Skip to main content

मुली / स्रिया असण्याचे फायदे!

लेखक प्रगती यांनी गुरुवार, 12/06/2008 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
काय ? विषय वाचून दचकलात का? अहो ,दचकू नका मला माहीत आहे मुली / स्रिया असण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे ही आहेत पण आज आपण फायदे बघुया. प्रत्येकाला कधी ना कधी काही ना काही चांगले, वाईट अनुभव आले असतील तर चला करुया सुरुवात. शनिवारची गोष्ट आहे, शनिवारी संध्या़काळी मी "सॅर्टरडे क्लब ठाणे" ( मराठी व्यावसायि़कांची सभा ) येथे माझ्या दुचाकीवरुन चालले होते, डोक्यावर हेल्मेट नाही , तोंडावर अतिरेकी गुंडाळतात तसा स्कार्फ गुंडाळला होता, अंमळ उशीरच झाला होता म्हणून गाडी वेगात चालली होती आणि अचानक लाल सिग्नल लागललेला माझ्या लक्षात आलं नाही आणि मी सिग्नल तोडला , मागून मला ट्रॅफिक हवालदारच्या शिट्टीचा आवाज आला मी गाडी मागे वळवली (स्वगतः आलीया भोगासी असावे सादर) मनातल्या मनात म्हटलं आता किती पैशाची काशी होणार कोणास ठाउक :| कारण एकतर सिग्नल तोडला होता + हेल्मेट घातलं नव्हतं, मी गाडीवरुन खाली उतरले साहेबांना एक छानसं स्माईल दिलं :) , साहेबांनी सिग्नल तोडल्याचं कारण विचारलं मी त्यांना चूक झाली म्हणून सांगितलं आजुबाजुचे बघे मनातल्या मनात म्हणत असतील चला साहेबांना एक बकरा सॉरी बकरी मिळाली /:) आणि अहो आश्चर्य साहेबांनी मला काही दंड न करता जा म्हणून सांगितलं ;;)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 27507
प्रतिक्रिया 85

प्रतिक्रिया

ह्म्म्म बरोबर!! माझ्या ओळखीची १ होती ती पण अगदी अश्शीच होती दुसर्‍याच्या जीवारव फार उड्या मारायची आणि काम झाला की "तू कोण आणि मी कोण" .. आवांतर : मला हे कळत नाही पोरं पण अशा पोरींकडे कशी फसतात? तोंडावरुन कळतं कोण कसं आहे ते ..... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ऋचा

>>आवांतर : मला हे कळत नाही पोरं पण अशा पोरींकडे कशी फसतात? तोंडावरुन कळतं कोण कसं आहे ते ..... त्याकरिता पुरुषाचाच जन्म हवा :)

म्हणतो ;)

पुरुष फसत वगैरे नाहीत. त्यांना बरोबर माहित असत की अश्या मुलींकडून त्यांनाही सवलती मिळतात, ज्या सरळ आणि रोखठोक वागणार्‍या मुलींकडून मिळण शक्य नसत!! म्हणून ते अश्या मुलींच्या मागे धावण पसंत करतात, आणि वरुन कांगावाही करतात!! असं आपल मला वाटत... दोघेही एकमेकांकडून सवलती उकळतात!!

हो ना पण दोघांच्या सवलतीत किती तरी फरक आहे ;) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

सदरहु काथ्याकुट हा केवळ "मुली / स्रिया असण्याचे फायदे!" (पर्यायाने पुरुषांचे होणारे तोटे) असल्याने पुरुषांच्या फायद्याबाबत भाष्य करणे चुकीचे नाही का? :) (अखिल जागतिक मिपा पुरुष मुक्ती मोर्चाचा संस्थापक) टिंग्या ;)

टिंगीजी, पण त्या सगळ्या एकाच नाण्याच्या अनेक बाजू आहेत, त्याचे काय!! :)

In reply to by यशोधरा

त्याकरिता आपण दुसरा धागा सुरु करुयात्.....कसे :) किंबहुना तुम्हीच सुरु करा नवीन धागा :)

फारच सुबक , लक्षवेधी आणि मन गुंतवून टाकणारी विलक्षण चर्चा... आता त्या दुसर्‍या पुरुषांच्या फायद्याबद्दलच्या चर्चेची वाट पाहतोय.... ... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

"मला तर कधी ट्रॅफीक पोलिसाने पण सोडलं नाहीय कितिही गोड हसलं तर्री (लोकांना कसं जमतं हेच काय कळत नाय". हसणे ही फसवायची कला नाही हसणं हे उपजतच असत त्याच्यासाठी वेगळं काही जमवावं लागत नाही :) मी तर दंड भरण्याच्या तयारीत पण होते, कारण मला माहीत होतं माझं चुकलं होतं त्याबद्द्ल मी त्यांना सॉरी पण म्हटलं त्यामुळे गोड हसणं म्हणजे लाळघोटेपणा होत नाही आणी साहेबांनी जा सांगितल्यावर मला ही आश्चर्य वाटलं . असो आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादाबद्द्ल आभारी आहे. बस मध्ये लेडीज सीट मिळ्ण्याबाबत : बस मध्ये फक्त २ ते ३ आसन स्त्रियांकरीता राखीव असतात त्या आपण ह्क्काने मागून घ्यायच्या असतात कारण त्यापण आपल्याला सह्जासह्जी मिळ्त नाहीत.

म्हणजे तू एकदम सरळमार्गी, साधीभोळी दिसत्येस. कारण तू फायदा घेऊ शकलेली दिसत नाहीस . सरळमार्गी आणी साधीभोळी म्हणजे काय? तुम्हाला असं वाटतं का सरळमार्गी आणि साधीभोळी लोकं फायदा घेत नाहीत? आणि बाकीचे लोक फायदा घेतात? माझ्यामते हे व्यक्तीसापेक्ष आहे.

बॉस चॅटिंग करत असला तर चालते... पण त्या गरीब बिचार्‍या मुलींनी जरा आपल्या भावना मोकळ्या केल्या तर लगेच तुम्हाला पोट्शूळ उठतो कसा??? बरं त्या कुठल्या नावानी चॅटिंग करतात???

चांगली चालू आहे चर्चा.. पण प्लीज आता दुसरा भाग सुरू करायचा का याचा? हे दुसर्‍या पानावर चर्चा गेली की प्रतिसाद नविन कोणते कळतच नाही, शोधत बसावे लागते.. बाकी, फायदा उठवणारे कोणीही असू शकतं, मुलगा, मुलगी.. यशोधराचे म्हणणे पूर्ण पटले !! http://bhagyashreee.blogspot.com/

जे काही आहे ते फक्त गैरफायदेच होत... म्हणून सदरील विषयामधे "मुली / स्रिया असण्याचे घेता येण्यासारखे गैरफायदे!" असा बदल करावा असे सूचवतो.