✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ओरिजिनल म्हणी

P
Pearl यांनी
Fri, 02/25/2011 - 10:01  ·  लेख
लेख
कालच मला १ इंटरेस्टिंग गोष्ट कळाली. (इंटरेस्टिंग ला तंतोतंत समानार्थी शब्द सुचवा. मला तरी आत्ता सुचत नाहिये :-/) आपण वर्षानुवर्षे वापरत असलेल्या २ म्हणींचे खरे रूप कळाले. त्या २ म्हणी आहेत, १) पुराणातली वांगी पुराणात २) अठरा विश्वे दारिद्र्य (लहानपणी ह्या म्हणींचा अर्थ मला खरेच कधी लागला नव्हता. नंतर मी तो लावून घेतला ;-)) पण या म्हणी अपभ्रंश झालेल्या म्हणी असून ओरिजिनल म्हणी अशा आहेत १) पुराणातली वानगी पुराणात (वानगी = दाखला, उदाहरण) २) अठरा विसे दारिद्र्य (याचा अर्थ असा आहे की १८ * २० = ३६०. म्हणजेच वर्षातले ३६५ पैकी ३६० दिवस दारिद्र्य, जेमतेम ५ दिवस खायला मिळते.) तुम्हालाही मराठी शब्द/म्हणी/वाक्प्रचार शी संबंधित अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी मराठी शब्द/म्हणी/वाक्प्रचार माहिती असतील तर शेअर करा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
43069 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

इंटरेस्टिंग ला तंतोतंत

अमोल केळकर
Fri, 02/25/2011 - 10:09 नवीन
इंटरेस्टिंग ला तंतोतंत समानार्थी शब्द सुचवा -- नाविन्यपुर्ण ????? ( जाणकार अधीक चांगला शब्द सुचवतील )
  • Log in or register to post comments

वांगी....!!

इन्द्र्राज पवार
Fri, 02/25/2011 - 10:12 नवीन
पर्ल.....फारच "इंटरेस्टिंग" विषय निवडला आहे तुम्ही इंटरेस्टिंग = वेधक, कुतूहलजनक वरील दोन उदाहरणातील क्रमांक २ चा उलगडा असाच एकदा शिक्षकांकडूनच झाला होता...पण 'वांगी' हे वांगी नसून वानगी आहे, हे भन्नाट आहे. पहिल्यांदाच समजले आणि वांग्याच्या भाजीचा आणि पुराणाचा काहीही संबंध नाही हेही उलगडले. पूर्वी (आणि आत्ताही बरेच...) आम्ही "त्याच्या अपरोक्ष ती घटना घडली..." असे म्हणत असू. म्हणजे ती 'घटना' त्याला ज्ञात नाही असा अर्थ गृहित धरला जायचा. पण तिथे खरे तर "परोक्ष" असे हवे. परोक्षचा अर्थ 'परक्याच्या नजरेसमोर ती घटना घडली..'. अपरोक्ष म्हणजे परक्याच्या नसून खुद्द त्याच्याच नजरेसमोर घटना घडली असे सूचीत होते. म्हणी आणि वाक्यप्रचारही पाहतो. इन्द्रा
  • Log in or register to post comments

हं!!! परोक्ष विषयी चांगली

शिल्पा ब
Fri, 02/25/2011 - 11:51 नवीन
हं!!! परोक्ष विषयी चांगली माहीती दिलीत..मला माहीत नव्हतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

मनोरंजक हा शब्द कसा वाटतो?

सुधीर काळे
Sat, 02/26/2011 - 15:26 नवीन
मनोरंजक हा शब्दही कांहीं संदर्भांत वापरता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

छान

प्रदीप
Fri, 02/25/2011 - 10:16 नवीन
माहिती. मला ह्या दोन्ही म्हणी चुकीच्या स्वरूपात माहिती होत्या ('पुराणातील वांगी पुराणात' आणि 'अठरा विश्वे दारिद्र्य' अशा!) 'इंटरेस्टिंग' ला अलिकडे 'रोचक' असा शब्द जालावर रूढ झालाय. हा शब्द पूर्वी मी कधीही ऐकला अथवा वाचला नव्हता. 'रंजक' असा शब्द सर्रास वापरात होता, पण तो 'इंटारेस्टिंग' चा शब्दशः अर्थ ध्वनित करीत नाही. 'नाविन्यपूर्ण' हे प्रयोजनही चुकिचे वाटते. (नाविन्यपूर्ण म्हणजे 'नॉव्हेल').
  • Log in or register to post comments

ह्म्म

लवंगी
Fri, 02/25/2011 - 10:17 नवीन
ओरीजिनल म्हणींसाठी विजुभाऊंच्या 'http://www.misalpav.com/node/16907' धाग्यावरील प्रतिसाद वाचावे. "आंधळा दळतो आणि गणपा चिकन तंदुरी बनवतो " "भित्र्या पाठी ब्रम्हराक्षस आणि नाना पाठी संपादक " " काळ आला होता पण नळाला पाणी नव्हतं ! " "काखेत कळसा आणि गाई ला चश्मा " वगैरे बर्‍याच नाविन्यपुर्ण म्हणी वाचावयास मिळतील.. अधिक 'नाविन्यपुर्ण' म्हणींसाठी टारुबाळास सम्पर्क करावा..
  • Log in or register to post comments

नाविन्यपुर्ण म्हणी आणि टारगट प्रतिसाद वाचला :-)

Pearl
Fri, 02/25/2011 - 10:58 नवीन
'http://www.misalpav.com/node/16907#comment-290827' हे वाचले. नाविन्यपुर्ण म्हणी आणि टारगट प्रतिसाद वाचला :-) हा हा हा :-) खरच ह. ह. पु. वा. =))) लिन्क दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी

आण़खि एक

जय - गणेश
Fri, 02/25/2011 - 10:23 नवीन
कावल्याच्या शापाने गाय मरत नसते
  • Log in or register to post comments

कोण कावल्या??

असुर
Fri, 02/25/2011 - 16:50 नवीन
कोण कावल्या?? धन्यवाद!! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जय - गणेश

कूनीबी कावून शाप दीला त गायि न्हाई मरत

आत्मशून्य
Fri, 02/25/2011 - 20:56 नवीन
असे म्हणायचे असावे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

खुलासा

पंगा
Fri, 02/25/2011 - 21:08 नवीन
त्यांना बहुधा "'काऊ'च्या शापाने cow मरत नसते" असे म्हणायचे असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

मस्त...

टुकुल
Fri, 02/25/2011 - 10:27 नवीन
नवीन माहीती मिळाली.. --टुकुल
  • Log in or register to post comments

इंटरेस्टिंग

अमित देवधर
Fri, 02/25/2011 - 10:47 नवीन
चांगला विषय आहे. यातून नवीन शब्दनिर्मिती व्हायला हवी. अनेक जुने चांगले शब्दही, जे वापरात नाहीत त्यांचं पुनरूज्जीवनही करायला हरकत नाही या निमित्ताने. आणि मग ते शब्द आपण दैनंदिन भाषेत वापरायला हवेत. 'इंटरेस्टिंग'ला 'रोचक' (रूची~रोचक) हा समानार्थी शब्द बरोबर वाटतो. 'सरस' (स-रस~रसासहित/रस असलेली गोष्ट) हाही शब्द चालू शकेल. अमित.
  • Log in or register to post comments

सरस हा शब्द ईथे तुम्हाला

विकाल
Tue, 03/01/2011 - 18:47 नवीन
सरस हा शब्द ईथे तुम्हाला रसपुर्ण या अर्थाने वापरायचा आहे काय ?? सरस आपण तुलनात्मक रीतीने वापरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित देवधर

हलवायाच्या घरावर तुळशीपत्र या

मनीषा
Fri, 02/25/2011 - 10:54 नवीन
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र या म्हणीमागची कहाणी काय असावी ?
  • Log in or register to post comments

कोन नाय कुनाच..डाल भात

अविनाशकुलकर्णी
Fri, 02/25/2011 - 11:01 नवीन
कोन नाय कुनाच..डाल भात लोनच नदला कि तोदला..
  • Log in or register to post comments

झोपा चा अर्थ काय आहे?

Pearl
Fri, 02/25/2011 - 11:12 नवीन
१) 'बैल गेला नि झोपा केला' यातल्या 'झोपा' चा अर्थ काय आहे? २) 'अति शहाणा त्याचा बैल रिकामा' या मागची काय गोष्ट आहे?
  • Log in or register to post comments

वरील दोन्ही म्हणी तश्याच

गणेशा
Fri, 02/25/2011 - 11:13 नवीन
वरील दोन्ही म्हणी तश्याच माहिती होत्या मला. अर्थ सांगितल्यामुळे धन्यवाद. --- इंट्रेस्ट = आवड इंट्रेस्टींग = आवडयुक्त आपले साधे अर्थ ----- 'बैल गेला नि झोपा केला' हि म्हण पण कायम ऐकत होतो .. अर्थ माहित नाही .. पण कदाचीत बैलगाडी बैल गेल्यावर तशीच राहिली असेल म्हणुन त्याखाली लहान मुलांसाठी साडीची झोळी केली जाते म्हनुन अशी म्हण असेल ही कदाचीत ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

झोपा = गोठा असावं का?

Pearl
Fri, 02/25/2011 - 11:22 नवीन
झोपा = गोठा असा अर्थ आहे का? झोपा = गोठा असं कुठंतरी वाचल्यासारखं वाटत आहे. म्हणजे 'बैल गेला नि झोपा केला' चा असा अर्थ असावा की, बैल गेल्यावर (मेल्यावर) गोठा बांधून काय उपयोग? असा आपला १ अंदाज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

+१

स्पा
Fri, 02/25/2011 - 11:23 नवीन
हेच सांगणार होतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

हा हे योग्य वाटते आहे. कोणाला

गणेशा
Fri, 02/25/2011 - 11:33 नवीन
हा हे योग्य वाटते आहे. कोणाला तरी बोलताना .. त्याने बैल गेला आणि गोठा बांधला काय उपयोग ? असे बोलण्यासाठी हे वापरले असेन .. ---- मला तर वाटते ह्या जुनी म्हनी .. ओव्या यातुन खुप मोठे .. अर्थवादी शब्द छोट्याश्या वाक्यात सांगितलेले आहे. शब्द संपदा आणि त्यांचा वापर आधीच्या लोकांनी खुप छान केला आहे. त्यांची जान खरेच खुप मोठी होती ---- या धाग्यासारखाच रुढी-परंपरा आणि त्यांचे अर्थ याचा धागा सुद्धा होयील मस्त .. लगेच काढत नाही.. कॉपी वाटेल तो या धाग्याचा.. या धाग्या नंतर बघु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

बैल गेला नि झोपा केला

गणपा
Fri, 02/25/2011 - 13:04 नवीन
बैल गेला नि झोपा केला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

शंका

रमताराम
Sat, 02/26/2011 - 15:17 नवीन
ती म्हण 'बैल गेला नि खोपा केला' अशी असावी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

खरच जरा खटकायच्या या म्हणी

स्पंदना
Fri, 02/25/2011 - 11:03 नवीन
खरच जरा खटकायच्या या म्हणी म्हणताना पण इतक लक्ष द्यावस वाटल नव्हत. अठरा विस तर अगदीच चक्रावुन गेली . अतिशय चांगला विषय. निदान आत्ता तरी आम्ही जरा विचार करुन बाकिच्या म्हणी वापरु.
  • Log in or register to post comments

स्टेपलर ला मराठीत टाचणी टोचक

स्पा
Fri, 02/25/2011 - 11:16 नवीन
स्टेपलर ला मराठीत टाचणी टोचक असे म्हणतात काय? :D
  • Log in or register to post comments

छान विषय

कच्ची कैरी
Fri, 02/25/2011 - 11:26 नवीन
हे पर्ल मस्त विषय निवडला आहे .मला बर्याचश्या अहिराणी म्हणीही माहित आहेत पण त्यांचे अचुक अर्थ माहित नाहीत. @स्पा स्टॅपलरला टाचणी टोचक नाहीतर टाचणी खोचक म्हणत असावे कदाचित (स्मायली )
  • Log in or register to post comments

.

अमित देवधर
Fri, 02/25/2011 - 11:56 नवीन
.
  • Log in or register to post comments

टाचक

अमित देवधर
Fri, 02/25/2011 - 12:02 नवीन
'टाचणीटोचक' हा लांबलचक शब्द होइल. त्याचा 'टाचक (=टाचण क्रिया करणारा :))' असं सुटसुटीत छोटा शब्द होऊ शकेल.
  • Log in or register to post comments

>> २) अठरा विश्वे दारिद्र्य -

वारकरि रशियात
Fri, 02/25/2011 - 12:08 नवीन
>> २) अठरा विश्वे दारिद्र्य - २) अठरा विसे दारिद्र्य (याचा अर्थ असा आहे की १८ * २० = ३६०. म्हणजेच वर्षातले ३६५ पैकी ३६० दिवस दारिद्र्य, जेमतेम ५ दिवस खायला मिळते.) अ)पूर्वी व्यवहारात सर्वसाधारण लोक वीसाच्या पटीत गणन करीत - दहा हाताची व दहा पायांची मिळुन वीस बोटे मोजायला सोपी जात असावीत कां! ब) या गणितात ३६० = पूर्ण वर्ष असेच अभिप्रेत आहे. (१२*३० चांद्रवर्ष. म्हणजे आजच्या भाषेत २४*७ किंवा dayin-dayout सतत / कायमचे >> १) 'बैल गेला नि झोपा केला' यातल्या 'झोपा' चा अर्थ काय आहे? अ) 'झोपा' म्हणजे गोठ्याचे दार असे (समजले होते असे)वाटते. बाकी तज्ञ / जाणकारांनी भर घालावी / दुरुस्ती सुचवावी. मलाही ठाऊक असल्यास लिहीनच.
  • Log in or register to post comments

'बैल (पळून) गेला नि झोपा (दार) केला'

जोशी
Fri, 02/25/2011 - 20:48 नवीन
अ) 'झोपा' म्हणजे गोठ्याचे दार असे (समजले होते असे)वाटते. हे बरोबर वाटते, 'बैल (पळून) गेला नि झोपा (दार) केला' बैल पळून गेल्यावर दाराचा काय उपयोग ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारकरि रशियात

खालील म्हणीं/वाक्प्रचारांच्या मागचे logic/ कहाणी गोष्ट काय आहे

Pearl
Fri, 02/25/2011 - 12:15 नवीन
खालील म्हणीं/वाक्प्रचारांच्या मागचे logic/ कहाणी गोष्ट काय आहे/असावी? म्हणजे अर्थ माहिती असतो आपल्याला पण गोष्ट माहिती नसते. १) मूग गिळणे २) वाटाण्याच्या अक्षता लावणे ३) कानामागून येऊन तिखट होणे ४) आकशाला गवसणी घालणे (यात गवसणी म्हणजे काय?) ५)पहिले पाढे पंच्चावन्न ६)म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो ७) रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी (यात तुंबड्या म्हणजे काय?) ८) साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण ९) साप म्हणू नये धाकला, नवरा म्हणू नये आपला (म्हणजे काय ?;-) कळलं नाही :-( ) १०) अति शहाणा त्याचा बैल रिकामा ११) नाकाने कांदे सोलणे (मला याचा अर्थ पण फारसा माहिती नाही) १२) पडत्या फळाची आज्ञा (म्हणजे काय ) विषयाशी संबंधित थोडे अवांतर :-) : हया लिन्क वर बराच म्हणी संग्रह पाहिला. बर्‍याच नविन म्हणी कळाल्या. http://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%80
  • Log in or register to post comments

>>कानामागून येऊन तिखट

नगरीनिरंजन
Fri, 02/25/2011 - 12:59 नवीन
>>कानामागून येऊन तिखट होणे याची मूळ म्हण पानामागून आली आणि तिखट झाली अशी आहे. पोर्तुगीज यायच्या आधी आपल्याकडे मिरची नव्हती. मिरीचा वापर तिखट म्हणून केला जायचा. मिरची झाडावर पानामागे लपलेली असते आणि ती आल्यावर ती इतकी झपाट्याने लोकप्रिय झाली म्हणून "पानामागून आली आणि तिखट झाली" अशी म्हण पडली असे वाटते. >>आकशाला गवसणी घालणे गवसणी म्हणजे खोळ. तंबोर्‍याला किंवा उशीला घालतात ती गवसणी. >>रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी तुंबड्या म्हणजे जळवा. >> पडत्या फळाची आज्ञा अशोकवनात सीतेची भेट झाल्यावर हनुमानाला भूक लागली. सीतेने त्याला फक्त खाली पडलेली फळे खाण्याची आज्ञा केली. म्हणून हनुमानाने सगळी झाडं गदागदा हलवून फळं खाली पाडली आणि अशोकवाटिकेचा विध्वंस केला. त्यावरून ही म्हण आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

वा ! ननि . बरीच माहिती दिलीत.

स्पंदना
Fri, 02/25/2011 - 14:15 नवीन
वा ! ननि . बरीच माहिती दिलीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

धन्यवाद

Pearl
Fri, 02/25/2011 - 15:24 नवीन
धन्यवाद नगरीनिरंजन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

>>९) साप म्हणू नये धाकला,

गणेशा
Fri, 02/25/2011 - 14:12 नवीन
>>९) साप म्हणू नये धाकला, नवरा म्हणू नये आपला (म्हणजे काय ? कळलं नाही ) सापाला लहान समजु नये , आणि नवर्‍यावर विश्वास ठेवु नये कधी दगा देतील सांगता येत नाही असा अर्थ होतो आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

इ॑टरेस्टि॑ग

kamalakant samant
Fri, 02/25/2011 - 12:26 नवीन
इ॑टरेस्टि॑ग=औत्सुक्यपूर्ण म्हणी॑बद्दल बरेच काही लिहीता येइल. ट॑कायचा क॑टाळा आड येतो.
  • Log in or register to post comments

वा नविन माहिती

मनराव
Fri, 02/25/2011 - 12:34 नवीन
वा नविन माहिती मिळाली....... वड्याचं तेल वांग्यावर........ या मागची गोष्ट काय असेल.............??
  • Log in or register to post comments

म्हायत्येय काय..

कवितानागेश
Fri, 02/25/2011 - 12:46 नवीन
'पंचिंग मशीन' ला भोकायंत्र म्हणतात..... आमच्यात! ;)
  • Log in or register to post comments

) ) ) भन्नाट आयडिया!!

मी ऋचा
Fri, 02/25/2011 - 16:56 नवीन
:)) :)) :)) भन्नाट आयडिया!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

हे दोन पैसे माझ्या कडुन.

गणपा
Fri, 02/25/2011 - 13:02 नवीन
हे दोन पैसे माझ्या कडुन.
  • Log in or register to post comments

इंटरेस्टींगला शुद्ध मराठीत

Nile
Fri, 02/25/2011 - 13:06 नवीन
इंटरेस्टींगला शुद्ध मराठीत इंटरेस्टींगच म्हणतात. स्टेपलरला शुद्ध मराठीत स्टेपलरच म्हणतात. कुणाला या बाबत तक्रार करायची असेल तर गुंडोपंतांना संपर्क करणे.
  • Log in or register to post comments

कथा वाचलेल्या..

योगप्रभू
Fri, 02/25/2011 - 13:55 नवीन
पुराणातील वांगी पुराणात एक पुराणिकबुवा होते. मोठे रसाळ कीर्तन करायचे. लोक भक्तीभावाने त्यांचे आख्यान ऐकायचे. गावातले सगळे लोक त्यांना नावाजायचे. पण पुराणिकबुवांची बायको कधीही नवर्‍याच्या प्रवचनाला गेलेली नव्हती. ती आपली घरकामात असायची. एकदा पाणवठ्यावर तिला इतर बायका म्हणल्या, 'अगं तुझा नवरा इतका छान पुराण सांगतो. तू का नाही ऐकायला येत?' म्हणून मग पुराणिकबाई एकदा गेल्याच. नेमके त्या दिवशी पुराणिकबुवा चातुर्मासातील आहारावर निरुपण करत होते. कांदा, लसूण हे विकार उत्पन्न करणारे असल्याने खाऊ नयेत आणि वांगे वातुळ असल्याने खाऊ नये, असे सांगताना बुवांनी पुराणातल्या कथांचा हवाला दिला. सगळ्यांना ते पटले. पुराणिकबाई मात्र मनात खंतावल्या कारण त्यांनी नेमकी त्याच दिवशी बुवांच्या आवडीची भरली वांगी केली होती. घरी आल्यावर बाई ती वांगी फेकून द्यायला निघाल्या. बुवांनी विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, 'तुम्हीच म्हणालात ना वांगी खाऊ नयेत म्हणून टाकून देते आहे.' त्यावर बुवा म्हणाले, 'अगं वेडी का काय? ती पुराणातली वांगी पुराणात. रोजच्या आयुष्यात तसे पाळून कसे चालेल?' भित्यापाठी ब्रह्मराक्षस एक गरीबीला कंटाळलेला माणूस आत्महत्या करायच्या उद्देशाने जंगलात गेला. वास्तविक तो घाबरट होता. तो एका झाडाला टेकून बसला आणि स्वतःच्या गरीबीला दोष देऊ लागला. म्हणाला, 'देवा काय वेळ आणलीस? पोटभर खायला तरी मिळू देत.' योगायोगाने तो ज्या वृक्षाला टेकून बसला होता तो इच्छावृक्ष होता. म्हणजे मनातील इच्छा पूर्ण करणारा. त्या माणसाच्या समोर सुग्रास भोजन आले. त्याने ते खाल्ले आणि म्हणाला, 'जेवण मिळाले, पण लोकांची देणी कशी देऊ? काही धन मिळाले तर बरे' त्याबरोबर त्याच्या समोर एक सुवर्णनाण्यांनी भरलेली थैली येऊन पडली. ती बघताच त्या माणसाच्या मनात स्वभावानुसार भीती दाटून आली. तो मनात म्हणाला, 'या झाडावर एखादा ब्रह्मराक्षस तर नसेल ना?' लगेच एक अक्राळविक्राळ ब्रह्मराक्षस समोर हजर झाला. त्याला पाहताच हा माणूस मनात म्हटला, 'अरे बापरे! हा आता मला खाणार तर नाही ना?' त्याबरोबर त्या राक्षसाने त्याला खाऊन टाकले. रिकामा न्हावी, कुडाला तुंबड्या लावी एका गावात एक न्हावी होता. गाव लहान आणि न्हाव्याला रोज काम नसल्याने तो रिकामटेकडाच होता. त्याचा बराचसा वेळ कलागती लावण्यात आणि चुगल्या करण्यात जाई. रिकामे मन असल्याने त्यात सतत दुसर्‍याला त्रास कसा देता येईल, याच्या कल्पना. गावाला या न्हाव्याचा स्वभाव ठाऊक असल्याने कुणी त्याच्या जवळपास फिरकत नसे. न्हावीपण झोपडीत एकटा राहात असे. होता होता एक दिवस न्हावी म्हातारा झाला. गावाने वाळीत टाकल्याचा राग धरुन तो मनात म्हणाला, 'मेल्यावर पण या गावातल्या लोकांना चांगलाच धडा शिकवीने' म्हणून तो कुडाला (भिंतीला) तुंबडी (पोट) लाऊन आणि पाय मागे असा गुढघ्यावर बसला आणि त्याच अवस्थेत मेला. गावातील लोक आले तोवर न्हाव्याचे शरीर लाकडासारखे कडक झाले होते. आता आली का पंचाईत? तिरडीवर धड पाठीवर निजवता येत नाही आणि सरळ ठेवला तर तो उठून बसल्याच्या अवस्थेत' गावातले लोक हैराण झाले आणि अखेर म्हणाले, 'रिकामा न्हावी, कुडाला तुंबडी लावी'
  • Log in or register to post comments

हसु पण आले आणी न्यानात वाड पन

वपाडाव
Fri, 02/25/2011 - 14:40 नवीन
हसु पण आले आणी न्यानात वाड पन झाली. बेष..शान..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

घोड्यासोबत नाळंची यात्रा

वपाडाव
Fri, 02/25/2011 - 15:51 नवीन
http://www.misalpav.com/node/1770#comment-24780 इथे प्रा सुरेश खेडकर यांनी ही "गाड्या बरोबर नळ्याची यात्रा" म्हण आणी तिची दास्तॉ सांगितली. पण मी जे ऐकलंय ते काही वेगळं आहे. म्हणजे गाडीशी नाही तर तिचा संबंध घोड्याशी आहे. घोडा जेव्हा पळु लागतो, त्यावेळी त्याच्या पायात, म्हणजेच टाचेत/खुरांत लोखंडाची एक पट्टी रोवली जाते. ती 'U' आकाराची असते. तिला नाळ असे संबोधतात. आणी पुर्वीच्या काळी जेव्हा घोडे घेउन लोक यात्रेला जायचे त्यावेळी, घोड्यासोबत नाळंची यात्रा अशी म्हण रुढ झाली.
  • Log in or register to post comments

मला वाटत "नाल" हा शब्द योग्य असावा

सुत्रधार
Sat, 02/26/2011 - 16:51 नवीन
"नाळ" चा अर्थ वेगळा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

पहिली म्हण (ओरिजिनल - मुळ)

तुषार घवी
Fri, 02/25/2011 - 16:45 नवीन
पहिली म्हण (ओरिजिनल - मुळ) महित होती, परन्तु दुसरीच अर्थ आजच समजला. तशी "हातभर गजरा न गावभर नजरा" ही म्हण ही उदाहरण देताना चान्गली वाटते.
  • Log in or register to post comments

हातभर गजरा न गावभर नजरा ही

वपाडाव
Fri, 02/25/2011 - 17:03 नवीन
हातभर गजरा न गावभर नजरा
ही म्हण एका चित्रपटात मकरंद अनासपुरेच्या त्वंडुन ऐकली होती. पार यड्यागत हसलो होतो. भारी. अशी रियल लाईफ उदाहरणं लै फाईली हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार घवी

हे पहा

विकास
Fri, 02/25/2011 - 17:11 नवीन
येथे आधीपण या दुवा दिला होता. या संदर्भातील १८९९ साली रेव्हरंड मन्वेरींग नामक मिशनर्‍याने संकलीत केलेले हे पुस्तक वाचनीय आहे. अनेक म्हणींचे शब्द वेगळेच दिसतील.... [अवांतरः एखाद्या समाजात मार्केटींग करायचे असेल तर त्यासाठी त्या समाजाला समजून घेणे महत्वाचे असते. धर्मांतर हे देखील एक मार्केटींगच आहे. त्यासाठी किती मुलभूत अभ्यास केलेला असू शकतो ह्याची ह्यावरून कल्पना येईल. ]
  • Log in or register to post comments

जरा नवीन

मी ऋचा
Fri, 02/25/2011 - 17:11 नवीन
मला प्रचंड आवडलेली म्हण >> घरात नाही गहू अन म्हणे कलर टीव्ही घेउ सौजन्यः जितेंद्र जोशी (चित्रपट: हाय काय नाय काय)
  • Log in or register to post comments

व्हर्जिनल म्हण..

वपाडाव
Mon, 02/28/2011 - 14:17 नवीन
त्याचं खरं स्वरूप असं आहे.. घर मे नै जवारी , अम्मा पुर्या (पुरियाँ) पकारी !
-मी असा कसा, असा कसा वेगळा-वेगळा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा