Skip to main content

जगातली सगळ्यात फंडु मिसळ

लेखक सचीन जी यांनी शुक्रवार, 13/06/2008 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी मिपा चा नुकताच सभासद झालो आहे. नावावरुन आठवलं, जगातली सगळ्यात फंडु मिसळ पुणे - सोलापुर रस्त्यावर भिगवण या गावी मिळते. ज्योती हॉटेल. मी केवळ ही मिसळ खाण्यासाठी अनेकदा सोलापुर -पुणे - सोलापुर हा प्रवास कारने केला आहे ( सोपा रेल्वे पर्याय असताना). मिपाकरांसाठी भिगवण वारी अनिवार्य आहे. मिपा चा पंखा, सचीन जी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4684
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

सर्वप्रथम मिपावर हार्दीक स्वागत! सचीन जी, भिगवणला नक्की कुठे? नुसतं ज्योतीवरुन कसं कळेल हो? च्यायला, मी बारामतीचा आहे हो....मलापण नाही माहित :( सांगा... सांगा लवकर सांगा पत्ता!

In reply to by धमाल मुलगा

अरे सोप्प आहे. भिगवण गावात. सोलापूर - पुणे महामार्गावरच. सोलापुरहुन पुण्याला जाताना डाव्या हाताला एक पेट्रोल पंप आहे. त्याच्या समोर. एकदम फेमस आहे. गावात कोणीही सांगेल. सचीन जी

In reply to by धमाल मुलगा

ब्रेकिंग न्युज - धमाल मुलाला- आता धमाल मुलीची कॉम्पीटिशन ( रेफः सभा. नं १०८४) कृ. ह. घ्या.

In reply to by अमोल केळकर

श्री. केळकर, अब आयेगा असली मजा :) बघुया कोण जास्त वात्रटपणा करतंय. क्काय? :)

सचीन जी जरा जास्त माहिती द्या की राव ! म्हणजे - काय आहे त्या मिसळीत विशेष ? जगातली फंडु मिसळ असे तुम्हाला का जाणवले ? इ.इ भिगवण मला वाटते एस्.टी चा ऑफीशल स्टॉप आहे. ज्योती हॉटेल किती दुर आहे? मिपावर आपले स्वागत.

मिसळ-पाव जगातला सर्वोत्तम मिपा सोडुन कुठे मिळत असेल ह्या बद्दल शंका आहे. (मिपा चा मिसळप्रेमी) वेताळ

सचीन जी मिपावर स्वागत आहे. !!! अवांतर : सामना दैनिक आम्ही नेहमीच वाचतो, आवडतो. संजय राऊत यांच्या रोखठोक चे आम्ही फॅन. पण त्यांचे स्वतःवरचे नियंत्रण काल सुटल्यासारखे वाटले. आता ते म्हणतात 'सामना' विडंबनाची व्यंगचित्राची परंपरा पुढे चालवत आहे.!!! पाहा नववधु प्रिया ही बावरते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद मंडळी ! मी सोलापुरचा ! पण पुण्यनगरीला वांरवार येतो. मिपा करांना प्रत्यक्ष भेटण्याची उत्सुकता आहे. कसे जमेल हो ? मिपा करांना भेटण्यासाठी तळ्मळणारा, सचीन जी

भिगवणची मिसळ एकदा अवश्य खाल्ली पाहिजे... धन्यवाद सचिनराव...! तात्या.