठवलं असत तर तुझ क्काय बिघडल असत का रे ?"
(हे बालिश विचार तेव्हाचे ,म्हणून भाषा तशीच वापरली आहे, गुरूंचे स्थान आदरणीय आहे ):)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे देखणे मास्तर...
मस्त!
क्रश आवडला.
छान
:)
१४ फेब्रु पेश्शल - प्रपोज कषे
उगी उगी बाळ उगी उगी
आम्हि कुनाला सल्ला मागितला
आम्ही बी
तुम्हीच विनय सर का हो?
हा हा हा.
अस पण असतय काय
पियुषा - छान आणि मस्त.
हा हा हा......
हा हा हा......
>>>> आता रोज सकाळी आम्हाला "
लेख व शैली आवडली..मजा आ गया
सारे कळत, नकळत च घडते :-)
एखाद्या मुलाने अगदी मनापासून
हा !! हा! हा !
तुला प्रपोज करण्यापेक्षा तो
स्पा आपल्या पेक्षा थोरला आहे
त्याचा जीवजाण्या आधी
मजा येईल वाचुन
लै भारी. आम्हालाही आमच्या
मस्त लेख पियु, आवडला
हॅहॅहॅहॅहॅहॅ
हॅहॅहॅहॅहॅहॅ सोल्लिड विनोद
त्याना समवयस्क पोर लिंबुटिंबु वाटतात कारण
=)) =)) आज काय विनोदाची लाट
=)) =)) आज काय विनोदाची लाट
लाटेच्या पल्याड काही लिहणार का ??
हो
अरे हलकटा
येका चित्रपटातला डायलॉग
अरे हलकटा
आपले ते उदात्त
मस्त ग आवल्डा लेख
उत्तम.. आवडले...
अतिशय सुंदर लिहिले आहे..
मन हळुच मागच्या काळाचा वेध
लिखान आपलेच आहे असे वाटते ..
तुम्ही
शाळेत गेला होतात तर...
हे पियु
आम्ही १२ वीत गेल्यावर त्यांचे
))))))) )))भावना पोचल्या! @
प्रेषक अवलिया दिनांक Wed,
बायल्या
नाना,